कोबी खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Cabbage health benefits in marathi

मित्रांनो स्वयंपाकघरातून जेवणाच्या ताटात हक्काने कोबी (Cabbage) किंवा फ्लॉवरची भाजी येतेच. आठ-दहा दिवसांतून एकदा तरी प्रत्येक घरात कोबी किंवा फ्लॉवरची भाजी शिजते. भारतामध्ये कोबी बारमाही मिळतो. कोबीचे रोप दीड-दोन फूट वाढते. पानावर पाने चढून त्यातून कोबीचा गड्डा तयार होतो. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असा हा कोबी ओली व सुकी भाजी, कोशिंबीर, कोबीवडे आदी अनेक माध्यमातून आपल्या जिभेचे चोचले पुरवतो.

कोबी खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Cabbage health benefits in marathi

  • कोबी मधुर, पचण्यास जड, दीपक, पाचक, पित्त व कफनाशक, वीर्यवर्धक, तसेच गुणांनी थंड तत्त्वाचा आहे.
  • कोबी/फ्लॉवर कफ, पित्त, रक्तविकार, यकृतवृद्धी, पित्तप्रकोप, श्वासविकार, खोकला, प्रमेह, ज्वर, मूत्रकृच्छ, कामोत्तेजक, वातकारक आहेत. कोबीपेक्षा फ्लॉवर अधिक पौष्टिक असतो. मधुमेह्यांनी शिळा कोबी कच्चा चिरून खावा.
  • कोबी चिरून वाफवून घ्यावा. त्यात जिरेपूड, बारीक केलेली कोथिंबीर, गाजराचा कीस घालावा. तापामधून उठलेल्या व्यक्तीची पचनशक्ती मंदावलेली असते अशांनी वरील प्रकारे कोबीची कोशिंबीर बनवून खावी.
  • तहान लागणे, अतिसाराचा त्रास होणे यावर कोबीचा रस व मध यांचे मिश्रण प्यायल्याने आराम मिळतो.
  • काविळ झाल्यास वाफवलेला कोबी खावा.
  • मुत्रकृच्छाचा विकार असणाऱ्यांनी कोबीचा रस धनेपूड घालून दिवसातून तीनवेळा घ्यावा.
  • आम्लपित्ताचा विकार असणाऱ्यांनी कोबीच्या रसामध्ये गाईचे तूप व साखर घालून रोज सकाळी घ्यावा त्यामुळे मस्तकदाह, उदरदाह, मूत्रमार्गाचा दाह तसेच गुदाशय मार्गाजवळ दाह होणेसुद्धा कमी होते.

हे सुध्दा वाचा:हरभरे खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का

  • कोबीचा रस चमचाभर मधातून रोज सकाळी घ्यावा. मधुमेह, काविळ हिरड्यांमधून रक्त वाहणे, हृदयाची धडधड, रक्ती मूळव्याध, मूत्रविकार, पोटाचे विकार, त्वचा कोरडी पडणे आदी विकारांवर याचा फायदा होतो.
  • हृदयाचा दाह, मस्तकशूळ, उदरदाह यांमध्ये कोबीचा रस साखर घालून घ्यावा, फायदा होतो.
  • त्वचा रोग असणाऱ्यांनी (उदाहरणार्थ गाठ येणे, फोड, पुटकुळ्या, मुरुमे येणे) कोबीचे भरीत करून खावे.
  • खोकल्याची ढास लागणे, उबळ येणे यांवर पानकोबीचा रस घ्यावा. यासाठी कोबीचा रस काढून तीन तारी साखरेच्या पाकात घालून त्याचे सरबत करून ठेवावे. कफ, खोकल्याचा त्रास होऊ लागल्यास हे सरबत घ्यावे.
  • कोबीची भाजी वरचेवर आपल्या आहारात ठेवल्यास पोटात गुबारा धरणे, वरचेवर शौचाला लागणे बंद होते.
  • कोबी, फ्लॉवर वातूळ असल्याने गरम मसाला व तेलाची फोडणी देऊन भाजी बनवावी. कोबीच्या अतिरेकी सेवनामुळे काहीजणांना मूत्रावरोधही होतो.
  • कच्च्या कोबीची कोशिंबीर बनवून खाल्ल्याने ‘सी’ जीवनसत्त्व प्राप्त होते.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button