भारतीय क्रिकेट टीमचा स्टार ऑलराऊंडर ‘रवींद्र जडेजा’ यांच्या जीवना बद्दल माहिती | Ravindra jadeja biography in marathi

भारतीय क्रिकेट टीमचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा यांचा आज 31 वा वाढदिवस त्यानिमित्त आज आपण त्याच्या जीवनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

भारतीय क्रिकेट टीमचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा यांच्या जीवना बद्दल माहिती | Ravindra jadeja biography in marathi

रवींद्र जडेजा यांचा जन्म 6 डिसेंबर 1988 मध्ये गुजरात च्या नवग्रामगढ येथे झाला. त्याचा वडिलांचे नाव अनिरुद्ध जडेजा. आणि आईचे नाव लता जडेजा. जडेजाचे वडील हे एका खाजगी कंपनीत चौकीदार होते. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्याच्या मुलाने भारतीय लष्करात दाखल व्हावे. पण नशिबाला हे मान्य नव्हते. दरम्यान काही काळासाठी जडेजा क्रिकेटपासून दूर होता. पण 2005 मध्ये एका अपघातात त्याच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्याने क्रिकेट सोडून दिले. तेव्हा जडेजा फक्त 17 वर्षांचा होता.

जडेजाचे संपूर्ण कुटुंब एका रूमच्या खोलीत राहत होते. ही खोली जडेजाच्या आईला मिळाली होती. कारण त्या एका सरकारी हॉस्पिटलमध्ये नर्स होत्या. आईच्या निधनानंतर जडेजाच्या बहिणीने कुटुंबाची जबाबदारी खूप सांभाळली. त्याच्या बहिणीने आईच्या जागेवर नर्सची नोकरी केली. आज पण जडेजा आपल्या बहिणीच्या खुप जवळ आहे.

रवींद्र जडेजाने 2005-06 मध्ये दलीप ट्रॉफीमधून आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटला सुरुवात केली. तो रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्राच्या संघातून खेळतो. 2008-09 च्या रणजी सिझनमध्ये त्याने 739 धावा आणि 42 विकेट घेण्याची कामगिरी केली. त्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय संघात घेण्यात आले. रवींद्र जडेजाला भारतीय संघात सामील व्हायला आज 12 वर्षा पेक्षा अधिक काळ होऊन गेला आहे.

हे सुध्दा वाचा:- भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज ‘जसप्रीत बुमराह’ यांच्या जीवना बद्दल माहिती

रविंद्र ने 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरची सुरुवात केली. तो एक वन डे सामना होता. त्याने आपल्या पहिल्या वनडे सामन्यात नाबाद 60 धावा केल्या.त्यानंतर काही काळाने त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पाऊल ठेवले. त्याला टेस्ट करियर ची सुरुवात करायला खूप वेळ लागला. त्याने 2012 मध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी आपल्या डावखुऱ्या गोलंदाजीचा फलंदाजीची जबाबदारी सांभाळली. जडेजाने आतापर्यंत 156 वनडे सामन्यात 30.84 च्या सरासरीने 2128 धावा केल्या. त्यात त्याचे 11 अर्धशतक आहेत.

Note: जर तुमच्याकडे Biography of Ravindra jadeja in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Ravindra jadeja information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button