आर्थिक नियोजन म्हणजे काय ? थोडक्यात जाणून घेऊया.

आपल्या आर्थिक साधनांचे योग्य व्यवस्थापन करून आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याची प्रक्रिया म्हणजे आर्थिक नियोजन, परंतु आपल्यापैकी बरेच जण ही तशी फारशी अवघड नसणारी गोष्ट करत नाहीत. फक्त श्रीमंतांनीच आर्थिक नियोजन करायचे असते. ‘आपल्याकडे अजून पैसे आले की त्याचा विचार करू’ किंवा ‘ते खूप किचकट आहे, मला जमणार नाही.’ अशी कारणे ते सांगत राहतात.

आर्थिक नियोजन म्हणजे काय ? | What is financial planning in marathi

पण असे गैरसमज तुमच्या मार्गात अडथळा निर्माण करतात. आर्थिक नियोजनात गुंतवणूक, आयुर्विमा (लाईफ इन्शुरन्स), सर्वसाधारण विमा (उदाहरणार्थ, मेडिक्लेम), प्राप्तिकर नियोजन (इन्कमटॅक्स प्लॅनिंग), इच्छापत्र (इस्टेट प्लॅनिंग) या बाबींचाही समावेश होतो. आर्थिक नियोजन करताना आपल्यालाच प्रश्न विचारून त्याची पूर्ण विचारांती उत्तरे द्या म्हणजे तुमची स्वप्ने आणि आकांक्षा यांचे प्रतिबिंब तुमच्या अर्थनियोजनात दिसेल.

आपल्यामध्ये प्रचंड क्षमता असते, पण त्याची आपल्यालाच अनेकदा ओळख नसते. तुमची सध्याची आर्थिक स्थिती जरी चांगली नसली तरीही भविष्यात आपल्या प्रयत्नांनी त्यात खूप मोठा बदल तुम्ही घडवून आणू शकता यावर विश्वास ठेवा. तुम्ही आत्ता किती वयाचे आहात त्यानुसार पुढील किती वर्षांचे नियोजन करायचे आहे हे ठरवा. कोणत्याही वयाचे असलात तरी नियोजनाची गरज असतेच. स्वतःलाच पुढील प्रश्न विचारून नियोजनाला सुरुवात करा :

  1. आपण आत्ता कोठे आहोत? तुमच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा ताळेबंद मांडा.
  2. आपल्याला कोठे जायचे आहे? : तुमच्या आर्थिक गरजा आणि उद्दिष्टे ठरवा. (ध्येय) डोक्यात ठेवून सुरुवात करा ‘Begin with end in mind’ जगप्रसिद्ध व्यवस्थापन गुरू स्टीफन कोवी यांनी सांगितलेली ही परिणामकारकतेची सवय कायम लक्षात ठेवा.
  3. आपण तेथे कसे जाणार आहोत? तुम्ही ठरवलेली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याची योजना आखून अमलात आणा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button