मुळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Radish health benefits in marathi

मुळा (Winters radish) आपल्या आहारात नेहमीच असतो. कधी कच्चा तर कधी त्याची भाजी करून मुळा खाल्ला जातो. मुळ्याची व मुळ्याच्या पानांचीही भाजी केली जाते. मुळ्याचे रायते केले जाते तसेच लोणचेही केले जाते. मुळ्याची पाने चिरून त्यांच्यात बेसनाचे पीठ पेरून त्याची भाजीही करता येते. मुळ्याच्या पातळ चकत्या करून त्यावर मिरपूड व मीठ घालून सकाळी गरमागरम पराठ्यांबरोबर किंवा भाकरीसोबत खाताना वेगळीच मजा येते. मुळ्यांचे पराठे देखील छान असतात.

मुळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Radish health benefits in marathi

  • थंडीमध्ये जेवताना मुळा कच्चा चावून खावा. त्यामुळे जठराग्नी प्रदीप्त होतो.
  • मुळ्याची पाने खाल्ल्याने लघवी भरपूर होते व शौचासही साफ होते. मूळव्याधीचा त्रास असणाऱ्यांनाही याचा फायदा होतो. मुळ्याची पाने हलकी, रुचकर मात्र उष्ण आहेत. ही पाने कच्ची खाल्ल्याने पित्ताचा त्रास वाढतो. लहान मुळा उष्ण, तिखट, रुचकर, हलका, पाचक, त्रिदोषहारक असून ताप, श्वास, नाक, गळा व नेत्ररोग दूर करतो तर मोठा मुळा रुक्ष, गरम,पचण्यास जड, त्रिदोषहारक असतो. मुळ्यांच्या पानाचा रस सारक, मूत्रल तसेच मुतखडा व रक्तपित्तनाशक आहे.
  • कोवळ्या मुळ्याला पाण्यात उकळवून त्यात पिंपळाचे चूर्ण घालून प्यायल्याने अग्नी प्रदीप्त होतो. तसेच अपचनामुळे होणाऱ्या उलट्या, जुलाब बंद होतात. कोवळ्या मुळ्यात साखर घालून प्यायल्याने आम्लपित्त दूर होते.
  • मुळ्याचा रस काढून त्यात लिंबाचा रस घालून प्यायल्याने गॅस होणे किंवा जेवणानंतर पोटाला तडस लागून पोट दुखणे बंद होते.
  • उचक्या लागल्यास सुकलेल्या मुळ्याला गरम पाण्यात उकळवून थोडे थोडे पाणी प्यावयास द्यावे.
  • वायूविकारामुळे पाठीत दुखत असल्यास मुळ्याच्या बीचे चूर्ण खावे.
  • लघवी साफ न होणे तसेच मूत्रावरोध होत असता मुळ्याच्या रसात सोडा बायकार्ब घालून ते पाणी प्यावे.
  • मूळव्याधीचा त्रास असणाऱ्यांनी सुक्या मुळ्याचे पाणी प्यावे आणि सुक्या
  • मुळ्यांची पुरचुंडी करून तव्यावर गरम करून मूळव्याधीच्या मोडावर त्याचा शेक द्यावा. फायदा होतो.
  • अपचन, फेफरे येणे, जीर्ण मलावरोध, जीर्ण शीतपित्त, उदरशूळ, पोटफुगी यांवर मुळ्याचा फायदा होतो.
  • मुळ्याची भाजी करून खाल्ल्याने अजीर्ण, वायूने होणारी पोटदुखी, गॅसेस हे विकार बरे होतात.

हे सुध्दा वाचा:अळूच्या पानाचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?

  • मुळ्याचा रस काढून त्यात गाईचे तूप मिसळून मूळव्याधीवर लावावे किंवा ताज्या मुळ्याच्या चकत्या करून त्या तुपात तळून साखरेबरोबर रोज सकाळी खाल्ल्याने मूळव्याध बरी होते.
  • आम्लपित्त कमी होण्यासाठी मुळा आणि मक्याचा रस काढून त्यात वावडिंगाची पूड, मध आणि खडीसाखर घालून घ्यावे.
  • कर्णशूल झाले असता मुळ्याच्या रसात तिळाचे तेल घालून कढवावे व गाळून घेऊन नंतर त्याचे थेंब कानात सोडावे.
  • पोट दुखत असल्यास मुळा कच्चाच चावून खावा.
  • मुळ्याची कोशिंबीर जेवणात समाविष्ट केल्याने जठराम्री प्रदीप्त होतो.
  • रिकाम्या पोटी मुळा खाऊ नये त्यामुळे पित्ताचा प्रभाव वाढतो. छातीमध्ये दाह होतो. शरदऋतूमध्ये मुळा खाऊ नये.
  • मुळा गरम व शुष्क असल्याने त्याच्या अतिरेकी सेवनाने यकृताचे व मूत्रपिंडाचे नुकसान होते.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button