रोहित शर्माबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का? |Amazing facts about Rohit Sharma in Marathi

भारताचा धडाकेबाज आक्रमक सलामवीर कर्णधार रोहित शर्मा हा सध्याच्या आधुनिक टी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूपैकी एक मानला जातो. रोहित शर्माने 2007 मध्ये आयोजित केलेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे पहिल्यांदा प्रतिनिधित्व केले होते. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 च्या टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.

2007 च्या टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग असलेला रोहित शर्मा 2011 च्या आयोजित एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी चर्चेत सुद्धा नव्हता. पण त्यानंतरच्या काळात रोहित शर्माने कठोर परिश्रम घेत भारतीय संघात जोरदार पुनरागमन केले. सध्याच्या घडीला तो भारतीय संघाचा कर्णधार असून T20 क्रिकेटमधील रोहित शर्माची कामगिरी कौतुकास्पद आहे.

सध्याच्या घडीला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या अनेक बाबतीत क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय अशा टी-ट्वेंटी क्रिकेटचा बादशाह आहे आगामी ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित T20 विश्वचषकासाठी रोहित शर्मा पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाहूया या मुंबईकर धडाकेबाज रोहित शर्माचे T20 क्रिकेट मधील काही खास पराक्रम आणि त्याचे विक्रम.

रोहित शर्माबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहे का? |Amazing facts about Rohit Sharma in Marathi

  • सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा धावांच्या बाबतीत अव्वल स्थानी आहे. रोहित शर्माच्या नावावर सर्वात जास्त म्हणजेच 3737 धावा आहेत.
  • क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे टी20 क्रिकेटची एक खासियत म्हणजे, हा अतिशय झटपट खेळ आहे. पण या प्रकारच्या खेळात देखील धडाकेबाज सलामवीर रोहित शर्माच्या नावावर तब्बल 4 शतके आहेत. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये रोहित शर्माची सर्वोत्तम धावसंख्या 118 आहे.
  • भारतीय संघाला सुरुवातीला वेगवान सुरुवात करून देणाऱ्या कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आणखी एक मोठा विक्रम आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान म्हणजेच 35 चेंडू शतक झळकवण्याचा विक्रम संयुक्तपणे रोहित शर्माच्या नावावर आहे. या प्रकारात कर्णधार रोहित शर्मासोबत दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलर आणि मूळ श्रीलंकन पण चेक रिपब्लिक कडून खेळणारा विक्रमसेकरा यांनीही हा पराक्रम केला आहे.

हे सुध्दा वाचा:- विराट कोहली बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

  • 2007 साली आपल्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटची कारकीर्द सुरू करणाऱ्या रोहित शर्माच्या नावावर सर्वात जास्त म्हणजेच 142 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळण्याचा विक्रम आहे. या यादीत पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक हा 124 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिटमॅन नावाने प्रसिद्ध असलेला रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पष्टकारांची कराची बरसात केली आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 178 पष्टकारांची बरसात केली आहे.
  • आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा बाबतीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने 337 चौकार आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत लगावले आहे. यामध्ये प्रथम क्रमांकावर आयर्लंडचा खेळाडू पॉल स्टर्लिंग आहे. त्याने 344 चौकार लगावले आहेत.

Note – मित्रांनो असेच रोचक आणि एज्युकेशनल माहितीसाठी तूम्ही आपल्या Facebook, Instagram आणि YouTube चॅनलला नक्की भेट द्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button