Loan Apps Fraud: ऑनलाईन किंवा ॲपवरून कर्ज घेताना घ्या काळजी

आपण बरीच ॲप्स वापरतो आणि त्यात मध्ये मध्ये जाहिराती येत असतात. ज्या जाहिराती लक्ष वेधून घेतात, त्या म्हणजे ‘ऑनलाईन कर्ज मिळेल’. या जाहिराती पाहून जर आपण टेन्शन मध्ये असू तर नक्कीच हरखून जातो. प्रयत्न करून बघूया का, असे विचार मनात येतात. पण कधीकधी हे फसवणुकीचं तंत्रही असू शकतं. त्यामुळे ऑनलाईन कर्ज घेताना काय काळजी घ्यायला हवी आणि का, हे आपण या पोस्टमधे जाणून घेऊया.

ऑनलाईन किंवा ॲपवरून कर्ज घेताना घ्यायची काळजी | loan apps fraud information in marathi

फसवणूक कशी होऊ शकते?

सध्याच्या काळात वैयक्तिक माहिती ही खूप महत्त्वाची मानली जाते, तिला पैशांइतकच महत्व आहे. त्यामुळे ही माहिती सुरक्षित राहणं अत्यावश्यक आहे. आपली सर्व ओळखपत्रं, बँक खात्यासंबंधी वैयक्तिक माहिती इतरांना किंवा अनोळखी लोकांना समजणं अडचणीत आणणारं ठरू शकतं. तुमची वैयक्तिक माहिती बाहेर पसरण्याची आणि तिचा दुरुपयोग होण्याची शक्यता पूर्णपणे या घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे काय काळजी घ्यावी याविषयी पुढील मुद्द्यांमधून नीट जाणून घेऊया.

कर्ज पुरवठा करणारी संस्था मान्यताप्राप्त आहे की नाही

कर्ज देणाऱ्या योग्य संस्थेची निवड करणं ही आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित राहील की नाही, याबद्दल शास्वती मिळविण्याची पहिली पायरी आहे. कर्ज पुरवठा करणारी संस्था मान्यताप्राप्त आहे ना, जास्त कर्जरक्कम आणि कमी व्याजदर अशी माहिती देणारं हे प्रलोभन तर नाही ना, हे आधी तपासून पहायला हवं. ऑनलाइन कर्ज पुरवणारी संस्था वैध आहे की अवैध हे पाहण्याचे काही मार्ग आहेत.

वेबसाईटद्वारे माहिती

कर्जपुरवठा करणाऱ्या या संस्थांची वैधता तपासून पाहण्यासाठी व चौकशी करण्यासाठी त्यांच्या वेबसाईटवर असणारा पत्ता, संपर्क हे तपासून पहावं. यामुळे संबंधित कंपनी प्रत्यक्षात आहे की नाही, बनावट व्यक्ती ही संस्था चालवत आहेत का, हे सुद्धा आपल्याला समजू शकेल. आवश्यकता असल्यास आपण वेबसाइटवरचा संपर्क क्रमांक बघून फोनद्वारे ही कंपनी खरी आहे की खोटी हे पडताळू शकतो.

वेब ॲड्रेस मध्ये `https’ आहे का?

जेव्हा आपण ऑनलाइन कर्ज देणाऱ्या कंपनीच्या वेबसाइटवर जातो, तेव्हा सर्वात आधी आपण वेबॲड्रेस बार नक्कीच पहावा. आपल्याला वेबॲड्रेसमध्ये यूआरएलची सुरुवात ही http न होता https ने होत असेल, तर ती वेबसाइट सुरक्षित आणि एन्क्रिप्टेड समजावी. कारण प्रत्येक कंपनीची वेबसाइट व्यावसायिक दृष्टिकोनातून सुरू केलेली असते. म्हणून ती सुरक्षित असणं हे फार महत्त्वाचं आहे.

