‘क्युआर’ कोड म्हणजे काय ? आणि तो कधीपासून वापरात आला..| What is ‘QR’ code information in marathi

कालच एका मित्राने माझ्याकडून मागे एकदा घेतलेले पैसे मी त्याला मागितले. आता हा मित्रही कुठेच पैसे घेऊन जात नाही, सारखंच ऑनलाईन पेमेंट करतो. ऑनलाईन वगैरे पैशांची देवाण घेवाण करणं हे मला काही आवडत नाही . पैसे, कसे हातात असले की बरं वाटतं! ऑनलाईन मधलं मला काही कळत नाही. खरंतर मी कधी ऑनलाईन पैसे कोणाला दिले नसल्याने तो जो मला क्युआर कोड वगैरे बद्दल विचारत होता, ते मला काही कळलं नाही. मी त्याला सरळ म्हटलं, हा घे मोबाइल आणि मला तूच दाखव क्युआर कोड म्हणजे काय ते! मग त्याने तर मला पूर्ण क्युआर कोडची माहितीच दिली, आज तिच माहिती तुमच्या समोर मी मांडणार आहे. चला, जाणून घेऊया क्युआर कोड म्हणजे काय ते ?… आणि तो कधीपासून वापरात आला ते….

‘क्युआर’ कोड म्हणजे काय ? | What is QR code in marathi

अमेरिकेत विसाव्या शतकाच्या मध्याला रिटेल आणि फूड या व्यापारात ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’ या डोमेन प्रणालीने स्वतःचं व्यवस्थित बस्तान बसवलेलं नव्हतं. त्यामुळे कुठल्याही वस्तूं बद्दलची वर्गीकृत माहिती आणि त्या वस्तूचं नोंदणीकरण यासाठी वेगळ्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाची गरज होती. त्यामुळे UPC म्हणजे “युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड” या सांकेतिक नोंदणीकरणाचा शोध लागला. पण हे नोंदणीकरण पटकन कळेल आणि सहज वाचता येईल असं नव्हतं. म्हणून ही पद्धती आणखी सोप्पी होण्याच्या दृष्टीने संशोधनाची गरज होती. त्यामुळेच अमेरिकेत अनेक विद्यापीठांमध्ये याविषयी संशोधनाचं आवाहन करण्यात आलं. त्यातल्या ड्रेक्सेल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट मधल्या “नॉर्मन वुडलँड” या हुशार विद्यार्थ्याने आधी अल्ट्राव्हायोलेट शाही वापरून एक पद्धती निर्माण केली, पण ती सामान्य माणसांच्या दृष्टीने खुपच महाग आणि समजण्यासाठी किचकट होती. पण पुढे त्याच विद्यार्थ्याने पुन्हा संशोधन करून ‘क्युआर कोडचा’ शोध लावला.

जपानमध्ये पण डेनसो नावाच्या वाहनांचा व्यापार करणाऱ्या मोठ्या कंपनीने सुरुवातीला बार कोडचा वापर केला. पण त्यात आणखी सुरळीतता येण्यासाठी त्यांनी 1994 मध्ये क्युआर कोडचा शोध लावला. त्यानंतर क्युआर कोड केवळ व्यवसायासाठी सिमीत न ठेवता जपानमध्ये 2002 मध्ये प्रत्येक नागरिकाला क्युआर कोड व्यवहारात सहज उपलब्ध झाला.

आता क्युआर कोड म्हणजे काय तर “क्विक रिस्पॉन्स” याचाच अर्थ लगेचच माहिती देता आणि घेता येईल अशी प्रणाली. सुरुवातीला बारकोडचा वापर केला जायचा. बारकोड म्हणजे सफेद पुष्ट भागावर अनिश्चित रुंदीच्या पण एकाच लांबीच्या उभ्या रेषा आणि डावीकडून उजवीकडे जाणारे अंक. सगळ्याच प्रॉडक्टवर हा बारकोड वापरला जातो. त्यातली प्रॉडक्ट विषयीची माहिती ही सीमित असायची पण क्यूआर कोड आल्यापासून त्या माहितीचा विस्तार अधिक वाचता येऊ शकतो. क्युआर कोडचा फायदा काय होतो? तर आता कमी जागेतही पूर्वीपेक्षा जास्त माहितीचा साठा त्या कोडला स्कॅन करून ग्राहकांपर्यंत पोहोचावता येऊ लागला. या कोडमध्ये फक्त आकडे असतील तर त्यांची संख्या 7089 एवढी तर फक्त अक्षरं असतील 4, 296 एवढी अक्षरं क्यूआर कोडमध्ये साठवता येऊ लागली. यात माहिती टाकण्यासाठी अंक 1, 2, 3, 4 असे इंग्रजीत आकडे असतात तर a,b, c, d अशी इंग्रजी अक्षरं यांना #, @, $ या सांकेतिक भाषेत बदल करून आपल्याला हवा तसा किंवा QR कोड हव्या त्या उपयोगासाठी बनवला जातो.

