कपूर खानदानाची मुहूर्तमेढ रोवणारे ‘पृथ्वीराज कपूर’ | Prithviraj Kapoor Biography in Marathi

जेव्हा जेव्हा आपण बॉलिवूड असं म्हणतो, तेव्हा तेव्हा आपल्या डोळ्यासमोर कपूर कुटुंब हे येतंच. कपूर कुटुंबांतील पृथ्वीराज कपूर हो?! हो!… तेच ते मुघल – ए आजम मधले “अकबर बादशहा “…. यांनी कपूर घराण्यात अभिनयाचा पहिला झेंडा रोवला आणि नंतर कपूर परिवरातला एकेक कलाकार आपला ठसा बॉलिवूडवर उमटवू लागला. पृथ्वीराज यांनी त्यांच्या पेशावर पाकिस्तान मधील एडवर्ड कॉलेजमधून वकिलीचे उच्च शिक्षण मिळवले. पण ते थिएटर विश्वात अधिक रमले.

कपूर खानदानाची मुहूर्तमेढ रोवणारे ‘पृथ्वीराज कपूर’ | Prithviraj Kapoor Biography in Marathi

दमदार आवाज आणि जबरदस्त अभिनय क्षमतांचे मालक म्हणजे ‘पृथ्वीराज कपूर’ ( Prithviraj Kapoor ) यांना त्यांच्या वर्तुळात सर्वच जण “पापाजी” म्हणून हाक मारत. यांचा जन्म लयातपूर मध्ये झाला जे आता ते पाकिस्तानमध्ये आहे. यांचे आजोबा हे दिवाण केशवमल’ हे ही एक जबरदस्त व्यक्तीमत्त्व होतं. यांचाच प्रभाव पृथ्वीराज यांच्यावर पडला. रंगमंच हेच पृथ्वीराज यांचं पाहिलं प्रेम होतं. त्यांच्याबद्दल असं बोललं जातं की ते फिल्म्स मधून पैसे कमवून रंगमंचा वर सदरीकारानासाठी वापरायचे. या वरून त्यांचं रंगमंचावरचं प्रेम दिसून येतं.

आपलं अभिनय कौशल्य ओळखून पृथ्वीराज यांनी लयातपुर आणि पेशावरमधील थिएटर्समध्ये अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. 1928 साली, त्यांनी त्यांच्या मावशीकडून कर्ज घेऊन ते मुंबईतच्या दिशेने निघाले आणि पुढे तिथेच स्थायिक झाले. मुंबईत रुळल्या नंतर ते इंपीरियल फिल्म कंपनीमध्ये दाखल झाले. तिथे त्यांनी दो धारी तलवार, सिनेमा गर्ल, शेर-ए-अरब आणि प्रिन्स विजयकुमार या चित्रपटांत त्यांनी आपल्या अभिनयाची उत्तम झलक दाखवली.

पृथ्वीराज कपूर यांनी 1931 मध्ये भारताच्या पहिल्या आलम आरा या बोलपटात एक साहाय्यक भूमिका निभावली होती. या आधीचे सर्व चित्र पट हे मूक म्हणजे त्या चित्रपटांना आवाज नसायचा.1941 मध्ये सोहराब मोदी यांच्या सिकंदर मध्ये “अलेक्झांडर द ग्रेट” म्हणून त्याचे काम सर्वांनाच आवडलं. त्यांनी पंजाबी आणि कन्नड चित्रपटातही काम केलं आहे. त्यांच्या पंजाबी चित्रपटाचं नाव होतं “नानक नाम जहाज है” आणि कन्नड चित्रपटाचं नाव होतं “साक्षात्कार” त्यांचे हे चित्रपटही खूप गाजले.

त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती घ्यायची झाली तर पृथ्वीराज कपूर यांचं वय सतरा आणि त्यांच्या पत्नीचं वय 14 असतानाच दोघांचं लग्न झालं होतं. त्यांना कमी वयातच मुले म्हणजे1927 मध्ये राज कपूर झाले. त्या नंतर तीन मुले झाली. अभिनयाच्या करकीर्दीसाठी मुंबईला जाण्याआधीच ते तीन मुलांचे वडील होते. त्यांच्या मुलांमध्ये राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर हे आहेत त्यांना आणखी दोन मुलं झाली होती पण एकाचा निमोनियाने आणि दुसऱ्याचा काही विषारी पदार्थ खाऊन लहानपणीच मृत्यू झाला.

पर्शियन आणि पारंपारिक चित्रपटगृहांपेक्षा आधुनिक शहरी रंगमंच या संकल्पनेला मूर्त स्वरुप देऊन पृथ्वीराज यांनी पृथ्वी थिएटर सुरू केलं. पृथ्वी थिएटरने सोळा वर्षांत 6262 एवढे नाट्यप्रयोग केले. त्यातील दीवार, पठाण, गद्दार, आणि पैसा अशी नाटके सादर झाली. त्यात कालिदासाचं शाकुंन्तलम हे नाटक ही त्यांनी सादर केलं. या नाटकात त्यांनी त्यांचा मुलगा राजकपूर याचाही समावेश करून घेतला. पृथ्वीराज आपला थिएटर ग्रुप घेऊन भारतात अनेक ठिकाणी फिरायचे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नाटक करायचे. ते खरंच एक अवलिया होते. बरीच वर्षं नाटकासाठी ते कलकत्ता इथे ही राहिले होते. त्यांच्या नाटकात सर्वात कुठलं नाटक गाजलं तर ते म्हणजे “पठाण” हे नाटक.

1950 पर्यंत त्यांना रंगभूमीचं बदलतं रूप स्पष्ट दिसू लागलं ते म्हणजे केवळ रंगमंचामधून पैसे कमवणं कठीण होणार आहे. पृथ्वीथिएटरमध्ये काम करत असलेले कलाकार ही हळू हळू चित्रपटांच्या दिशेने आपलं पाऊल उचलत होतं. पण नंतर पृथ्वीराज यांचा मुलगा शशी कपूर याची पाश्चात्य देशातील पत्नी जेनेफर केन्डल या दोघांच्या प्रयत्नांमुळे पृथ्वी थिएटर आणि शेक्सपिअर थिएटर एकत्र येऊन कंपनीचं नाव शेक्सपिअराना झालं. त्यानंतर तर पृथ्वीराज यांनी देशातील अनेक शहरांमध्ये रवींद्र नाट्य मंदिरांची ही स्थापना केली.

पृथ्वीराज कपूर हे केवळ आपल्या अभिनयावर लक्ष द्यायचे नाही तर आपल्या सहकलाकारांनाही प्रोत्साहन देऊन आपलंसं करून घ्यायचे. एक वेळ अशीही आली की या नाटाचा दमदार आवाज तोंडातून फुटेनासा झाला, तरीही नंतर उपचार घेऊन आवाज मिळवल्याने पुन्हा आपली दमदार एन्ट्री त्यांनी चित्रपटा मधून घेतली. त्यांना 1969 मध्ये पद्मभूषण देऊन भारत सरकारने सन्मानित केलं होतं. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार असे एकापेक्षा एक पुरस्कार प्राप्त आहेत. आपली कला सदाबहार ठेवणाऱ्या या अवलिया आमचा मानाचा मुजरा…

Note: जर तुमच्याकडे Biography of Prithviraj Kapoor in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Prithviraj Kapoor information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button