महाराष्ट्र राज्याचे चौथे मुख्यमंत्री ‘शंकरराव चव्हाण’ यांचा जीवन प्रवास | Shankar Rao Chavan Biography in Marathi

महाराष्ट्र राज्याचे चौथे मुख्यमंत्री अर्थात ‘शंकरराव भाऊराव चव्हाण’ यांचा जन्म 14 जुलै 1920 ला महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव चव्हाण व आईचे नाव लक्ष्मीबाई चव्हाण होते.

मुख्यमंत्री ‘शंकरराव भाऊराव चव्हाण’ यांचा जीवन प्रवास | Shankar Rao Chavan Biography in Marathi

लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असलेल्या शंकररावांचे प्राथमिक शिक्षण पैठण येथून झाले. त्यानंतर उस्मानिया विद्यापीठातून (हैदराबाद) ते बी.ए एलएल.बी झाले. व त्यानंतर त्यांनी वकिलीची सनद मिळवली. आपले कायद्याचे शिक्षण चालू असताना शंकररावावर स्वामी रामानंद तीर्थचा प्रभाव होता व त्यांच्या आदेशाने शंकरराव हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या लढाईत सहभागी झाले.

अखेर 13 सप्टेंबर 1948 ला हैदराबाद संस्थान भारतात वलीन झाले. कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शंकररावांनी पुसद तालुक्यातील उमरखेड या गावात आपल्या कार्याची रोवतपेठ रोवली. व पुढे 1948- 49 मध्ये शंकरराव नांदेड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस झाले. त्यानंतर पुढील 1952 च्या सार्वत्रिक निवडणुकीत शंकरराव यांचा पराभव झाला. पण त्या पराभवाने खचून न जाता त्यांनी नांदेड नगरपालिकेत सहकारी क्षेत्रात व कामगार वर्गात कार्य केले. 1956 मध्ये शंकरराव नांदेड चे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले व त्यानंतर त्यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, हैदराबाद राज्य सहकारी बँकेचे संचालक तसेच विविध पदावर आपल्या कार्याचा ठसा उमटवला.

1956 च्या सुमारास मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला व त्यावेळी शंकरराव यांना मंत्रिमंडळात उपमंत्रिपद मिळाले. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात शंकरराव महाराष्ट्राचे पाटबंधारे व वीज खात्याचे मंत्री झाले. पाटबंधारे मंत्री म्हणून शंकररावांनी उत्तम कामगिरी केली. कृष्ण-गोदावरी प्रकल्पात शंकररावांची भूमिका महत्त्वाची मानली गेली. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणाद्वारे त्यांनी मराठवाड्याचा विकास साधून आणला. जायकवाडी प्रकल्प हा देखील शंकरराव चव्हाणांच्या प्रयत्नाचे यश आहे.

1972 ते 1975 दरम्यान त्यांनी कृषीमंत्री म्हणूनही काम पाहिले. पुढे वसंतराव नाईक मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर 21 फेब्रुवारी 1975 ला शंकरराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचे चौथी मुख्यमंत्री म्हणून पदावर आरूढ झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात महत्त्वाचे निर्णय घेतले. सर्वप्रथम त्यांनी महाराष्ट्राच्या सचिवालयाचे नामांतर करून मंत्रालय केले. व मंत्रालयात एका प्रकारची शिस्त आणली. मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावर चहाची गाडी ही शंकररावांचीच कल्पना. त्यानंतर शेतीला ‘8 माही पाणी देणे’ ही योजना यशस्वीपणे राबविली.

हे सुध्दा वाचा:- संयुक्त महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविलेले व्यक्ती ‘वसंतराव नाईक’ यांचा जीवन प्रवास

राज्याची अन्नधान्याची टंचाई लक्षात घेऊन त्यांनी साठेबाजांवर विरोधात धडक कारवाई केली व छापेमारीची आखणी करून हजारो टन धान्य सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिले.राज्याची विजेची मागणी लक्षात घेता त्यांनी कोराडी येथील औष्णिक वीज केंद्रात दुसरे युनिट चालू केले. त्यानंतर मुबलक प्रमाणात वीज निर्मिती झाली. शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात पारस, येलदरी चंद्रपूर येथील औष्णिक वीज केंद्राची निर्मिती झाली.

शंकरराव चव्हाणांनी आपल्या कार्यकाळात गिरणी कामगारांचे प्रश्न मार्गी लावले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व पाटबंधारे मंत्री म्हणून शंकरराव चव्हाणानी उत्तम कामगिरी बजावली. राज्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या जडणघडणीत शंकररावांचे मोलाचे स्थान आहे.जायकवाडी, विष्णुपुरी यांसारखे मोठे जलसिंचन प्रकल्प उभारण्यात शंकरराव चव्हाण यांचे मोठे योगदान आहे.याशिवाय त्यांनी उजनी, इस्लामपूर, पैनगंगा, अय्यर मांजरा अशी मोठे जलसिंचन प्रकल्पाची मालिकाच निर्माण करण्यात आली.

पुढे शंकरराव चव्हाण यांनी आपल्या मुख्यमंत्रीच्या कार्यकाळात कापूस एकाधिकार योजना, घरकुल योजना, रेल्वे रुंदीकरण यांसारख्या अनेक योजना राबविल्या.आपल्या पाटबंधारे क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना महाराष्ट्राचे ‘जलसंस्कृतीचे जनक’ म्हणून संबोधले जाऊ लागले. (त्यांनी आपल्या कार्यकाळात 20 पेक्षा अधिक धरणांची बांधणी केली)

राज्याच्या राजकारणात भरीव कामगिरी बजावल्यानंतर 1980 च्या दशकात शंकरराव चव्हाण दिल्लीत गेले होते तेथेही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. 1984 साली शंकरराव चव्हाण इंदिरा गांधीच्या मंत्रीमंडळात संरक्षण मंत्री म्हणून नेमले गेले. आपल्या केंद्रीय पदाच्या कार्यकाळात पंजाब मधील घूसफुस व कश्मीर मधील धगधगते वातावरण त्यांनी स्थिर केले व निवडणुका घेऊन लोकप्रतिनिधीचे सरकार आणले.

शंकरराव चव्हाण यांनी केंद्रात संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री यांसारखी अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. त्यांनी केंद्रात इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.व्ही.नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात आपल्या कार्याचा ठसा उमटविला.

आपल्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी दोन वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद व केंद्रात अनेक महत्त्वाची पदे भूषविली. (या कालावधीत त्यांच्यावर कोणतेही भ्रष्टाचाराची कोणतेही आरोप झाले नाही) अतिशय साधी राहणीमान असलेले शंकरराव चव्हाण रामानंदतीर्थ व गोविंद श्रॉफ यांना आपले राजकीय गुरू मानत. शंकरराव चव्हाण हे मितभाषी, कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासू वृत्तीचे व्यक्तिमत्व होते आणि त्यांच्या याच गुणांमुळे ते जनमाणसात जलनायक व लोकनेता या नावाने लोकप्रिय झाले.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत.

26 फेब्रुवारी 2004 ला शंकरराव चव्हाण यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने दूरदृष्टी असलेल्या, संयमी लोकनेता गमावला.

Note: जर तुमच्याकडे Biography of Shankar Rao Chavan in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Shankar Rao Chavan information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

Leave a Comment


close button