दररोज एक ग्लास प्या ताक होतील हे फायदे | Health benefits of Buttermilk in Marathi

ताक शरीरात गेल्यानंतर जठर व आतडी यांच्यावर विशेष परिणाम करते. त्यामुळे पचनसंस्था सुधारण्यास मोलाची मदत होते. शरीरात साचलेले विषारी घटक नष्ट होण्याची प्रक्रिया सुरु होते. रक्तशुद्धीचा प्रवास सुरू होतो.ताकामुळे शरीराला शीतलता प्राप्त होते. पित्तप्रकोप शांत होतो आणि शरीरप्रकृती मूळ स्थितीत येण्यास मदत होते.

दररोज एक ग्लास प्या ताक होतील हे फायदे | Buttermilk benefits in marathi

ताक हे गरीबांचे स्वस्त औषध आहे. ताक, भाकरी आणि कांदा, गूळ हा गरीबांचा साधा आहार ! परंतु हाच साधा आहार शरीरातील अनेक दोष दूर करतो. आरोग्य सुद्दढ ठेवतो. जो ताकाचे नियमित सेवन करील तो रोग आणि व्याधींपासून मुक्त होईल. त्याचप्रमाणे जे रोग बरे झाले आहेत ते पुन्हा पुन्हा उद्भवणार नाहीत. ताकाच्या या अलौकिक गुणधर्मामुळे आयुर्वेदात ताकाची महती गायिली आहे. आयुर्वेद म्हणतो की, ज्याप्रमाणे स्वर्गात अमृत देवांना प्रसन्नता देते, त्याप्रमाणे पृथ्वीवर ताक मनुष्याला प्रसन्नता देते.

दुधापासून दही आणि दही घुसळून ताक बनविण्यात येते. ज्यांना दूध आवडत नाही किंवा पचत नाही, त्यांच्यासाठी ताक अत्यंत गुणकारी आहे. ताजे ताक सात्विकतेच्या दृष्टीने उत्तम आहे. आहाराच्या दृष्टीने अतीउत्तम आहे. ताक किती रोगांवर गुणकारी आहे ? थोडक्यात जाणून घेऊया….

शरीरशुद्धी आणि मलशुद्धी

ज्यांना शरीरशुद्धी आणि मलशुद्धी करून घ्यावयाची आहे त्यांनी सर्व आहार बंद करावा आणि केवळ ताकावर राहावे. तिसऱ्या दिवशी शरीरात स्फूर्तीचा अनुभव येतो. उत्साह द्विगुणित होतो. जठर व आतड्यांना आराम मिळाल्यामुळे पचनसंस्था कार्यक्षम बनते. हा प्रयोग सहा महिन्यांतून एकदा जरूर करून पहा औषधापासून दूर रहा.

ताप शरीरात गेल्यानंतर जठर व आतडी यांच्यावर विशेष परिणाम करते. त्यामुळे पचनसंस्था सुधारण्यास मोलाची मदत होते. शरीरात साचलेले विषारी घटक नष्ट होण्याची प्रक्रिया सुरु होते. रक्तशुद्धीचा प्रवास सुरू होतो. ताकामुळे शरीराला शीतलता प्राप्त होते. पित्तप्रकोप शांत होतो आणि शरीरप्रकृती मूळ स्थितीत येण्यास मदत होते.

लठ्ठपणा कमी करा

ताकाचा आणखी महत्त्वाचा उपयोग अतिरिक्त मेद कमी करण्यासाठी होतो. ज्यांना लठ्ठपणा कमी करायचा आहे व अतिरिक्त वजन कमी करायचे आहे, त्यांनी जरूर ताक सेवन करावे. ताकाने केवळ लठ्ठपणा कमी होत नाही, तर शरीराचा वर्णही सुधारतो. कांती तेजस्वी बनते. वृद्धावस्था पुढे ढकलण्याचे सामर्थ्य ताकात आहे. ताकामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत. पडल्यास त्या निघून जातात.

कारणांच्या परिणामी मूळव्याध उद्भवते. अशांनी दुधी भोपळ्याची भाजी नियमाने खावी. मूळव्याधीत आराम पडतो. मात्र दुधी भोपळा कोवळा असावा. त्याने आम्लपित्ताचा त्रासही कमी होतो.

