बचतीचे कोणकोणते मार्ग आहेत, ते जाणून घेऊयात | 10 ways to save money in marathi

प्रत्येक व्यक्तीचे एक कॉमन स्वप्न असते. माझे स्वतःचे एक घर असावे, छान कार असावी वगैरे वगैरे. असेच एक स्वप्न माझेही होते आणि ते म्हणजे मला एक छान आलिशान कार घ्यायची होती. पण यासाठी आवश्यक होता पैसा. सगळा घरखर्च भागवून मला माझ्या कारसाठी सुद्धा पैसै साठवायचे होते, तर त्यासाठी मी पैशांची योग्य त्या पद्धतीने बचत करून माझे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण केले. तुम्हालाही तुमची कार घ्यायची असेल आणि यासाठी पैसै कसे बचत करायचे हे कळत नसेल तर खालील मी दिलेले उपाय नक्की आजमावून पाहा.

बचतीचे कोणकोणते मार्ग आहेत ते जाणून घेऊयात | 10 ways to save money in marathi

1. तुमच्या खर्चाचा मागोवा ठेवा

आपले पैसे आपण कुठे आणि कसे खर्च करत आहोत याची नोंद ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळी आपण दहा पाच रुपये खर्च केलेला हिशोब लक्षात ठेवत बसत नाही. पण हे ठेवणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. कारण थोडे थोडे पैसे म्हणतच आपले पैसे हे खर्च होत असतात. तेव्हा पैसे कुठे आणि कसे जात आहेत याचा मागोवा घेत जा. तुमचे पैसे कुठे जात आहेत हे शोधण्यासाठी एक किंवा दोन आठवडे बॅलन्सचा फ्रिटर फाइंडर फॉर्म वापरून पहा. कॉम्प्युटरमधील एक्सेल शीटचा वापर यासाठी तुम्ही करू शकता.

2. गरजा वेगळ्या करा

आपल्याला ज्या गोष्टींची नितांत गरज आहे अशाच गोष्टींवर खर्च करा. उदाहरणार्थ जेव्हा तुमच्याकडे एक टीव्ही असताना तुम्हाला 42 इंची फ्लॅट टेलिव्हिजनची खरंच गरज आहे का ते पाहा. या उलट जर घरी काही मेडिकल इमर्जन्सी असेल तर त्यावर पैसै खर्च करा. विनाकारण ज्या गोष्टीची गरज नाही त्यावर शक्यतो पैसे खर्च करू नका.

3. पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरणे टाळा

बिल भरण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरणे टाळा. क्रेडिट कार्ड वापरल्याने गोष्टी त्या वेळी सोप्या होतात परंतु त्याचे मासिक पेमेंट वाढते. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर कटाक्षाने टाळा.

4. नियमितपणे पैशांचे जतन करा

तुमचे दर महिन्याचे पे चेक असतील, तर ते थेट तुमच्या बचत खात्यात जमा करा. त्यामुळे तुमचा पैसा कुठेही जाण्याची शक्यता राहणार नाही. जर दर महिन्याला पे चेक जमा करणे शक्य नसल्यास ऑटोमॅटिक सोयीसुद्धा असतात त्यांचा वापर करून पैसे बचत खात्यात जमा केले जाऊ शकतात.

5. तुमच्या विमा पॉलिसी तपासा

तुमच्या विमा पॉलिसीच्या योजना तपासा. योजना रिव्ह्यू करा. तुमच्याकडे खूप जास्त पैसे आहेत आणि तुम्ही पैसे वाया घालवत आहात किंवा खूप कमी आहे आणि पुरेसे पैसे कव्हर केलेले नाही तर व्हर्जिनिया CU विमा सेवा तुम्हाला सर्वोत्तम किंमतीत सर्वोत्तम कव्हरेज शोधण्यात मदत करू शकतात.

6. भेटवस्तू किंवा चैनीच्या वस्तूंवर खर्च टाळा

जर आपल्याला एखाद्या वस्तूची खरंच गरज नसेल तर तशा चैनीच्या वस्तू घेणे टाळा. ती वस्तू घेतल्यानंतर तुम्हाला काही काळासाठी चांगले वाटू शकते मात्र नंतर त्या गोष्टीत उगाच पैसा खर्च केला याचा तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो.

7. तुमच्या सेवा कट किंवा डाऊनग्रेड करा

जर तुमच्याकडे जे केबल चॅनल आहे त्यावरचे सगळे चॅनेल तुम्ही पाहत नसाल तर ते कट करून तुम्ही तुमचा स्वस्तातला पॅक खरेदी करू शकता. तसेच आता आजकाल मोबाईल असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात असणारे लँडलाईनचे कनेक्शन देखील कापू शकता. त्यामुळे पैसे वाचण्यास हातभार लागू शकेल.

8. तुमचे ऊर्जा बिल कमी करण्याचा प्रयत्न करा

जेव्हा उपकरणे आणि दिवे आवश्यक नसतील तेव्हा ते बंद करा. ऊर्जा-कार्यक्षम प्रकाश बल्ब खरेदी करा. जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा एसी वापरण्याऐवजी पंखा वापरा किंवा हिटर चालू करण्याऐवजी स्वेटर घाला. तसेच जर एखाद्या ठिकाणचे तुमचे लाईट, फॅनचे काम संपले असेल तर त्वरित बंद करण्याची सवय लावून घ्या.

9. ऑनलाईन बिल पेमेंट साठी साइन अप करा

आपण केवळ बँकमध्येच बचत नाही करत तर या ऑनलाईनद्वारे सुद्धा बचत करु शकतो. आपले पैसे दुसऱ्याकडून येणार असतील तर ते पैसे आलेत की नाही यासाठी ऑनलाईन चेक आपण करू शकतो. VACU चे ऑनलाइन बिल पे सदस्यांसाठी विनामूल्य आहे.

10. टेक आऊट ऑर्डर कमी करा

म्हणजेच ऑनलाईन ऑर्डर करण्याची आत्ता खूप जास्त क्रेझ आहे. पण सतत ऑनलाईन वस्तू, फूड मागवल्यामुळे आपल्या खर्चात वाढ होते. यामुळे वर्षभरातील आपल्या खर्चावर भार पडतो व उगाच खर्च वाढतात.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button