शेअर मार्केटचे प्रकार किती आहेत? | Types of share market in marathi

मित्रांनो या पहिले आपण शेअर म्हणजे काय ते जाणून घेतल आता आपण शेअर मार्केटचे किती प्रकार आहेत ते जाणून घेऊया.

शेअर मार्केटचे प्रमुख्याने दोन प्रकार आहेत | Types of share market in marathi

  1. प्रायमरी मार्केट(Primary Market)
  2. सेकंडरी मार्केट (Secondary Market)

जर एखाद्या कंपनीने आपला नवीन बिझनेस चालू केलेला असेल आणि त्या कंपनीने जर आपले शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून दिले तर ते सर्वात प्रथम प्रायमरी मार्केटमध्ये उपलब्ध होतात. जे लोक प्रायमरी मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स खरेदी करतात त्यांच्याकडून कंपनीला फंड प्राप्त होतो आणि त्या बदल्यात कंपनी त्यांना काही प्रमाणात आपली भागीदारी देते. प्रायमरी मार्केटमध्ये इन्वेस्टर जो पैसा गुंतवतात तो थेट कंपनीकडे जातो. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मध्यस्थाची गरज नसते.

हे सुध्दा वाचा – शेअर म्हणजे काय?

प्रायमरी मार्केटमध्ये कंपन्या विविध प्रकारे भांडवल गोळ्या करतात त्यातील काही मुख्य प्रकार खालील प्रमाणे.

1. पब्लिक इशू (Public Issue) – याला आयपीओ असेदेखील म्हटले जाते. ज्यावेळी कुठलीही कंपनी लोकांना सर्वात प्रथम आपले शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून देते त्याला इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO)असे म्हटले जाते.

2. प्रायव्हेट प्लेसमेंट (Private Placement) – या प्रकारात कंपनी काही खास इन्वेस्टरलाच आपले समभाग विक्रीसाठी उपलब्ध करून देते. यामध्ये म्युच्युअल फंड, बँका, इन्शुरन्स कंपन्या, इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर यांचा समावेश होतो.

3. राईट इशू (Right Issue) – या प्रकारात कंपनी आपल्या आधीच्या समभाग धारकांनाच शेअर्स विकून भांडवल उभे करते.

प्रायमरी मार्केटमध्ये इन्वेस्टर शेअर्सची फक्त खरेदी करू शकतात पण ते त्यांना विकता येत नाहीत. त्यांना जर ते शेअर्स विकायचे असतील तर त्यांना ते सेकंडरी मार्केटमध्ये येण्याची वाट पाहावी लागते.

प्रायमरी मार्केट ची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तो शेअर सेकंडरी मार्केटमध्ये येतो म्हणजेच तो आपण NSE किंवा BSE लिस्टमध्ये पाहू शकतो. प्रायमरी मार्केटमध्ये शेअर्स सर्वांनाच खरेदी करता येत नाहीत पण सेकंडरी मार्केट मध्ये आल्यानंतर कोणीही तो शेअर्स आपल्या ब्रोकर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकतो.

प्रायमरी मार्केट ची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तो शेअर सेकंडरी मार्केटमध्ये येतो म्हणजेच तो आपण NSE किंवा BSE लिस्टमध्ये पाहू शकतो. प्रायमरी मार्केटमध्ये शेअर्स सर्वांनाच खरेदी करता येत नाहीत पण सेकंडरी मार्केट मध्ये आल्यानंतर कोणीही तो शेअर्स आपल्या ब्रोकर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकतो.स्टॉक मार्केट एक सेकंडरी मार्केट आहे ज्यामध्ये आपण आयपीओ मध्ये खरेदी केलेले शेअर्स विकू शकतो किंवा दुसऱ्या समभाग धारकाकडून आपण ते खरेदी करू शकतो म्हणजेच सेकंडरी मार्केट हा एक शेअर चा बाजार आहे जिथे शेअरची खरेदी आणि विक्री चालते.

Note- मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करतात. या विषयावर आणखी पोस्ट येणार आहेत त्या नक्की वाचा. आणि हो आपल्या Dnyan_shala आणि Shares_dnyan या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button