कोजागिरी पौर्णिमेची संपूर्ण माहिती | Kojagiri Purnima Information in Marathi

को- जागर्ती’? म्हणजे ‘कोण जागं आहे ‘ ? अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला ‘कोजागिरी पौर्णिमा’ असे म्हणतात. पौर्णिमा खरंतर मध्यरात्रीच येत असते पण ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असते तिला ” नवान्न ” म्हणजे बोली भाषेत नव्याची पौर्णिमा’ असे म्हणतात. कारण याच वेळेत नवी धान्य आलेली असतात. कोकणा मध्ये तर या दिवशी नव्या तांदळाची खीर करण्याची पद्धत आहे. ही खीर रात्री चंद्रप्रकाशात ठेवली जाते. चाद्रप्रकाशाचे गुण या खिरीत उतरतात व दमा, अस्थमा आशा व्याधी असणाऱ्यांनी ही खीर खाल्याने आराम पडतो असे मानले जाते.

याच दिवसात भात, नाचणी, वरी तसेच झेंडूची फुले व आंब्याची पाने वापरून केलेली माळ घराच्या प्रवेशद्वारावर मोठया उत्साहात लावली जाते. यातून येणाऱ्या नव्या धान्याने स्वागत केले जाते. तसेच या रात्री आटवलेले दूध एकत्रितपणे प्राशन करतात. काव्याशिवाय चांदणे नाही व चांदण्याशिवाय काव्याला तेज नाही हे खरं आहे. म्हणूनच तर ” चांदण्यात फिरताना माझा धरलास हात असे मुलायम रेशीम काव्य निर्माण होते. मग ” चांदणे शिंपित जाशी ” हे योगानेच येते . आशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेला कवीही खूप फुलवत असतात.

कोजागिरी पौर्णिमेची संपूर्ण माहिती | Kojagiri Purnima Information in Marathi

कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते हा प्रश्न पडणे प्रत्येकानं पडतो आणि तो अगदी स्वाभाविक आहे. यासाठीच आज आपण जाणून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमेचे महत्व आणि कोजागिरी पौर्णिमाची संपूर्ण माहिती.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असतो. त्यामुळे चंद्राचे चांदणे हे पृथ्वीवर जास्त पडतात. हे चांदणे अधिक शुद्ध आणि सात्विक असल्याचे म्हटलं जात. खगोलशास्त्रीय दृष्ट्या या दिवसाला फारच जास्त महत्व दिल आहे.

प्राचीन आणि पौराणिक काळाचा विचार करता या दिवसाला फारच जास्त महत्व आहे. कोजागिरी पौर्णिमेेच्या आधी नऊ दिवसाची नवरात्र असते. या 9 दिवसात शक्ति आणि बुद्धीची देवता पार्वती व तिच्या वेगवगेळ्या रुपांची मनोभावी पूजा करण्यात येते. विजयादशमी अर्थात दसरा या दिवशी विजय संपादनासाठी विजयादशमी साजरी केली जाते. यालाच सीमोल्लंघन देखील म्हटलं जातं. त्यानंतर येणाऱ्या या पौर्णिमेपर्यंत शेतीची कामे देखील अर्ध्यावर आलेली असतात. पावसाळा संपून नवी पिके हाताशी येतात. त्यामुळे याचाही आनंद या दिवशी साजरा केला जातो.

कोजागिरी पौर्णिमेबद्दलच्या अनेकांच्या वगवेगळ्या धारणा आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे एक वेगळेच महत्व आहे. दमा आणि अस्थमा असणाऱ्यांसाठीही आजचा दिवस फारच महत्वाचा आहे. दमा असणाऱ्यांनी त्यांच्या औषधाचा डोस कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार केलेल्या दुधात घालावा आणि ते दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवावा आणि मग ते दूध प्यावे. या दुधामधील गुणधर्म हे चंद्रप्रकाशामुळे बदलते. ज्याचा फायदा आपल्याला होतो. थंडीचे दिवस सुद्धा या काळात सुरू होतात त्यामुळे गरम दुधात सुकामेवा घातला जातो. आणी यामुळे दूध प्यायल्याने शरीरात उष्णता टिकून राहते.

Note: जर तुमच्याकडे Kojagiri Purnima in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Kojagiri Purnima information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

error: ओ शेठ