तांबडा भोपळा खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Health Benefits of red Pumpkin in marathi

आरोग्याला अत्यंत उपयुक्त असा तांबडा भोपळा (red Pumpkin) भारतात सर्वत्र होतो. भोपळ्याचे पान मोठे असून त्याला पिवळ्या रंगाची फुले येतात. पिकून तयार झालेला भोपळा गुणकारी असतो. तांबड्या भोपळ्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. भोपळ्याची भाजी अत्यंत स्वादिष्ट होते. भोपळ्यापासून हलवा, सांबार, पापड इतकेच नव्हे तर ‘पेठा’ नावाचा गोड पदार्थही बनवला जातो.

भोपळा सामान्यतः थंड, गोड, पौष्टिक, बलवर्धक, पित्तशामक, रुचकर, मूत्रल व शुक्रवर्धक असून तो श्रमशक्ती वाढविणारा, बलदायक, प्रमेह, मूत्राघात, मुतखडा, रक्तविकार आदी विकारांमध्ये उपयोगी ठरतो. लहान भोपळा थंड व पित्तहारक असून मध्यम भोपळा किंचित कफकारक असतो. मोठा भोपळा हलका, मूत्राशय शुद्धीकारक, सर्व दोषहारक असतो.

तांबडा भोपळा खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Health Benefits of red Pumpkin in marathi

  • भोपळ्याचा रस काढून त्यात गूळ घालून प्यायल्याने दारूचा अंमल ओसरतो.
  • विंचू चावल्यास दंशस्थानी भोपळ्याचा देठ थंड पाण्यात उगाळून लावल्याने आराम वाटतो.
  • आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी भोपळ्याचा रस काढून त्यात साखर घालून प्यावा. फायदा होतो.
  • पोटात जंत झाले असता अग्निमांद्य, भूक न लागणे, शरीर फिके पडणे, रक्तविकार, बेचैनी, थकवा जाणवायला लागतो. अशा वेळेस भोपळ्यांच्या बियांचा गर दुधात वाटून त्यात थोडा मध खलून प्यायला द्यावा किंवा भोपळ्याच्या बियांचे तेल दिवसातून तीनदा दुधाबरोबर प्यावे व त्यावर थोडे एरंडेल तेल घेतल्याने जंत नाहीसे होतात. अशा वेळेस भोजनात हलका आहार घ्यावा. उदा. मुगाची खिचडी, मुगाचे वरण व भात.
  • दम्याचा विकार असणाऱ्यांनी भोपळ्याच्या मुळाचे चूर्ण करून त्यात सुंठेचे चूर्ण कालवून दिवसातून दोनदा घ्यावे.
  • भोपळ्याच्या बी मधील गर काढून त्याचे पीठ तुपात भाजावे व त्यात साखर घालून त्याचे लाडू वळावेत. हे लाडू सकाळी काही दिवस खाल्ल्याने अतिश्रमांमुळे आलेला थकवा, मरगळ, दुर्बलता दूर होते.
  • भोपळ्याची भाजी तुपामध्ये बनवून खाल्ल्याने ज्या स्त्रियांना मासिक स्राव बऱ्याच प्रमाणात जात असेल, किंवा ज्यांच्या शरीराचा दाह होत असेल अशांना फायदा होतो.
  • भोपळ्याचे भस्म करावयाची कृती – पिकलेला भोपळा सोलून त्याचे लहान तुकडे करावेत. ते तुकडे मातीच्या भांड्यात ठेवून भांड्याचे तोंड कापडाने बंद करून त्या कापडावर मातीचा लेप द्यावा. नंतर मंदाग्नीवर दहा- पंधरा मिनिटांपर्यंत भांडे गरम करावे. भांडे गार झाल्यावर भोपळ्याचे तुकडे बाहेर काढून कुटावेत व त्याची भस्मासारखी पूड बनवावी.) भुरकट रंगाच्या भोपळ्याला सोलून त्यातील बी काढून टाकून लहान-लहान तुकडे करावेत. हे तुकडे पाण्यात वाफवून त्यातले पाणी फडक्यावर गाळून घ्यावे. नरम झालेल्या फोडी साखरेच्या पाकात घालून मुरांबा तयार करावा. चक्कर येणे, उन्हाळे लागणे, शांत झोप न लागणे, उष्णतेचे प्रमाण वाढल्याने डोके ठणकणे वगैरे विकारांवर हा मुरांबा गुणकारी ठरतो.
  • भोपळ्याचा हलवा खाल्ल्याने जळजळ, शरीरदाह, लघवीला जळजळणे, पित्तविकार आदींवर गुण येतो.
  • भोपळ्याचे चिमूटभर भस्म सुंठेच्या चूर्णाबरोबर गरम पाण्यातून दिवसातून तीन-चारदा घेतल्यास छाती किंवा शरीरातील कोणताही भाग दुखत असल्यास त्वरित आराम मिळतो.

हे सुध्दा वाचा:वयानुसार शरीरात रक्तातील साखरेची पातळी किती असावी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • पांडुरोग्यांनी आहारात भुरकट रंगाच्या भोपळ्याची भाजी करून खाल्ल्याने पांडुरोग नाहीसा होतो.
  • भोपळ्याचा अवलेह खाल्ल्याने आम्लपित्त, सर्दी, कडकी, साधा खोकला, ताप, रक्तपित्त आदींमध्ये गुण येतो. क्षयरोगी व वीर्य दुर्बल माणसांना याचा विशेष फायदा होतो.
  • अवलेह तयार करण्याची कृती – भोपळ्याच्या फोडी वाफवून, वाटून त्याचा अंदाजे दोन लीटर रस काढावा. त्यात सव्वा किलो साखर, सव्वा किलो तूप, भोपळा वाफवून त्याचे (चार किलों) तुकडे, व पाच लीटर अडुळशाचा रस असे एकत्र करून मंदाग्नीवर घट्ट होईपर्यंत शिजवावे. त्यात आवळा, दालचिनी, वेलची, तमालपत्र, भोरंगमूळ, हिरडा प्रत्येकी दहा ग्रॅम चूर्ण, तसेच सुंठ, धने-मिरी यांचे 40 ग्रॅम चूर्ण, पिंपळीचे 150 ग्रॅम चूर्ण, 350 ग्रॅम मध घालून पाक तयार करावा. हे अवलेह चिनीमातीच्या बरणीमध्ये घालून ठेवावे. प्रकृतीचे तानमान पाहून रोज सकाळी चमचाभर घ्यावे.
  • भोपळ्याच्या सेवनाने शौचास साफ होते. झोप चांगली येते.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button