Best SIP plans: दर महिन्याला 1000 रुपयांच्या बचतीपासुन अर्थात गुंतवणुकीतून जमवा 2 कोटीची संपत्ती तसेच यासाठी किती दिवस लागतील.

दर महिन्याला तुम्ही बचत म्हणून म्युच्युअल फंडात जर, तुम्ही 20 वर्षासाठी 1000 रुपये गुंतवले तर तुम्हाला यावर 12 टक्के परतावा मिळत असेल तर, मिळतीप्रमाणे 20 वर्षानंतर तुम्हाला एकूण 9 लाख 99 हजार 148 रुपये मिळतील. 20 वर्षात तुमच्याकडे एकूण 2 लाख 40 हजार रुपये जमा झालेले असतील.

दर महिन्याला 1000 रुपयांच्या बचतीपासुन अर्थात गुंतवणुकीतून जमवा दोन कोटीची संपत्ती तसेच यासाठी किती दिवस लागतील? | Best SIP plans in marathi

कोरोना महामारीनंतर इन्वेस्टमेंट (Investment) चे महत्त्व लोकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे गुंतवणूक आजच्या घडीला भविष्य सुखकर करण्यासाठी महत्त्वाची आहे. या इन्वेस्टमेंट मध्ये काहींना काहीही जोखीम न घेता कमी परतावा हवा असतो. तर काहींना या प्रकाराच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये मोठा परतावा हवा असतो. त्याप्रमाणे अनेक जण बँक व पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.

जर तुम्हाला कमी गुंतवणुकीवर अधिक प्रमाणात परतावा हवा असेल तर म्युच्युअल फंडातील एसआयपी अर्थात म्युचल फंड एसआयपी ( Mutual Fund SIP) हा उत्तम मार्ग असू शकतो. या तुम्ही महिन्याकाठी 1000 रुपये जमा करून 2 कोटीहून अधिक परतावा मिळवू शकता.

म्युच्युअल फंडातील एसआयपी मध्ये किती व्याज मिळते आणि यासाठी किती कालावधी लागतो ?

आजच्या घडीला सुरक्षित गुंतवणुकीसाठी सामान्य वर्ग बँक व पोस्ट ऑफिस मध्ये एफडी (FD) करून घेतात मात्र त्यातून फारसा परतावा मिळत नाही. जर तुम्ही बँक व पोस्ट ऑफिस मध्ये महिन्याकाठी 1000 रुपये जमा करत असाल तर या कालावधीत 2.40 लाख रुपये जमा होतील. जर तुम्ही हीच रक्कम म्युच्युअल फंडात जमा केल्यास तुम्हाला अधिक प्रमाणात नफा मिळेल.

आजच्या घडीला 1000 रुपये ही मोठी रक्कम नाही. कोणताही वर्ग इतके पैसे वाचवू शकतो. म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी (SIP) मध्ये दरमहा 1000 रुपये गुंतवून कोणताही वर्ग करोडपती बनवू शकतो. एसआयपी मधील काही फंडांनी 20 टक्के पर्यंत परतावा दिला आहे. जो कि बँका आणि पोस्ट ऑफिस पेक्षा जास्त आहे.

20 वर्षात एसआयपी (SIP) च्या माध्यमातून तुम्हाला इतका परतावा मिळू शकेल

जर तुम्ही म्युचल फंडात 20 वर्षासाठी हजार रुपये महिन्याकाठी गुंतवले तर तुम्हाला यावर 12 टक्के परतावा मिळत असेल तर या प्रमाणे तुम्हाला 20 वर्षानंतर एकूण 9 लाख 99 हजार 148 रुपये मिळतील.

20 वर्षात तुमच्याकडे एकूण 2 लाख 40 हजार रुपये जमा झाले असतील. त्याचप्रमाणे जर तुम्हाला गुंतवणुकीवर 15 टक्के परतावा मिळत असेल तर, तुम्हाला 15 लाख 15 हजार 995 रुपये मिळतील. दुसरीकडे जर तुम्हाला 20 टक्‍क्‍यांपर्यंत परतावा मिळत असेल तर महिना काठीच्या हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर वीस वर्षानंतर तुम्हाला 31 लाख 61 हजार 479 रुपये मिळतील.

SIP च्या माध्यमातून 30 वर्षानंतर 2.33 कोटी

जर तुम्हाला योग्य गुंतवणुकीवर अधिक प्रमाणात परतावा पाहिजे असेल तर, तुम्हाला यासाठी 30 वर्षासाठी 1000 रुपये महिन्याकाठी जमावे जमा करावे लागतील. 1000 रुपयाच्या एसआयपी मध्ये 30 वर्षानंतर 12% परताव्या प्रमाणे 35 लाख 29 हजार 914 रुपये उपलब्ध होतात. व्याज थोडे जास्त प्रमाणात असल्यास 15% दराने 70 लाख रुपये मिळू शकतात. जर तुम्ही महिन्याकाठी हजार रुपये जमा करून 20 टक्के परतावा मिळाला तर, तुम्हाला तीस वर्षानंतर 2 कोटी 33 लाख 60 हजार 802 रुपये मिळतील. विशेष म्हणजे 30 वर्षात तुमचे फक्त 3 लाख 60 हजार रुपये जमा होतील. त्यावर तुम्हाला एसआयपी (SIP) च्या माध्यमातून हा परतावा मिळेल.

Note- शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत रिस्क असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा नक्की करा आणि मगच गुंतवणूक करा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Investment_Dnyanया पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button