शेअर म्हणजे काय? | What is Share in Marathi

कुठलाही व्यवसाय चालू करण्यासाठी भांडवलाची गरज असते आणि हे भांडवल विविध मार्गांनी उभे केले जाते. काही कंपन्या या बँकांकडून कर्ज घेतात तर काही कंपन्या आपली हिस्सेदारी शेअर्सच्या स्वरूपात विकून लोकांकडून पैसे गोळा करतात.

शेअर म्हणजे काय? | What is Share in Marathi

उदाहरणार्थ एबीसी नावाची एक मोबाईल बनवणारी कंपनी आहे. या कंपनीकडे सुरुवातीला 10 कोटी रुपये आहेत. एवढ्या भांडवलामध्ये कंपनी महिन्याला फक्त 1000 मोबाईल बनवू शकते. जर एबीसी कंपनीला दोन हजार मोबाईल बनवण्याची ऑर्डर मिळाली तर कंपनीला आणखी दहा कोटी भांडवलाची गरज पडेल. जर कंपनीने दहा कोटी रुपयांचे कर्ज बँकेकडून घेतले तर कंपनीला त्या पैशांवर व्याज द्यावे लागते.

हे टाळण्यासाठी कंपनीकडे अजून एक पर्याय आहे तो म्हणजे लोकांकडून पैसे गोळा करणे आणि त्या बदल्यात त्यांना आपल्या कंपनीची थोडीशी हिस्सेदारी देणे त्यामुळे कंपनीची भांडवलाची गरज तर पूर्ण होईलच शिवाय कंपनीला या रकमेवर अतिरिक्त व्याज सुद्धा द्यावे लागणार नाही. जर कंपनीला फायदा झाला तर कंपनीच्या शेअर्स ची किंमत वाढते आणि ज्या लोकांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत त्यांना सुद्धा फायदा होतो.

जसे आपण वरील उदाहरणांमध्ये पाहिले की 2000 मोबाईलची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कंपनीला अतिरिक्त दहा कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी कंपनी आपल्या समभागांचे समान भाग करते आणि ते लोकांना विकते. जर कंपनीने आपल्या एका समभागाची किंमत शंभर रुपये ठेवली तर कंपनीची दहा कोटी रुपयांची गरज भागविण्यासाठी दहा लाख लोकांनी कंपनीचा एक शेअर खरेदी केला पाहिजे आणि ते सहज शक्य होते म्हणून भांडवल उभारण्यासाठी याहून दुसरा उत्तम पर्याय नाही.

Note- मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करतात. या विषयावर आणखी पोस्ट येणार आहेत त्या नक्की वाचा. आणि हो आपल्या Dnyan_shala आणि Shares_dnyan या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.

Leave a Comment

error: ओ शेठ