संयुक्त महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविलेले व्यक्ती ‘वसंतराव नाईक’ यांचा जीवन प्रवास | Vasantrao Naik Biography in Marathi

वसंतराव नाईक अर्थात संयुक्त महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविलेले व्यक्ती वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांचा जन्म 1 जुलै 1913 ला महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या गावाजवळील गहुली या गावी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव फुलसिंग नाईक व आईचे नाव होनूबाई नाईक होते.

वसंतराव नाईक यांचा जीवन प्रवास | Vasantrao Naik Biography in Marathi

वसंतराव नाईक यांचे शालेय शिक्षण वेगवेगळ्या गावांमध्ये झाले.त्यानंतर त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण विढोली व अमरावती येथून पूर्ण केले आणि नंतर नागपूरमधील मॉरीस कॉलेजमधून बी.ए शाखेची पदवी घेतली व पुढे कायद्याची पदवी संपादित केली.लहानपणापासून अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेल्या वसंतराव यांच्यावर महात्मा ज्योतिबा फुले व डेल कार्नेगी यांच्या विचारांचा प्रभाव पडला.

आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर वसंतरावांनी आपल्या पुसद या गावी वकील म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. कालांतराने वसंतरावांचे वकील म्हणून प्रस्थ वाढले. त्यानंतर ते पुसद कृषी मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी हरिजन हॉटेल्स आणि नॅशनल हॉटेल्स ( डीईजी आरएएस) चे अध्यक्षपदही भूषविले. व आपल्या नावाचा पंचकोशीत दबदबा निर्माण केला. त्यानंतर 1946 आली वसंतराव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी मध्य प्रदेश राज्याच्या केंद्रीय सहकारी बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले व पुढे आपल्या पुसद या गावाच्या नगरपालिकेचे अध्यक्षपदही भूषविले.त्यानंतर 1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले. पुढे 1 मे 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात वसंतराव नाईक संयुक्त महाराष्ट्राचे पहिले महसूल मंत्री झाले.

यशवंतराव यांच्या कार्यकाळात आपल्या कार्याचा ठसा उमटवल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर मारोतराव कन्नमवार यांच्या मंत्रिमंडळात वसंतराव नाईक पुन्हा महसूल मंत्री पदी विराजमान झाले.

हे सुध्दा वाचा:- संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री ‘मारोतराव कन्नमवार’ यांचा जीवन प्रवास

24 नोव्हेंबर 1963 ला मारोतराव कन्नमवार यांच्या अकाली निधनानंतर वसंतराव नाईक संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या त्यातील महत्त्वाच्या योजना म्हणजे, धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. 2 वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर, मी फासावर जाईन हे त्यांनी ठामपणे सांगितले.

वसंतराव नाईक यांच्या प्रशासकीय दृष्टिकोन अतिशय व्यवहारी होता व त्यांच्या या दृष्टिकोनामुळे त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक यशस्वी योजना राबविल्या.वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत कृषी, सहकार, सिंचन क्षेत्रात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केली.जायकवाडी, उजनी, बेंज, अपर वर्धा यांसारखी अनेक धरणे त्यांनी बांधली.परळी औद्योगिक वीज केंद्र खापरखेडा औद्योगिक वीज केंद्र, पारस औद्योगिक वीज केंद्र, भुसावळ औद्योगिक वीज केंद्र यांसारखे प्रकल्प वसंतराव यांनी उभे केले.

भटक्या जमातीसाठी स्वतंत्र आरक्षण, मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा, कृषी विद्यापीठाची स्थापना यांसारखे अनेक महत्त्वाचे निर्णय वसंतराव नाईक यांनी आपल्या कार्यकाळात घेतले. वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राने औद्योगिक क्षेत्रात देखील भरारी घेतली.

आपल्या (7 डिसेंबर 1963- 20 फेब्रुवारी 1975) 11 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राला त्यांनी सर्व क्षेत्रात आघाडीवर नेले व हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून ख्याती मिळवली.

20 फेब्रुवारी 1975 ला शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी आपल्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली.1970 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून गेले. 1 जुलै हा वसंतराव यांच्या जन्मदिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.

18 ऑगस्ट 1979 रोजी सिंगापूर येथे ‘वसंतराव नाईक’ यांचे निधन झाले.

Note: जर तुमच्याकडे Biography of Vasantrao Naik in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Vasantrao Naik information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

Leave a Comment


close button