भारतीय वंशाची पहिली महिला गुप्तहेर म्हणजे ‘नूर इनायत खान’ | Noor Inayat Khan information in marathi

हेरगिरी वरच्या अनेक इंग्रजी कादंबऱ्यांमध्ये आपण महिला गुप्तहेरांबद्दल माहिती घेतली असेल. तसेच हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमधून महिला गुप्तहेरांचं दर्शन तुम्हाला झालं असेल. भारतीय चित्रपटसृष्टी मात्र महिला गुप्तहेरांचं आयुष्य आणि त्यांचे कार्य समाजासमोर आणण्यात काहीशी अयशस्वी ठरली आहे. अपवाद फक्त अलीकडच्या काळातील ‘राजी’ या चित्रपटाचा. असं नाही की भारतामध्ये महिला गुप्तहेराचं काम कधी करत नव्हत्या. भारतामध्येही अनेक महिला गुप्तहेरांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

भारतीय वंशाची पहिली महिला गुप्तहेर म्हणजे ‘नूर इनायत खान’ | Noor Inayat Khan information in marathi

भारतीय वंशाची पहिली महिला गुप्तहेर म्हणजे ‘नूर इनायत खान’ (Noor Inayat Khan). म्हैसूरचा राजा टीपू सुलतान यांची वंशज आणि भारतीय सूफी संत हजरत इनायत खान यांची मुलगी असलेल्या नूर यांनी द्वितीय विश्वयुद्धात फ्रान्समध्ये ब्रिटनतर्फे हेरगिरी केली होती. यासाठी तिने नर्स म्हणून काम केले होते. ब्रिटनच्या ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह (एसओई) च्या एजंट होत्या. मात्र दुर्दैवाने 1944 मध्ये त्यांना नाझींनी पळवून नेले. त्यांच्यासोबत बंदी बनवून आणलेल्या सर्व फ्रेंच गुप्तहेरांना ठार मारण्यात आले आणि नूर यांचा 10 महिने प्रचंड छळ करण्यात आला परंतु, त्यांनी कुठलेच रहस्य नाझींना सांगितले नाही आणि नंतर त्यांची हत्या करण्यात आली.

त्यावेळी नूर फक्त 30 वर्षांच्या होत्या. यांच्या मरणानंतर फ्रान्स सरकारने त्यांना जॉर्ज क्रॉस या पुरस्काराने सन्मानित केले होते. नूर यांचे ब्रिटनमधील ब्लूम्सबरी येथील फोर टेविटन स्ट्रीटस्थित निवासस्थान ब्रिटिश सरकारने आजही जतन करून ठेवले आहे. काही दिवसांपूर्वीच ब्रिटिश सरकार ‘ब्लू प्लेक’ देऊन त्यांचा सन्मान करणार असल्याची बातमी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली होती. ‘ब्लू प्लेक’ ही योजना ब्रिटीश हेरिटेज चॅरिटीद्वारे चालविली जाते. यामध्ये इतिहासामध्ये विशेष काम केलेल्या व्यक्तींच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या कामांच्या यादीचा फलक लावण्यात येतो.

‘राजी’ चित्रपटामध्ये आलीय भटने सेहमत खान ही भूमिका केली होती. देशभक्त काश्मिरी व्यावसायिकाची कन्या असणाऱ्या सेहमत खान या स्वत:हून एका पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याशी लग्न करून पाकिस्तानात गुप्तहेर म्हणून जायला तयार झाल्या. हे अत्यंत जोखमीचे काम होते. सहमत यांनी अनेक महत्वाची माहिती भारताला दिली पाकिस्तानमधील वास्तव्यादरम्यान सेहमतला INS विराट बुडवण्याच्या पाकिस्तानच्या योजनेची माहिती भारताला दिली आणि आपल्या देशाचा अभिमान असणारी INS विराट वाचवण्यास मोलाची कामगिरी बजावली. सेहमत यांनी भारतीय गुप्तहेर म्हणून काम पूर्ण केल्यानंतर त्या जीवावरच्या संकटातून वाचून त्या भारतात परत आल्या. त्यावेळी त्या गरोदर होत्या. पुढे त्यांचा मुलगाही भारतीय लष्करात भरती झाला. सेहमत खान या स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला गुप्तहेर होत्या ज्यांनी भारतासाठी महिला गुप्तहेर म्हणून काम केले.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button