भारतीय युवा खेळाडू ‘श्रेयश अय्यर’ यांच्या जीवनाबद्दल माहिती | Shreyas iyer biography in marathi

भारताचा प्रभावशाली युवा फलंदाज श्रेयस अय्यर यांचा आज 27 वा वाढदिवस त्यानिमित्ताने आज आपण त्या जीवनाबद्दल जाणून घेणार आहोत.

भारतीय युवा खेळाडू श्रेयश अय्यर यांच्या जीवनाबद्दल माहिती | Shreyas iyer biography in marathi

श्रेयस अय्यरचा जन्म 6 डिसेंबर 1994 ला मुंबईमध्ये झाला. श्रेयसचं संपूर्ण नाव श्रेयस संतोष अय्यर आहे. उजव्या हाताने बॅटिंग बॉलिंग करतो. त्याच्या वडिलांचं नाव संतोष अय्यर आणि आईचं नाव रोहिणी अय्यर आहे. श्रेयसला एक छोटी बहीण पण आहे जिचं नाव श्रेष्ठा अय्यर आहे.

श्रेयस हा एक तमिळ परिवारातील आहे. श्रेयाचा परिवार हा केरळमधील त्रिशूर येथील आहे. वयाच्या दहाव्या वर्षी श्रेयश आयर ने शिवाजी पार्क जिमखाना क्रिकेट अकॅडमीतून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तो बारा वर्षाचा 12 वर्षाचा असताना प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनी श्रेयसला क्रिकेट खेळताना बघितलं आणि श्रेयाच्या उत्कृष्ट खेळीमुळे त्यांनी श्रेयसला प्रशिक्षण द्यायचं ठरवलं. श्रेयस ने जेव्हा सुरुवातीला क्रिकेट खेळ सुरू केला होत, तेव्हा त्याचे मित्र त्यांची तुला वीरेंद्र सेहवाग सोबत करायचे.

श्रेयाच्या वडिलांचे श्रेयसच्या आयुष्यात एक महत्वपूर्ण भूमिका आहे. कारण श्रेयसला लहानपणी फुटबॉल खेळायला आवडायचं, पण श्रेयाच्या वडिलांनी त्याला क्रिकेटर बनण्यासाठी प्रोत्साहित केले. आणि तो आज एक यशस्वी क्रिकेटर आहे.

श्रेश्रेयसचे वडील नेहमी श्रेयाच्या कोचिंग बद्दल आणि त्यांच्या खेळी बद्दल विचारपूस करायचे आणि घरी ते स्वतः त्याची प्रॅक्टिस घ्यायचे. श्रेयाचे प्रशिक्षण प्रवीण आमरे यांच्याशी सुध्दा ते खेळाबद्दल विचारपूस करायचे.

श्रेयसने त्याचं शिक्षण हे ‘पोद्दार इंटरनॅशनल स्कूल’ मधून पूर्ण केलं. त्याने शालेय जीवनात त्यांच्या टीमला बऱ्याच ट्रॉफी ही मिळून दिल्या आहेत. श्रेयस हा ट्रेड ब्रिज क्रिकेट टीमचा सदस्य होता. श्रेयस त्यांच्या बॅटींगमध्ये नेहमी सुधारणा करायचा. 2014 मध्ये श्रेयसने युनायटेड किंग्डमच्या दौऱ्यावर ब्रिज क्रिकेट संघाकडून तीन सामने खेळले होते यावेळी त्यांनी 99 च्या सरासरीने 297 केल्या होत्या आणि या त्यांच्या सर्वाधिक 171 धावा होत्या.

2014 ते 2015 मध्ये श्रेयस यांनी मुंबई संघाकडून प्रथम श्रेणी पदार्पण केले. यावेळी पदार्पणाच्या हंगामात त्याने 50 पेक्षा जास्त सरासरीने 809 धावा केल्या. या हंगामातील तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू सुद्धा ठरला.

2015 च्या आयपीएल लिलावात श्रेयसला दिल्ली डेरडेव्हिल्सने 2 कोटी 60 लाख एवढी किंमत देऊन विकत घेतले होते. आणि आता तो दिल्ली कॅपिटल्स टीमचा खेळाडू आहे. पहिल्याच आयपीएल हंगामात श्रेयस अय्यरने 33.16च्या सरासरीने 439 धावा केल्या.

2016 मध्ये मुंबईकडून खेळत श्रेयसने प्रथम श्रेणीत 1321 धावा केल्या. त्यात त्याचे चार शतकांचा आणि सात अर्धशतकांचा समावेश होता, त्यामुळे तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. तर रणजी ट्रॉफीमध्ये 1300 पेक्षा जास्त धावा करणारा तो दुसरा खेळाडू ठरला.

2017 मधील न्यूझीलंड विरुद्ध श्रेयश अय्यरने टी20 मध्ये पदार्पण केले. त्याला त्यावेळी पहिल्या सामन्यात फलंदाजी मिळाली नाही पण त्याने दुसऱ्या सामन्यात 23 धावा केल्या.

श्रीलंका विरुद्ध डिसेंबर 2017 मध्ये वन-डे मध्ये पदार्पण केल्यानंतर अवघ्या दुसऱ्या डावात अय्यरने 88 धावा केल्या. नंतर 2019 मध्ये परत एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. श्रेयस ने 24 जानेवारी 2020 ला न्यूझीलंड विरुद्ध t20 मॅच मध्ये 29 बॉल मध्ये 58 रन बनवले होते आणि त्याला ह्या मॅच मध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’ चा सन्मान पण मिळाला होता.

नुकताच झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध कसोटी सामन्यात श्रेयश अय्यरने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक करणारा हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

श्रेयश आयर वर एक डॉक्युमेंट्री शॉर्टफिल्म पण बनवलेली आहे जिचं नाव ‘अ फादर्स ड्रीम’ असं आहे. मित्रांनो श्रेयश अय्यर हा एक उत्कृष्ट खेळाडू तर आहेच आणि तो त्याच्या जीवनात नक्की यशस्वी उंच शिखरे गाठेल अशी अपेक्षा करतो.

Note: जर तुमच्याकडे Biography of Shreyas iyer in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Shreyas iyer information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Leave a Comment

error: ओ शेठ