भारतीय नौदल दिनाविषयी माहिती | Indian navy day information in marathi

नद्या, नाले, प्रपात, धबधबे, जंगल, वनराई, उंच डोंगरांसोबतच सपाट विस्तीर्ण प्रदेशावर पसरलेली शेतांची, पिकांची, तृणांची विस्तीर्ण हिरवी शाल आणि विशाल समुद्र किनारे यांनी परिपूर्ण असलेला भारत देश हा उष्ण कटिबंधात मोडत असल्यामुळे इथे निसर्गाच्या अमाप आणि अतुलनीय देणग्या लाभलेल्या आहेत. कुठलेही स्थानिक आपल्याला लाभलेल्या निसर्ग संपत्तीचा उपयोग किंवा विनियोग आपल्या जीविकेसाठी करतात तसाच तो भारतातही केला जातो. शाल समुद्र किनारे हे तर क्षावधी लोकांच्या पोटापाण्याचे प्रश्न तितक्याच विशालतेने सोडवतात. कारण भारताला लाभलेल्या विस्तीर्ण किनारपट्टीवर सर्व प्रकारचे मासे पकडून ते शहरांकडे किंवा परदेशात पाठवले जातात. समुद्र किनारे दुसऱ्या देशाची सीमा सुद्धा निश्चित करत असल्यामुळे इथे सुरक्षिततेची हमी सुद्धा तितकीच आवश्यक असते. हेच कारण आहे की जमिनीचे रक्षक म्हणजे आर्मी, आकाशाचे रक्षक वायू दल आणि सागराचे रक्षक नौदल अर्थात नेवी या तिन्ही संरक्षण विभागांविषयी सर्व सामान्य माणसाला नेहमीच कुतूहल असतं. त्यातही नेवी म्हणजे नौदलाविषयी खास आकर्षण असतं.

भारतीय नौदल दिनाविषयी माहिती | Indian navy day information in marathi

समुद्रावर राहणारे हे लोक वायुदल किंवा आर्मीतील लोकांपेक्षा खूपच शूर आणि आकर्षक वाटत असतात. पण त्यांच्या या आकर्षकते मागे जशी त्यांची खूप मेहनत असते तशीच नौदलाची म्हणून असलेली एक खास शिस्तही असते. 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे आपल्याला विजय मिळाला होता. हा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला तो दिवस होता 4 डिसेंबर 1971. म्हणून हा दिवस ‘नौदल दिन’ ( Indian navy day ) म्हणून साजरा करण्यात येतो.

नौदलाची सुरुवात वैदिक काळात झाली असं म्हटलं जातं. शत्रू हा एखाद्या संपन्न प्रदेशावर कधीही हल्ला करू शकतो, त्याला अटकाव करण्यासाठी त्या त्या वेळी उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक देशाने आपल्या सीमांचं रक्षण केलं आहे. कालांतराने शत्रूच्या कारवाया कमी आणि समुद्री चाचे म्हणजेच लुटारूंची दहशत अधिक वाढली. या सगळ्यांना नौदल नेहमीच पुरून उरत असतं. आपल्या ज्ञात इतिहासात शिवाजी महाराजांचं आरमार हे किती बळकट होतं हे आपल्याला माहित आहेच. महाराजांच्या आरमाराचे सिधोजी गुजर आणि कान्होजी आंग्रे हे ॲडमिरल होते. त्यांनी इंग्रज, डच आणि पोर्तुगाली सैन्याला इथे घुसू न देता संपूर्ण कोकण तटावर आपली पकड घट्ट केली. कान्होजींच्या मृत्युनंतर आरमारावर जी शोककळा पसरली त्यातून आरमार पुन्हा कधी उभं राहिलंच नाही. भारताच्या नौदलाची निर्मिती सुद्धा याच धर्तीवर करण्यात आली. आज भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचं काम नौदलाकडून होत आहे.

ब्रिटिशांनी 1934 मध्ये ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) ची स्थापना केली. 1953 मध्ये हवेत मारा करणारी शस्त्रं आणि 1967 मध्ये पाणबुड्यांचा समावेश ह्या ताफ्यात करण्यात आला. ब्रिटिशांनी नौदलाची सुरुवात केल्यानंतर युद्ध नौकांची निर्मिती ब्रिटन मध्येच होत होती. स्वातंत्र्यानंतर जहाजांची निर्मिती देशातच करण्यासाठी मुंबईत 1966 साली गोदीची निर्मिती झाली आणि तिथे लढाऊ नौकांची बांधणी सुरू झाली. इथे आजवर 80 युद्धनौका तयार करण्यात आल्या आहेत. त्यात टेहळणी जहाजांपासून विनाशिकेपर्यंत आणि लढाऊ जहाजे, पाणबुडी यांच्यासह युद्धनौकांचाही समावेश आहे.

भारतीय नौदलातील आयएनएस अरिहंत ही पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी आहे. ही अण्वस्त्र माऱ्याला तोंड देण्यासाठी खास तंत्रज्ञानाने घडवली आहे. हिची निर्मिती कलपक्कम इथल्या ‘इंदिरा गांधी सेंटर फॉर ऑटोमिक रिसर्च’ इथे ‘भारतीय नौदल’ आणि ‘संरक्षण संशोधक आणि विकास ऑर्गनायझेशन’ यांच्या एकत्रित प्रयत्नांतून करण्यात आली आहे. कारगिल विजयाच्या सन्मानार्थ 26 जुलै 2009 रोजी हिचा समावेश नौदलाच्या ताफ्यात करण्यात आला.

भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे 155 युद्धनौकांच्या तोफा आहे. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स आणि सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. 200 मरीन कमांडोज आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत.

आता भारतीय नौदलाचे विविध मित्र देशांच्या नौदलासोबत सराव होत असतात. भारताच्या तीन बाजूकडील सीमा ह्या समुद्राने वेढलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला समुद्र मार्गाकडून हल्ला होण्याचा जास्त धोका आहे. 26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईवर हल्ला करणरी कसाबची दहशतवादी टोळी समुद्र मार्गानेच मुंबईत घुसली होती. त्यामुळे आपली भिस्त ही आपल्या या पाण्यावरच्या गरुडांवर अधिक आहे. आपले नौदल हे आपल्याला समुद्रातून होणाऱ्या हल्ल्यांपासून एक तटबंदी करून आपले संरक्षण करीत आहे. त्यातील सर्व सैनिकांना कडक सॅल्यूट….

Note – जर तुम्हाला Indian navy day information in marathi हि माहिती आवडली असेल तर तुम्ही Facebook, instagram आणि sharechat वर शेअर करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button