हरभरे खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Soaked gram health benefits in marathi

मित्रांनो हरभऱ्याचा (Soaked gram) वापर सर्वत्र होतो. हरभरे लहान व मोठ्या आकारात तसेच पांढऱ्या, पिवळ्या व लाल रंगामध्ये आढळतात. हरभऱ्यांच्या डाळीचे पीठ काढून त्याचाही उपयोग केला जातो, यालाच बेसन म्हणतात. शेव, गाठिया, भजी, खमण, वडे आदी पदार्थ तसेच मगज, म्हैसूर, बुंदी, मोहनथाळ, मोतीचुराचे लाडू आदी गोड पदार्थही यातून बनवले जातात.

हरभरे खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Soaked gram health benefits in marathi

  • हरभरे वायुकारक, तुरट, हलके, थंड, रुक्ष असून पित्त, रक्तविकार, ताप, कफ आदी विकारांमध्ये गुणकारी ठरतात. हिरवे हरभरे रुचकर, पित्त व कफनाशक, वायुकारक, थंड, तुरट असतात.
  • उन्हाळ्याच्या दिवसात हरभऱ्याची थोडीशी आंब पाण्यात मिसळून ते पाणीप्यावे. उन्हाच्या चटक्याचा, झळीचा त्रास होत नाही. थंडावा, शितलता मिळते.
  • लिंबाच्या रसामध्ये हरभऱ्याची आंब घालून प्यायल्यास अपचनाचा त्रास कमी होतो.
  • हरभऱ्याची आंब गळवावर लावल्यास गळू लवकर पिकते. पिकलेल्या गळवावरही आंब लावल्यास दूषित रक्त दूर होऊन जखम स्वच्छ होते.
  • एक ग्लास पाण्यात दोन चमचे हरभऱ्याची आंब टाकून त्याचे थेंब नाकात टाकावे किंवा त्या पाण्यामध्ये कापूस भिजवून तो नाकावर ठेवल्याने नाकाची सूज बरी होते.
  • विंचवाच्या दंशावर हरभऱ्याची आंब लावल्याने दंश उतरण्यास मदत होते.
  • हरभऱ्याच्या डाळीचे पीठ पाण्यात कालवून शरीराला चोळावे व त्यानंतर स्नान करावे. त्वचा स्वच्छ होते. घामाने येणारी दुर्गंधी नाहीशी होते. कंड सुटणे बंद होते.
  • कोरडी त्वचा असल्यास हरभऱ्याच्या डाळीच्या पिठात दही मिसळून शरीराला मालीश करावे.
  • हरभऱ्याच्या डाळीचे पीठ पाण्यात कालवून त्या मिश्रणाने डोके धुतल्याने डोक्यात सुटणारी खाज, फोड, पुटकुळ्या बरे होतात.
  • त्वचा कांतिमान होण्यासाठी, चेहरा तजेलदार दिसण्यासाठी हरभऱ्याच्या डाळीच्या पिठामध्ये थोडे तूप व थोडे पाणी घालून शरीरास मसाज करावा.
  • शरीरास बल प्राप्त होण्यासाठी, पुष्टी येण्यासाठी हिरवे हरभरे भाजून खावेत.
  • चणे व गूळ एकत्र खाल्ल्याने आवाज सुधारतो. आवाज बसल्यास रात्री झोपण्यापूर्वी भाजलेले चणे खाऊन वर गरम पाणी प्यावे,
  • खोकल्यामुळे ढास लागल्यास रात्री झोपताना भाजलेले चणे खाऊन त्यावर कपभर गरम दूध प्यायल्याने कफ मोकळा होऊन पडतो.
  • अंडकोषाला सूज आली असता बेसन पाण्यात घट्टसर कालवून त्यात मध घालून या मिश्रणाचा अंडकोषावर लेप करावा.
  • बेसनामध्ये गुग्गुळ व हळद घालून गरम करावे व त्या मिश्रणाचे पोटीससोसवेल इतक्या गरम प्रमाणात जांघेतील गाठेवर शेकल्याने गाठ जिरते.

हे सुध्दा वाचा:या खास भांड्यात दही ठेवण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?

हरभऱ्याची आंब तयार कशी करतात?

थंडीच्या मोसमात हरभऱ्याच्या झाडावर रात्रीच्या वेळी दवबिंदू पडतात. अशा वेळेस भल्या पहाटे हरभऱ्याच्या रोपांवर स्वच्छ मलमलचे कापड टाकून है दवबिंदू टिपून घ्यावेत. नंतर एका बरणीत हे मलमलचे कापड पिळून घ्यावे व आंब साठवून घ्यावी. ही आंब कालांतराने सुकते व घन स्वरूपात आपण तिचा वापर करू शकतो. हरभऱ्याची आंब अत्यंत उष्ण, आंबट, किंचित खारट, अग्नीप्रदीपक असून अपचन, पोटदुखी आदी विकारांवर तसेच कॉलरामध्येही फायदेशीर ठरते.

  • ज्यांना मुतखडा व कोडाचा त्रास आहे अशांनी हरभऱ्याचे सेवन वर्ज्य करावे. हरभऱ्याच्या अतिरेकी सेवनाने पोटात गुबारा धरतो. मलावरोधाचा त्रासही होऊ शकतो. कच्चे हरभरे खाताना त्याबरोबर खोबरे व गूळही खावा. त्यावर शक्यतो पाणी पिऊ नये कारण जुलाब होण्याची शक्यता असते.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button