NCB म्हणजे काय ? थोडक्यात जाणून घेऊया | What is NCB in Marathi

सध्या सर्वत्र एनसीबीची चर्चा आहे. कारण शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांचे अटक आणि त्याआधी सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर एनसीबी प्रकाशझोतात आली. एनसीबी नेमके काय करते यांचे अधिकार काय याविषयीची माहिती आपण जाणून घेऊयात.

एनसीबी म्हणजे काय? | What is NCB in Marathi

एनसीबी (NCB) चा अर्थ ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ म्हणजेच अमलीपदार्थ नियंत्रण विभाग असा आहे. ही भारत सरकारची एक गुप्तचर संस्था आहे.

एनसीबी ची स्थापना कधी झाली?

17 मार्च 1986 रोजी या संस्थेची स्थापना झाली. नार्कोटिक्स ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायदा 1985 च्या कलम 4 (3) नुसार ही संस्था स्थापन केली गेली आहे.

एनसीबी वर कोणाचे नियंत्रण असते? आणि मुख्यालय कुठे आहे?

एनसीबी ही केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणारी संस्था आहे. याशिवाय मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, लखनऊ, अहमदाबाद, जम्मू आणि जोधपूर या ठिकाणी विभागीय कार्यालय आहेत. मुंबईचे कार्यालय महाराष्ट्र व गोवा या राज्यांसाठी काम करते.

एनसीबी मधील अधिकारी कोण असतात आणि त्यांची निवड कशी होते?

एनसीबी मधील अधिकारी हे भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) आणि भारतीय महसूल सेवा (आयआरएस) मधील असतात. या अधिकार्‍यांची निवड केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून केली जाते.

एनसीबी चे काम काय आहे?

एनसीबीचे प्रमुख काम अमली पदार्थ विरोधात कारवाई करणे, त्यांचा दुरुपयोग रोखणे, विविध राज्यांना अमली पदार्थ विरोधी कारवायांमध्ये मदत करणे, मादक पदार्थांची तस्करी रोखणे, राज्यातील ड्रग्स कायद्यांची अंमलबजावणी करणे व त्यात सुधारणा करणे सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था ज्यामध्ये आयएनसीबी, इंटरपोल, यूएनडीसीपी यांसारख्या संस्थांची संबंध विकसित करणे व समन्वय साधणे अशी कामे केली जातात.

एनसीबीकडे तक्रार कशी करता येईल?

एन सी बी च्या मुख्यालयाकडे तक्रारीसाठी +91-11-26761000 हा क्रमांक दिला गेला असून याशिवाय महाराष्ट्र व गोव्यातील तक्रारीसाठी mzu-ncb@nic.in या ईमेलवरही तक्रार करता येईल. महाराष्ट्र व गोवा राज्यसाठीचे विभागीय संचालक सध्या समीर वानखेडे हे आहेत.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

Leave a Comment

close button