भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज ‘जसप्रीत बुमराह’ यांच्या जीवना बद्दल माहिती | Jasprit bumrah biography in marathi

2013 मध्ये बोटावर मोजण्याइतकेच लोक असतील की, जे जसप्रीत बुमराहला ओळखत असेल परंतु आज संपूर्ण जगभरात सर्वोत्कृष्ट गोलंदाजीमध्ये बुमराहने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. जगातील प्रसिद्ध फलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहची एक वेगळीच धास्ती असते. आज भारतीय क्रिकेट संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज जसप्रीत बुमराहचा वाढदिवस आहे. म्हणून आज आपण त्याच्या जीवनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्या जीवना बद्दल माहिती | Jasprit bumrah biography in marathi

जसप्रीत बुमराहचा जन्म 6 डिसेंबर 1993 रोजी अहमदाबाद येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जसबिर सिंह ते एक व्यवसायिक होते. त्याचा आईच नाव दलजीत बुमराह.त्या एक प्राथमिक शिक्षिका होत्या. जेव्हा जसप्रीत अवघ्या सात वर्षांचा होता त्यावेळी त्यांच्या डोक्यावरील त्याच्या वडिलांचे छत्र छाया हरपली. आईने जसप्रीत आणि त्यांच्या बहिणींचा सांभाळ केला. ज्या शाळेत बुमराहची आई शिक्षिका होती त्याच शाळेत बुमराहने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं.

जसप्रीत बुमराहला क्रिकेटची प्रचंड आवड होती. त्याच्या क्रिकेट प्रेमाची सुरुवात त्यांनी घरातूनच केली जस्प्रीत दिवसभर भिंतींच्या दिशेने चेंडू टाकत गोलंदाजी करत असे. एक दिवस आईने वैतागून त्याला सांगितलं जर खेळायचं असेल तर असा बॉल टाक जेणेकरून जास्त आवाज होणार नाही. आणि त्यानंतर जसप्रीत ने गोलंदाजी करण्यासाठी वेगळी स्टाईल शोधली आणि भिंती आयोजित याने फ्लॉवर्स स्कटिंग म्हणजेच फरशीचा खालच्या भागावर बॉलिंग करण्यास सुरुवात केली. यातूनच जसप्रीत ने यॉर्कर गोलंदाजी करण्यास सुरुवात केली.

2013-2014 मध्ये जसप्रीत बुमराहने विदर्भविरुद्ध प्रथम श्रेणीत पदार्पण केले. यावेळी गुजरातकडून खेळत असताना त्याने 7 विकेट्स घेतल्या. मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक जॉन राइट यांनी सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीत प्रथम बुमराहला खेळताना पाहिलं. आणि त्याच्या गोलंदाजीच्या शैलीने ते खूप प्रभावित झाले. आणि लगेच 2013 मध्ये त्याला आयपीएलच्या मुंबई इंडियन्स कडून खेळण्याची संधी मिळाली. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पहिल्या सामन्यात पहिल्या बॉलवर विराट कोहलीला आऊट केल. आणि संपूर्ण सामन्यात त्याने 32 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

जसप्रीत बुमराह बाउन्सर, यॉर्कर बॉल टाकू शकत होता. पण यात तो तरबेज नव्हता शेवटी मुंबई इंडियन्स मधील लसिथ मलिंगाने त्याला गोलंदाजीची शैली सुधारण्यासाठी बरीच मदत केली.

हे सुध्दा वाचा:- भारतीय युवा खेळाडू ‘श्रेयश अय्यर’ यांच्या जीवनाबद्दल माहिती

कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा गोलंदाजी करण्याच्या त्याच्या शैलीमुळे 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला टी-20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. आणि त्याच संधीचा फायदा घेत जसप्रीतने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

T20 फॉरमॅट मध्ये पदार्पण केल्यानंतर अवघ्या सात महिन्यात बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटू डर्क नॅन्सचा जलद 28 विकेट घेण्याचा विक्रम मोडला. आणि पुढे वेस्ट इंडिजविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेत त्याने 28 विकेट घेतल्या.2018 मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध कसोटी सामन्यात खेळत जसप्रीत बुमराह हा 290वा कसोटीपटू ठरला. त्याने या कसोटीत एबी डिव्हिलियर्सची पहिली विकेट घेतली होती.

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आणि जगातील बेस्ट डेथ ओव्हर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह याच्या जीवना बद्दल माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

Note: जर तुमच्याकडे Biography of Jasprit bumrah in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Jasprit bumrah information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button