आहाराच्या ‘या’ सवयी तुम्हांला ठेवतील सुदृढ… | 8 good eating habits in marathi

निरोगी राहण्यासाठी केवळ व्यायामचं नव्हे तर परिपूर्ण आहार घेण्याची सवय लावणे व त्याचे पालन करणे देखील गरजेचे आहे. तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये योग्य सवयी अंगीकारल्या, तर आपले आरोग्य आपण चांगलं राखू शकतो. योग्य आहाराबरोबरच, तो कसा घ्यावा हे देखील महत्वाचे आहे. यासाठी काही सवयी उपयोगी ठरू शकतात.

आहाराच्या ‘या’ सवयी तुम्हांला ठेवतील सुदृढ… | 8 good eating habits in marathi

1. आपण काय खातो ह्यावर लक्ष दया

आपल्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ आहेत हे पाहायला हवं. आपण जास्त काय खातो? आहारात जास्त कॅलरीज आहेत का? आणि त्या वापरण्याएवढे कष्ट आपण करतो कां ? जर दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर हो असेल आणि तिसऱ्या प्रश्नाचे नाही असेल तर कमी चरबीयुक्त व पचायला हलका आहार घेणे योग्य आहे. काही मिनिटे काही मुलभूत योगासने करणे फायदेशीर ठरेल.

2. आहारात हिरव्या पालेभाज्या ठरतात महत्त्वाच्या

आहारात हिरव्या पालेभाज्यांच्या समावेश असायला हवा. त्या सहज सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो. यामध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम आणि तंतूमय पदार्थ किंवा फायबर असतात. ज्यामुळे पचन लवकर आणि योग्य होते व पर्यायाने भूक ही चांगली लागते.

3. आहारात प्रथिनांचे प्रमाण सांभाळावे.

शरीराच्या बांधणीसाठी प्रथिने हा महत्वाचा घटक असतो. म्हणून त्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. ब्रोकोली, पालक सारख्या भाज्या, सोयाबीन, मसूर यासारख्या कडधान्यात प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. मांस, मासे व दुग्धजन्य पदार्थांत प्रथिने भरपूर असतात. रोज योग्य प्रमाणात शरीराला प्रथिने मिळतील असा आहार घ्या.

4. अन्न जास्तीत जास्त चावावे

चावून खाणे हा अन्न पचविण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे. बरेच लोक अन्न नीट न चावता खूप गडबडीने खातात. आपण जे खातो ते पचवले जातेच परंतु व्यवस्थित न चावता गिळलेले अन्न पचायला वेळ लागतो आणि ते पचवायला पचनसंस्थेवर जास्त जोर पडतो. याउलट चावून बारीक केलेले अन्न लवकर पचते. आणि चावण्याच्या क्रियेसाठी शरीर ऊर्जा वापरते म्हणून कॅलरीजही खर्च होतात.

5. जेवणाचा आनंद लुटा

बऱ्याच लोकांना जेवताना मोबाईलवर मेसेज करणे, व्हिडीओ पाहणे या गोष्टी करण्याची सवय असते ते बहुतेकदा टीव्हीवर कार्यक्रम बघत असतात. यामुळे आपण किती आहोत याकडे ते लक्ष जात नाही. पोट जरी भरले असेल तरी अजून खाण्याची इच्छा होत असते, म्हणून आपण मर्यादेपलीकडे खातो. हे आपल्या पचनाच्या आणि पर्यायाने आरोग्याच्या दृष्टीने अयोग्य आहे. आता यानंतर जेवण करताना टीव्ही आणि मोबाईलफोन बाजूला ठेवून केवळ जेवणच करायला हवं.

6. नाश्ता आहे आवश्यक

सकाळचा नाश्ता हा दिवसभराच्या आहारातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो. कारण यातून मिळणाऱ्या उर्जेवरच आपण दिवसाच्या कामाची सुरुवात करत असतो, व आपला संपूर्ण दिवस त्यावर अवलंबून असतो. म्हणून भरपेट व पौष्टिक नाश्ता करूनच दिवसाची सुरुवात करायला हवी.

7. पचनशक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ करा

आपण आवडीचं किंवा पथ्य असेल तर त्यानुसार जे काही खातो ते पचणे हे महत्त्वाचं आहे. यासाठी आपल्या पचनशक्तीला चालना देणं फार आवश्यक आहे. जेवण केल्यानंतर आपण थोडा वेळ वज्रासन करायला हवं त्यामुळे पचनशक्ती वाढते. वज्रसनाच्या स्थितीमुळे पोटाचा थोडा भाग असणाऱ्या ओटीपोटातील रक्ताभिसरण वाढते आणि पचनशक्ती सुधारते.

8. जेवतांना पाणी पिण्याचे नियम

आपले शरीर ७५-८०% पाण्याने बनले आहे. हे महत्वाचे आहे की आपल्या शरीराला लागणारे क्षार रोज आपण पित असलेल्या पाण्यातून मिळतात. जेवताना पाणी प्याल्यास पचनाचा वेग कमी होतो. म्हणून जेवणाअगोदर अर्धा तास आणि जेवणानंतर अर्ध्या तासाच्या अंतरानेच पाणी प्यावे.

आहाराविषयी चांगल्या सवयी आपले व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत करतात. म्हणून योग्य सवयी लावून घेऊया आणि आरोग्यपूर्ण जीवन जगूया.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button