अळूच्या पानाचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Taro leaves health benefits in marathi

मित्रांनो अळूच्या पानावरील पाण्याचा थेंब स्थिर पकडणे जितकं अशक्य आहे तितकंच अळू (Taro leaves) न खाणारा महाराष्ट्रीय माणूस सापडणं अशक्य आहे. कोकणात अळूचे फतफते चांगलेच लोकप्रिय आहे. अळूवड्यांचा खमंग वास आला असता भूक चाळवली गेली नाही असा मराठी माणूस शोधूनही सापडणार नाही. अळूच्या कंदाची, पानांची व देठांची भाजी बनवली जाते. ओलसर जमिनीमध्ये अळूची पैदास होते. अळूचे राजाळू, काळी अळू, धावअळू, गिमअळू, मुंडबेअळू, रामअळू यांसारखे प्रकार आहेत. काळी अळू यामधील उत्तम प्रकारचा अळू आहे.

अळूच्या पानाचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Taro leaves health benefits in marathi

 • अळू थंड, शक्तिवर्धक, अग्नीप्रदीपक, मूत्रल, कफ व वायूकारक असून ते धातूवृद्धीही करते.
 • बेसन घालून अळूच्या पानांच्या वड्या करतात. मात्र त्यात भरपूर मसाला व तेलाचा वापर करावा जेणेकरून वायूविकाराचा त्रास होत नाही. मात्र त्याचे अतिरेकी सेवन मात्र टाळावे.
 • अळूच्या कोवळ्या पानांचा रस काढून त्यात जिरेपूड मिसळून प्यायला असता पित्तप्रकोप दूर होतो.
 • वायूमुळे पोटात गोळा उठल्यास अळूच्या देठासहित पाने वाफवून त्याचे पाणी काढून त्यात तूप घालून तीन दिवस प्यायला द्यावे.
 • रक्तपित्त झाले असता अळू जुलाबात गुणकारी ठरते.
 • अळूचा आहारात समावेश केल्याने स्त्रियांना अंगावर दूध चांगले येते.
 • अळूच्या पानांचा रस तीन-चार दिवस प्यायल्याने लघवीची जळजळ होते.

हे सुध्दा वाचा:रताळे खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?

 • अळूची देठे विस्तवावर जाळावी व त्याची राख फोडांवर लावल्यास फोड फुटून बरे होतात.
 • गांधीलमाशी चावल्यास अळू भाजून त्याचा रस दंशस्थानी लावावा तसेच पोटातही घ्यावा.
 • पोटात कृमी, जंत झाले असता रानटी अळूचा कंद जाळून त्याची राख मधातून चाटावी.
 • पोटात गुबारा धरून शौचाला साफ होत नसल्यास लसणाची फोडणी दिलेली अळूची भाजी खावी.
 • मूतखडा, पित्ताशयखडा असणाऱ्यांनी अळूचे सेवन टाळावे. अळू कधीही कच्च्या स्वरूपात खाऊ नये.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button