ज्याचा पोटाचा कोठा साफ नाही त्याच्या देहात आरोग्य नांदत नाही, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ सत्य आहे. लहान आतड्याची अन्नरस शोषणाची शक्ती कमी होते. मलबद्धता किंवा आव, आमांश, अपचन यांसारखे विकार उद्भवतात. अशापैकी कोणताही विकार उद्भवला तर जून दुधी भोपळा घ्या. त्याची साल काढून तो किसा आणि तुपावर परतून घ्या. चवीनुसार खडीसाखर, सैंधव, जिरे, मिरे घाला आणि नियमाने सकाळ व संध्याकाळ घ्या. आश्चर्यकारक परिणाम दिसू लागतील. देहस्वास्थ्य सुधारलेले दिसेल. विकारांची लक्षणे दूर झालेली असतील.

संग्रहणीवर तक्रकल्प

ताक आतड्यांना बळ देते. जेव्हा आतडी कमकुवत होतात, खालेले न पचताच बाहेर पडते अशा वेळी केवळ ताकावरच रहावे. संग्रहणी झालेल्या रुग्णास ताकाने अतिशय जलद लाभ होतो. संग्रहणीवर उत्तम उपाय म्हणजे ‘तक्रकल्प’ हा होय ! कमकुवत पचनशक्ती, अग्निमांद्य व संग्रहणी या विकारांत तक्रकल्प ‘हमखास’ लाभ देतो.

कमी आंबट दह्यात तीनपट पाणी घाला. रवीने चांगले घुसळा आणि लोणी काढा. असे लोणी काढलेले ताक पाण्याऐवजी तहान लागेल तेव्हा घ्यायचे. पाण्याचा उपयोग फक्त जेवणानंतर हात व तोंड धुण्यासाठी करावा. पोटात पाणी घेऊ नये. असे एक आठवडा करावे.

दुसऱ्या आठवड्यात अर्धे लोणी काढून घेतलेल्या ताकाचा प्रयोग करावा. पाणी पिऊ नये. त्याऐवजी ताक प्यावे. पहिल्या आठवड्यात आहारात भात, खिचडी, मुगाची डाळ, वाफवलेली-भाजी, भाकरी किंवा पोळी घ्यावी. दुसऱ्या आठवड्यात ताकाचे प्रमाण वाढवावे व आहारात प्रमाण कमी करावे.

रोग वातजन्य असेल तर ताकात सैंधव व सुंठ टाकून ताक प्यावे. पित्तजन्य असेल तर वेलची पूड व साखर मिसळावी आणि कफजन्य असेल तर त्रिकुटाचे चूर्ण मिसळून तक्रकल्प करावा. अर्श, अतिसार किंवा संग्रहणीसारख्या रोगात जिरे, मंद भाजलेला हिंग व सैंधव घालून ताकाचा हा प्रयोग करावा.

भूक वाढली आणि शौचास घट्ट होऊ लागले की, हळूहळू ताकाचे प्रमाण कमी कमी करावे व अन्नाचे प्रमाण वाढवीत जावे. संग्रहणी, अग्निमांद्य, कमकुवत पचनशक्ती या विकारांत तर रोग्यास नवजीवन प्राप्त होते. रोग समूळ जातो.

तक्रप्रयोग करताना घ्यावयाची काळजी

तक्रप्रयोग करताना पुढील गोष्टींची काळजी घ्यावी -अतिभोजन करू नये. प्रवासात तक्रकल्प करू नये. मिरची, मसाले, लसूण, उडीद, कडधान्य, तेलयुक्त पदार्थ, आंबट फळे, काकडी, नारळ खाऊ नयेत. उन्हात जास्त फिरू नये. पाणी पिऊ नये. जागरण करू नये. शरीराला व मनाला विश्रांती देण्याचा प्रयत्न करावा.

ताकात प्रामुख्याने ‘सी’ जीवनसत्त्व असते. ‘सी’ जीवनसत्त्व शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविते. ताकातील लॅक्टिक ॲसिड पचनसंस्थेच्या विकारात लाभदायक ठरते. प्रोटीन आणि लोह कुपोषणात उपकारक ठरते.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button