संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री ‘मारोतराव कन्नमवार’ यांचा जीवन प्रवास | Marotrao Kannamwar Biography in Marathi

‘मारोतराव कन्नमवार’ ( Marotrao Kannamwar) अर्थात संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचा जन्म 10 जानेवारी 1900 ला महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील मुलज जवळील मारोडा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सांनशिवपंथ कन्नमवार व आईचे नाव गंगुबाई कन्नमवार होते.

महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचा जीवन प्रवास | Marotrao Kannamwar Biography in Marathi

मारोतराव कन्नमवार यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे जुबली हायस्कूल येथून पूर्ण झाले. घरची परिस्थिती बेताची असल्याकारणाने त्यांनी घरोघरी पेपर टाकने, रेल्वे स्टेशनवर तिकीट तपासणे यांसारखी कामे देखील केलीत.

मारोतराव कन्नमवार यांच्यावर शालेय जीवनापासूनच राष्ट्रप्रेमाची भावना होती. एकदा लोकमान्य टिळक चंद्रपुरात येणार होते तेव्हा मारुतराव शिकत होते. टिळकांच्या भाषणाला विद्यार्थ्यांनी येऊ नये असा आदेश काढण्यात आला होता पण मारोतराव आणि ह्या आदेशाला न जुमानता टिळकांच्या भाषणाला हजेरी लावली व त्यांच्या भाषणाने ते चांगलेच प्रभावित झालेत.

शालेय जीवनापासूनच मारोतरावांना वाचनाचचे प्रचंड वेड होते. व त्यांच्या बहुतेक वेळ हा वाचनालयात जायचा, तेव्हा वाचनालयातील अनेकांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा मारोतराव ऐकत. गांधी विचारांची प्रेरणा देखील मारोतरावावर येथूनच झाली. नंतर त्यांचे गांधी प्रेम वाढलं.गांधी व टिळक यांच्या विचारांने प्रभावित होऊन मारोतराव देशसेवेत असे विविध चळवळीत जोडले गेले.

मारोतराव यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात 1918 च्या स्वतंत्र चळवळीमधून झाली. तसेच महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.पुढे मारोतराव कन्नमवार, त्यावेळीची मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या नागपूर शहराचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष झाले. त्यानंतर आमदार होऊन मध्यप्रदेश सरकारमध्ये मंत्री देखील झाले.

त्यानंतर चंद्रपूर या आपल्या जिल्ह्यात कन्नमवार यांनी शिक्षण संस्थांची निर्मिती केली व आदिवासी समाजाला शिक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला. पुढे संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण मंत्रिमंडळामध्ये कन्नमवार हे उपमुख्यमंत्री झाले तसेच त्यांच्याकडे दळणवळण बांधकाम ह्या खात्यांचा पदभार देखील होता.

1962 साली चीनने युद्धाची घोषणा न करता भारतावर आक्रमण केले. त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीला पाचारण करून संरक्षण खात्याची जबाबदारी दिली.

यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री पदी नियुक्त झाल्यानंतर मारोतराव कन्नमवार यांनी संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली.आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या एक वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी (20 नोव्हेंबर 1962 – 24 नोव्हेंबर 1963) त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

हे सुध्दा वाचा:- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ‘यशवंतराव चव्हाण’ यांचा जीवन प्रवास

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्त झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय सुरू केले. त्यानंतर त्यांनी ताडोबा राष्ट्रीय उद्यान, श्रमदान सप्ताह, कोकण रेल्वे यांसारख्या महत्त्वाच्या योजना आखल्या व उत्तमपणे राबविल्याही.

पुढे त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत महत्त्वाचे संरक्षण प्रकल्प महाराष्ट्रात आणले. ओझरचा मिग विमान कारखाना, वरणगाव, भंडारा व भद्रावती येथील संरक्षण साहित्य उत्पादनाचे कारखाने त्यांच्या अचूक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात आले.

1962 च्या चीनच्या आक्रमणानंतर देशाच्या संरक्षण निधीला पाठबळ देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात जनसंपर्क अभियान, क्रिकेट मॅच, वृक्षरोपण यांसारखे अभियान राबवून 7 कोटी 91 लाख 55 हजार रुपये जमा करून दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्राचे नाव अभिमानाने उंचवले.

आपल्या अल्पशा मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत त्यांनी संरक्षण, उद्योग आणि पायाभूत सुविधा यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प प्रस्तावित केले.24 नोव्हेंबर 1963 ला मुख्यमंत्रीपदी असतानाच मारोतराव कन्नमवार यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने आपल्या उत्तम वक्ता, दूरदृष्टी असलेला अभ्यासक लोकनेता गमविला.

Note: जर तुमच्याकडे Biography of Marotrao Kannamwar in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Marotrao Kannamwar information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

Leave a Comment

close button