लॅपटॉपची बॅटरी लवकर उतरते, या चुका कारणीभूत ठरू शकतात |How To Improve Battery Health On Laptops

मित्रांनो स्मार्टफोनप्रमाणेच युजर्सला लॅपटॉपच्या बॅटरीबाबत समस्या येऊ शकतात. अनेक वेळा लॅपटॉपची बॅटरी लवकर संपुष्टात येते.लॅपटॉपवर बराच वेळ काम करत असताना, एकतर डिव्हाइस सतत चार्जिंगवर ठेवावे लागते किंवा वारंवार चार्जिंगची समस्या येते. काही गोष्टींची काळजी घेतल्यास लॅपटॉपची बॅटरी (laptop battery tips) दीर्घकाळ चालण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी.

लॅपटॉपची बॅटरी लवकर उतरते, या चुका कारणीभूत ठरू शकतात |How To Improve Battery Health On Laptops

डिस्प्ले ब्राइटनेस

डिस्प्ले ब्राइटनेस प्रत्येक डिव्‍हाइसमध्‍ये बॅटरीच्‍या वापरासाठी जबाबदार असते. मग तो स्मार्टफोन असो किंवा लॅपटॉप. जर तुम्ही जास्त ब्राइटनेसने काम करत असाल तर तसे करणे थांबवा. अति ब्राइटनेसमुळे डोळ्यांवरही परिणाम होतो. कमी ब्राइटनेससह काम करण्याची सवय लावा.

ब्लूटूथ आणि वायफाय सेटिंग

लॅपटॉपमधील ब्लूटूथ आणि वायफाय सेटिंग्ज बॅटरी वापरतात. अशावेळी गरज असेल तेव्हाच वायफाय वापरा. जर तुम्ही नोटपॅडवर लिहित असाल किंवा लॅपटॉपवर इतर कोणतेही काम करत असाल ज्यासाठी इंटरनेटची गरज नाही तर वायफाय सेटिंग बंद ठेवा. त्याचप्रमाणे ब्लूटूथ सेटिंग देखील डिसेबल ठेवा.

बॅकग्राऊंड ॲप्स

लॅपटॉपमध्ये तुम्ही एकावेळी अनेक ॲप्स वापरत असाल तर अनेक वेळा ॲप्स गरज नसतानाही बॅकग्राउंडमध्ये ऑन राहतात.अशा परिस्थितीत हे बॅकग्राउंड ॲप्स डिव्हाइसची बॅटरी कमी करण्याचे काम करतात. तुम्ही टास्क बारवर उजवे क्लिक करून आणि टास्क मॅनेजरवर जाऊन बॅकग्राउंड ॲप्स बंद करू शकता.

हे सुध्दा वाचा:- जर तुम्ही फोन विकण्याच्या तयारीत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुमचे हजारोचे नुकसान होऊ शकतो?

बॅटरी सेव्हर

लॅपटॉपची बॅटरी वाचवण्यासाठी बॅटरी सेव्हरचा पर्याय वापरता येतो. अनेक वेळा लॅपटॉपची बॅटरी कमी असताना चार्जिंगची सुविधा नसते. अशा वेळी बॅटरी सेव्हरचा पर्याय कामी येऊ शकतो.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button