पोस्ट ऑफिसच्या या योजनेत दरमहा 1000 रुपये जमा करा आणि लाखो रुपये…| How to Calculate Compound Interest on Post Office Recurring Deposit?

मित्रांनो पोस्ट ऑफिस आरडी योजना (post office rd calculator) तुम्हाला मोठा निधी तयार करण्यात मदत करू शकते. पोस्ट ऑफिसच्या या आरडी स्कीमवर सध्या 6.5 टक्के व्याज मिळत आहे. कोणतीही व्यक्ती ही आरडी पाच वर्षांसाठी उघडू शकते. यामध्ये तुम्ही जॉईंट किंवा सिंगल खाते उघडू शकता. यामध्ये किमान 100 रुपयांची गुंतवणूक तुम्ही करू शकता आणि जास्तीत जास्त किती पण करु शकता.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत दरमहा 1000 रुपये जमा करा आणि लाखो रुपये |How to Calculate Compound Interest on Post Office Recurring Deposit?

पोस्ट ऑफिसची आरडी स्कीम काय आहे?

पोस्ट ऑफिस आरडी योजना ही मासिक बचत योजना आहे. यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करावी लागेल. ही रक्कम खाते उघडतानाच ठरवली जाते. या योजनेची मुदत साधारणपणे 5 वर्षे असते. तुम्ही मुदत वाढवू शकता.

या योजनेतून मोठा निधी कसा तयार होणार?

उदाहरणार्थ, तुम्ही 5 वर्षांसाठी 1,000 रुपये प्रति महिना आरडी सुरू करता. अशा प्रकारे तुम्ही पाच वर्षांत 60000 रुपये जमा केले आणि सुमारे 11000 रुपये व्याज मिळेल. यानंतर, जर तुम्ही ती आणखी 5 वर्षांसाठी वाढवली तर 1,20,000 रुपये जमा होतील आणि त्यावर सुमारे 49,000 रुपये व्याज मिळेल आणि 1.69 लाख रुपये तुमच्या खात्यात जमा होतील.

हे सुध्दा वाचा:- भाडे करार करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, कोणतीही अडचण येणार नाही

या व्यतिरिक्त तुम्ही 5 वर्षे आणि पुढे वाढवल्यास तुम्ही 1.80 लाख रुपये जमा कराल आणि त्यावर तुम्हाला 1.24 लाख रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे तुम्ही 3.04 लाख रुपये जमा करू शकाल. तर तुम्ही ते आणखी पाच वर्षांसाठी वाढवल्यास तुम्ही 20 वर्षांत 2.40 लाख रुपये जमा करू शकता आणि सुमारे 2.51 लाख रुपये व्याज म्हणून मिळवू शकता. अशा प्रकारे सुमारे 20 वर्षांमध्ये तुम्ही 1000-1000 रुपये गुंतवून एक मोठा फंड तयार करू शकता.

इतर पोस्ट ऑफिस योजना काय आहेत?

RD व्यतिरिक्त, तुम्ही PPF, NSC, KVP, SCSS इत्यादी पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये देखील गुंतवणूक करू शकता.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button