म्युच्युअल फंडाचे प्रकार कोणकोणते आहेत? | Types of Mutual Funds in Marathi

म्युच्युअल फंडाचे विश्व मोठे आहे आणि दिवसेंदिवस ते वाढतच जातेय. गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त ‘जोखीम सापेक्ष’ परतावा देणे हा त्यांचा उद्देश असतो. त्यासाठी भांडवल बाजारातील (डेट आणि इक्विटी) गुंतवणूकसाठी अनेक प्रकारच्या योजना वेळोवेळी आणल्या जातात. म्युच्युअल फंडाची वर्गवारी दोन प्रकारे करता येते.

म्युच्युअल फंड चे प्रकार कोणकोणते आहेत? | Types of Mutual Funds in Marathi

म्युच्युअल फंड चे प्रकार
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

रचनेप्रमाणे (Structure) त्यातले मुख्य प्रकार असे आहेत

  • खुल्या योजना (Opend Ended Fund) -योजनेला मुदत नाही
  • बंद योजना (Close Ended Fund )- ठरावीक मुदतीची योजना
  • मध्यांतर योजना (Interval Fund) मधूनमधून खरेदी-विक्री करता येते.

रचनेप्रमाणे असलेल्या प्रकारांची वैशिष्ट्ये काय आहेत?

1.खुल्या किंवा ओपन एंडेड:

या योजनांना मुदत नसते. या योजना कायम चालू असल्याने नवीन युनिट्सची खरेदी किंवा घेतलेल्या युनिट्सची विक्री कधीही करता येते. यातील प्रकार असे आहेत

  • सर्वसाधारण: म्युच्युअल फंडाच्या बहुतेक योजना खुल्या असतात आणि त्यांच्या युनिट्सची प्रथम विक्री आणि पुनर्खरेदी म्युच्युअल फंडाकडूनच होते.
  • एक्स्चेंज ट्रेडेड फंड : ज्या योजनांचे व्यवहार शेअरबाजारावर होतात त्यांना एक्स्चेंज ट्रेडेड फंड म्हणतात.
  • फंड ऑफ फंड्स: जेव्हा म्युच्युअल फंड योजनेची गुंतवणूक शेअर्स किंवा रोखे अशा साधनांमध्ये न होता त्याच कंपनीच्या किंवा दुसऱ्या कंपनीच्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये होते, त्याला ‘फंड ऑफ फंड्स’ म्हटले जाते. (या सर्व प्रकारांची अधिक माहिती नंतरच्या प्रकरणांमध्ये आली आहे.)

2. बंद किंवा क्लोज एंडेड योजना

योजना ठरावीक मुदतीची असते. अशा योजनेच्या सुरुवातीच्या विक्रीचा कालावधी (New Fund Offer Period) संपल्यानंतर त्यात नवीन युनिटसची खरेदी करता येत नाही. तसेच घेतलेल्या युनिट्सची विक्रीपण मधील काळात करता येत नाही.योजनेची ठरलेली मुदत संपल्यानंतर युनिट्सची पुनर्खरेदी होते व ती योजना बंद होते. (बंद योजनांची शेअर बाजारावर नोंद केली जाते. परंतु यात फारसे व्यवहार होत नाहीत. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी पैसे लागण्याची शक्यता असेल तर अशा योजनेत पैसे गुंतवू नये.)

3. मध्यांतर किंवा इंटर्व्हल फंड

नावाप्रमाणे हा फंड वेगवेगळ्या अवधीसाठी खुला आणि बंद असतो. म्हणजे उदाहरणार्थ, मंथली (मासिक) इंटर्व्हल फंडात दर महिन्यातून फक्त एकदा खरेदी किंवा विक्री करता येते. यात डेट योजना असतात. याच पद्धतीने तीन महिने, सहा महिने आणि एक वर्ष मुदतीचेही इंटर्व्हल फंड असतात.

आतापर्यंत बघितलेले हे सर्व प्रकार म्युच्युअल फंडाच्या मुदतीप्रमाणे किंवा रचनेप्रमाणे आहेत.आता ॲसेट क्लासप्रमाणे असे प्रकार आहेत.

ॲसेट क्लासनुसार

ॲसेट क्लास सुद्धा प्रकार आहेत

  • डेट फंड
  • इक्विटी फंड
  • बॅलन्स्ड (हायब्रीड) फंड
  • गोल्ड फंड

1. डेट किंवा रोखे फंड

या योजनेची गुंतवणूक सरकारी (केंद्र आणि राज्य सरकारांचे) कर्जरोखे, खासगी व सरकारी कंपन्यांचे रोखे (डिबेंचर्स), अर्थसंस्थांचे रोखे, कमर्शिअल पेपर्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, मनीमार्केटमधील साधने अशा निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनांमध्ये होते.

2. इक्विटी किंवा ग्रोथ फंड

कंपन्यांचे शेअर्स (समभाग), समभागसदृश साधने (उदाहरणार्थ, शेअर वॉरंट्स) आणि डेरीव्हेटीव्हज (ऑप्शन्स, फ्यूचर्स) अशा साधनांमध्ये यातील रक्कम गुंतवली जाते. यामध्ये रोख्यांच्या तुलनेत जोखीम जास्त असते.

3. बॅलन्स्ड फंड (हायब्रीड फंड)

नावावरून लक्षात येतेय की या प्रकारात डेट आणि इक्विटी या दोन्हीचा समावेश करून समतोल साधायचा असेल.समभाग (शेअर्स), रोखे (डेट) (आणि काही वेळा सोने) या प्रकारांचे वेगवेगळ्या प्रमाणातले मिश्रण यात असते.यातल्या ॲसेट प्रकारांचे प्रमाण बदलून वेगवेगळ्या योजना तयार होतात. यातील रोखे आणि इक्विटी यांच्या प्रमाणावरून त्या योजनेची जोखीम ठरते.

4. गोल्ड फंड

प्रत्यक्ष सोने या धातूमध्ये गुंतवणूक करणारी या योजना आहेत. नेहमीच्या इक्विटी योजना कमॉडिटीज (लोखंड, तांबे, अॅल्युमिनिअम हे धातू, साखर, सिमेंट इत्यादी) उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करतात, प्रत्यक्ष कमॉडिटींमध्ये नाही. यात तीन प्रकार आहेत.

  • गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड: फक्त सोने या धातूमध्ये गुंतवणूक असलेला व सोन्याच्या बाजारभावाप्रमाणे युनिटची किंमत असलेला हा एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) आहे.
  • म्युच्युअल फंडची ‘फंड ऑफ फंड्स’: ही योजना म्हणजे जी त्याच म्युच्युअल फंड कंपनीच्या गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करते.
  • इंटरनॅशनल गोल्ड फंड : सोन्याचे उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये हा फंड गुंतवणूक करतो. यात सोन्याची खरेदी होत नाही. त्यामुळे हा कमॉडिटी फंड नाही. सध्यातरी यामध्ये फक्त आंतरराष्ट्रीय फंड आहेत.

मित्रांनो आशा करतो की, तुम्हाला म्युच्युअल फंडाचे प्रकार समजले असेल.या पुढच्या पोस्टमध्ये आपण इक्विटी शेअर्स म्हणजे काय? हे जाणून घेणार आहोत.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button