संस्थेला मिळालेले अभिप्राय

संबंधित संस्थेबद्दल आधी सेवा घेतलेल्या लोकांनी चांगली-वाईट जी काही मतं नोंदवली आहेत, ती आपण वाचायला हवीत. यामुळे संबंधित संस्थेच्या ऑनलाईन पोर्टलमधल्या त्रुटी काय आहेत, याची कल्पना आपल्याला येते. जर जास्तीत जास्त लोकांनी माहिती चोरी होते आणि सुरक्षितता नाही, असा अभिप्राय नोंदवला असेल तर आपण सतर्क होऊन दुसऱ्या योग्य कंपन्यांचा पर्याय निवडावा.

थर्ड पार्टीचा सहभाग

कर्ज देण्याऱ्या संस्थेत थर्ड पार्टी भागीदार आहे का, हे पाहणं जरुरीचं आहे. त्या कंपन्यांसोबत कोणती माहिती हस्तांतरित करण्यात येते, हेदेखील पहायला हवं. त्या संस्थेची वैधता, ती कंपनी खरी आहे की नाही, ही माहिती तपासणं फायद्याचं ठरतं. कारण बहुतेक या दोन कंपन्यादरम्यान लोकांच्या वैयक्तिक माहितीचं आदानप्रदान होतं आणि त्याबदल्यात पैसे कमावले जातात.

ॲपवरून कर्ज घेण्याचा पर्याय का निवडला जातो?

  • सुलभ अर्ज प्रक्रियेसाठी मूलभूत KYC दस्तऐवजांची आवश्यकता.
  • रक्कमेचं त्वरीत वितरण, हवा तसा परतफेड कालावधी आणि आकर्षक व्याजदर.
  • 4 टक्के क्लोजर चार्जेससह ठराविक काळाच्या आधीच मुदतपूर्व पेमेंट आणि कर्ज बंद करण्याचे पर्याय, असे फायदे असल्यामुळे लोक ऑनलाईन कर्ज मिळवण्यासाठी आग्रही असतात. कोरोना काळात हे प्रमाण खूप वाढलं आहे. हल्ली आपल्याला सगळं सहज आणि झटपट हवं असतं आणि स्मार्टफोनमुळे हे सहज शक्य आहे. आपले जास्तीत जास्त व्यवहार ऑनलाईन होतात. जर अडचणीच्या वेळेस आर्थिक गरज भागवण्यासाठी अशीच ऑनलाईन पैशाची सोय विनासायास होत असेल तर हा पर्याय का वापरू नये, असा विचार लोकं करतात. कारण याआधी कर्ज मिळवणं ही खूप मोठी किचकट गोष्ट होती.

ऑनलाईन कर्ज देणारे ॲप्स

आपल्याला असलेली पैशाची नड भागवण्यासाठी कर्जाची आवश्यकता असतेच म्हणून आयडीएफसी फर्स्ट बँक, कॅश ऑनलाईन, किश्त यासारखी झटकन लोन देणारी ॲप्स प्लेस्टोअरवर उपलब्ध आहेत. पण हे वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा, हे लक्षात घ्यायला हवं. तुम्ही ॲन्ड्रॉईड फोन वापरत असाल तर अर्ज करण्यासाठी पुढील सोप्या पायऱ्या वापरा.

  • गूगल प्ले-स्टोअरवर जाऊन वरील ॲप्स शोधा व स्मार्टफोनवर डाउनलोड आणि इंस्टॉल करा.
  • तुमची गूगल किंवा फेसबुक प्रोफाइल वापरून नोंदणी करा किंवा तिथे दिल्यानुसार ईमेल आयडी आणि पासवर्ड ठेवून एक खाते तयार करा.
  • तुमची मूलभूत माहिती भरा – जसे की नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, वैवाहिक स्थिती, संपर्क तपशील इ.
  • तुमचा रोजगार आणि उत्पन्नाबद्दलचा तपशील म्हणजे तुमच्या सध्याच्या कंपनीचे नाव, पगार इ. माहिती भरा.
  • तुमच्या बँक खात्याची माहिती भरा.
  • कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
  • सबमिट वर क्लिक करा.

ही ऑनलाईन पद्धत सोप्पी तर आहे पण हे सर्व करताना खबरदारी घेऊन योग्य माहिती मिळवून थोडा धीर धरून आपण कर्ज मिळवलं तर पुढे होणारं आपलंच नुकसान आपण टाळू शकतो. माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button