स्वराज्याची सौदामिनी सून ‘महाराणी ताराबाई’ यांच्या जीवनाबद्दल माहिती | Maharani Tarabai biography in marathi

इतिहासाच्या पानांमधील काही महत्वाची पाने अनेकदा काही ना काही कारणांनी दुर्लक्षित ल्यामुळे त्याबद्दलची फा कमी माहिती सर्वसामान्यांना आहे. यामुळे इतिहासातील अनेक कर्तृत्ववान व्यक्तींची नावं आपल्याला माहिती आहेत परंतु त्यांच्या कार्याबद्दल फारशी माहिती नाही. यामध्ये खास करून स्त्रियांची नावं घेता येतील. असंच एक महत्वाचं नाव सध्या सोनी मराठीवर नव्याने सुरु झालेल्या स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेमुळे लोकांच्या चर्चेत आलं आहे ते म्हणजे ‘महाराणी ताराराणी (Maharani Tarabai)’.

स्वराज्याची सौदामिनी सून ‘महाराणी ताराबाई’ यांच्या जीवनाबद्दल माहिती| Maharani Tarabai biography in marathi

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य अत्यंत मेहनतीने सांभाळणाऱ्या राजाराम महाराजांचे सिंहगडावर इ. स. वी. सन 1700 मध्ये निधन झाले. त्यावेळी स्वराज्याची धुरा कोणी सांभाळायची हा गहन प्रश्न निर्माण झाला होता. कारण संभाजी राजांचे पुत्र शाहूराजे औरंजेबेच्या कैदेत असल्याने स्वराज्याला कोणी वाली उरलाच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी आपलं दुःख मागे सारून राजाराम महाराजांची पत्नी ताराराणी यांनी स्वराजाची धुरा सांभाळण्यासाठी पुढे आल्या. आपल्या मुलाला म्हणजेच शिवाजीला गादीवर बसवून त्यांनी राज्यकारभाराची सर्व सूत्र हातात घेतली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची यांची कन्या असणाऱ्या ताराराणीच्या नसानसांत पराक्रम भरला होता. अवघे 24 25 वय असणाऱ्या महाराणी ताराराणी आपल्या पतीचे दुःख बाजूला सारून औरंबाजेबासारख्या क्रूर मुघल सम्राटाशी चार हात करायला सज्ज झाल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत होती, ती फक्त स्वराज्य वाचवायची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि स्वराज्यालाच सर्वस्व मानणाऱ्या मावळ्यांची साथ. याच जोरावर पराजित न होता सलग साडेसात वर्ष त्यांनी औरंजेबशी लढा दिला आणि स्वराज्य साम्राज्याचे केवळ रक्षणच केले नाही तर ते वाढवलेही. याच काळात मराठा सैन्याने नर्मदेपार जाऊन मुघल सैन्याला नामोहरण करून माळवा प्रांतात स्वराज्याचा झेंडा रोवला. या सात वर्षात झालेले शत्रूच्या सर्व हल्ल्यांना समर्थपणे तोंड देत ताराराणींनी विजयाची पताका सतत फडकवत ठेवली.

मावळचा पराभव औरंजेबाच्या जिव्हारी लागल्यामुळे चवताळलेल्या वाघासारखी त्याची अवस्था झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि आता महाराणी ताराराणी या सर्वांकडून हार पत्करायला लागल्यामुळे औरंबाजेबाने सर्व शक्ती पणाला लावून एकाच वेळी सिंहगड, राजगड व तोरणा या गडांना वेढा घातला. सिंहगडाने तीन महिने लढा दिला परंतु अखेरीस 50000 रुपये घेऊन हा किल्ला राठ्यांनी औरंजेबा देला. त्यामुळे एप्रिल 1703 पर्यंत हे तिन्ही किल्ले औरंजेबाच्या ताब्यात आले होते. पण तरीही औरंजेब दुःखीच होता कारण इतकी वर्ष मेहनत घेऊनही त्याला स्वराज्य काही बाळकवता आलं नाही. अखेर 20 फेब्रुवारी 1707 मध्ये तो मरण पावला. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यात पराक्रमी ताराराणींनी सिंहगड, पुरंदर, पन्हाळा, सातारा परळी असे सर्व किल्ले परत मिळवले. एका मोठ्या शत्रूच्या मृत्यमुळे आता स्वराज्य संघर्षातून काहीं प्रमाणात का होईना पण संघर्षातून मुक्त झाला असं वाटत होतं परंतु, या रणरागिणीच्या आयुष्यात मात्र बहुदा देवाने सदैव संघर्षच लिहिला होता.

औरंजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांची सुटका झाली आणि शाहू महाराज व ताराराणी यांच्यामध्ये राजगादीवरून वाद सुरु झाला. एक एक करून अनेक सरदार शाहू राजांना जाऊन मिळाले. धनाजी जाधव शाहू महाराजांच्या बाजूने गेल्यावर मात्र ताराराणी एकट्या पडल्या. पुढे हा संघर्ष चालूच राहिला आणि स्वराज्यामध्ये फूट पडली. कालांतराने ताराराणींनी पन्हाळ्यावर पुन्हा एकदा आपला पुत्र शिवाजी यांना गादीवर बसवून स्वतंत्र राज्य स्थापन केले. पण संघर्ष अजूनही संपला नव्हता. सन 1714 मध्ये राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसबाई आणि त्यांचे पुत्र संभाजी (दुसरे) यांनी अचानक ताराराणींना बाजूला करून राज्यकारभार हातात घेतला व ताराराणी आणि शिवाजी राजांना पन्हाळ्यावर नजरकैदेत ठेवण्यात आले. पुढे 1727 मध्ये नजरकैदेतच शिवाजी राजांचा (दुसरे) मृत्यू झाला.

हे सुध्दा वाचा:- भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या थोर स्वातंत्र्यसेनानी कस्तुरबा गांधी यांच्या जीवनाबद्दल माहिती

आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर ताराराणी अगदीच एकाकी पडल्या होत्या. त्यानंतर स्वराज्यामध्ये अनेक घडामोडी घडल्या अखेर ज्या शाहू राजांशी सत्तेसाठी दोन हात केले स्वराज्य रक्षणासाठी त्याच शाहू राजांच्या आश्रयास राहायचा निर्णय त्यांनी घेतला आणि कोल्हापूर सोडून त्या सातारच्या किल्ल्यावरचा राजवाडा दुरुस्त करून त्या तेथे राहिल्या. पुढेही स्वराज्यामध्ये अनेक घडामोडी घडतच राहिल्या.

स्वराज्याचा पेशवाईपर्यंतचा सर्व प्रवास ताराराणींनी बघितला. पुढे 4 डिसेंबर रोजी 1761 रोजी ताराबाई यांचं निधन झालं. राजाराम महाराजांच्या मृत्यपश्चात न डगमगता परिस्थितीशी दोन हात करून स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या महाराणी ताराराणींचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांचा आदर्श आजच्या प्रत्येक स्त्रीने घ्यायला हवा.

Note: जर तुमच्याकडे Biography of Maharani Tarabai in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Maharani Tarabai information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button