क्यूआर कोडचे मुख्यतः दोन प्रकार आहे. त्यात पहिला म्हणजे स्टॅटिक क्युआर कोड (Static QR code) तर दुसरं म्हणजे डायनॅमिक क्युआर कोड (Dynamic QR code).

1. स्टॅटिक क्युआर कोड

“स्टॅटिक क्युआर कोड” मध्ये एखादी माहिती, सूचना सर्वसामान्यांना द्यायची असेल तर एखादं पोस्टर, वर्तमानपत्र, टीव्हीवर दाखवलं किंवा छापलं जातं. आतचंच उदाहरण घ्यायचं झालं तर कोविड 19 च्या नियमावलीसाठी क्युआर कोडचा वापर करण्यात आला होता.

2. डायनॅमिक क्युआर कोड –

हा कोड म्हणजे जास्त माहिती असलेला कोड. यात स्टॅटिक कोडपेक्षा जास्त माहिती मिळते. हा आपण तिथल्या तिथे स्कॅन करून पाहू शकतो म्हणून त्याला लाईव्ह क्युआर कोड म्हणतात किंवा युनिक क्युआर कोड असंही म्हणतात. या कोडमुळे आपल्याला कोड स्कॅन करणाऱ्याचं नाव, त्याचां ईमेल आयडी आणि किती वेळा कोड स्कॅन केला आहे आणि त्या कोडचा संवाद रेट त्यातून कळतो.

क्युआर कोडचा शोध जरी व्यापारासाठी, उद्योगासाठी झाला असला. तरी आज, त्याचा वापर अनेक कारणांसाठी केला जातो. क्युआर कोडचा वापर आज पैशांचा व्यवहार करण्यासाठी सहज केला जातो. पण याचा सर्वात प्रथम उपयोग2011 मध्ये “रॉयल डच मिंट” या कंपनीने केला होता. क्युआर कोडच्या मदतीने आपली स्वतःची किंवा इतरांची वेबसाईट लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकतो. क्युआर कोडच्या मदतीने आपण आपलं व्हाट्सॲप, आपल्या कम्प्युटरच्या डेस्कटॉपवर वापरू शकतो. आपल्या वेगवेगळ्या बँक अकाउंटची माहिती ही PhonePay, Paytm इत्यादींचा उपयोग करून व्यवहार करताना आपण क्युआर कोडचा वापर करतो.

कोडच्या मदतीने एका व्यक्तीला फोन नंबर न देता ही आपण मॅसेज करू शकतो. आपल्या घरचा, ऑफिसचा किंवा एखाद्या ठिकाणाचा पत्ता विशिष्ट व्यक्तीला देण्यासाठी आपण क्युआर कोडचा उपयोग करू शकतो. आपल्या महाराष्ट्रातले जिल्हा परिषद शिक्षक “डिसले गुरुजीं” यांनी क्यूआर कोडचा वापर करून आपलं शालेय शिक्षण अतिशय सोप्या पद्धतीने मुलांपर्यंत पोहोचवलं. त्यामुळे त्यांना पुरस्कार ही प्राप्त झाला. महाराष्ट्र पोलिसांनी कोडचा उपयोग करून गुन्हेगारीचं प्रमाण कितीतरी कमी केलं आहे.

एवढ्या सगळ्यासाठी आपण क्युआर कोडचा वापर करतो. पण हां! स्वतःचा क्युआर कोड बनवायचा असेल तर आपल्याला ते सहज उपलब्ध आहे. ते म्हणजे प्ले स्टोअर वरून जास्त रेटिंग असणारी अप्लिकेशन डाऊनलोड करून त्याचा वापर आपण करू शकतो. तर तुम्हाला ही आता क्युआर कोडबद्दल माहिती झालं असेल. मगं कमेंट मध्ये नक्की कळवा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button