वयाच्या 5व्या वर्षी गमावले हात आणि पाय, तरीही पूर्ण केलं स्वप्न

मित्रांनो आज मी तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहे. या व्यक्तीला दोन्ही हात आणि दोन्ही पाय नाहीये. हात आणि पाय नसतानाही दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमाने राजा यांनी ते यश मिळवलं. जे हात पाय असणारे पण मिळवू शकत नाही.

दृढनिश्चय आणि कठोर परिश्रम | Success Story Of Raja Mahendra Pratap Singh

‘राजा महेंद्रप्रताप सिंह’ हे पाच वर्षाचे असतानाच त्यांनी त्यांचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय गमावले होते. जेव्हा ते पाच वर्षाचे होते तेव्हा त्याच्या मित्रांनी त्यांच्यासोबत एक शर्यत लावली की कोण विजेच्या तारेला लोखंडी छडीने शिवेल. त्या वयात त्यांना काय माहित की? याचा परिणाम काय होईल. त्यांनी ती लोखंड छडी पकडली जिला विजेची तार चिटकलेली होती आणि शेवटी जे व्हायला नको तेच झालं. महेंद्र यांना करंट लागला आणि ते बेशुद्ध झाले. या घटनेमुळे डॉक्टरांना त्यांचे हात आणि पाय शरीरापासून वेगळे करावे लागले.आणि या घटने नंतर महेंद्र याचं घराच्या बाहेर निघन बंद झालं.तेव्हा ते दहा वर्षापर्यंत घराच्या बाहेरच निघले नाही. त्यांना बाहेर घेऊन जाता येत नसल्याने पण त्यांच्या आई-वडिलांना वाईट वाटायचं. पण पर्याय नव्हता त्यातल्या त्यात घरची परिस्थिती थोडी बिकटच. त्यांना तीन मोठ्या बहिणी होत्या त्यांनी मात्र महेंद्र यांना नेहमी धीर दिला.

महेंद्र सिंह याचं शालेय जीवन

या दहा वर्षात महेंद्र फक्त पुस्तक वाचायचे. ते शाळेत जात नव्हते पण ते घरीच अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचे. नंतर महेंद्र यांना वाटायला लागलं की, असं केल्याने तर आयुष्य घडणार नाही आणि असं चालणार तरी किती दिवस.मग त्यांनी हळूहळू गुडघ्यावर चालायला सुरुवात केली. हातांनी काही गोष्टी उचलायला पण सुरुवात केली. हे सगळं करताना त्यांना खूप समस्यांना सामोरं जावं लागलं. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या आई-वडिलांना तर महेंद्र काही करू शकेल की नाही असं वाटायचं. पण महेंद्र यांनी जे यश मिळवलं ते आश्चर्य वाटण्यासारखं होतं.

प्रयत्न केल्याने यश मिळते

महेंद्र हे काही दिवसानंतर संगणक चालवणं शिकले. त्यांनी जबड्यामध्ये पेन पकडून लिहिण्यास सुरुवात केली. महेंद्र आणि 10वी आणि 12वी मध्ये शाळेत न जाता चांगले गुण मिळवले. 12वी झाल्यानंतर तो दिवस आला होता जेव्हा त्यांना पहिल्यांदा घराबाहेर पडण्याची वेळ आली त्या दिवशी महेंद्र खूप खुश होते. त्याच दिवशी महेंद्र यांनी ठरवलं की आता येणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करायचं.

संधीचं सोनं

अपंग असताना देखील त्यांनी बीकॉम (B.com) आणि त्यानंतर उस्मानिया विद्यापीठातून एमबीए (MBA) पूर्ण केलं. महेंद्र यांना दिल्ली येथील एक संस्था ‘National centre for promotion of employment for disabled people’ यांच्याकडून शिष्यवृत्ती मिळाली. त्यांना त्या शिष्यवृत्ती मुळे 1000 रुपये वर्षाला मिळायचे.

शिक्षण तर झालं पण त्यांना आता खरी गरज होती नोकरीची. मग ते नोकरी शोधण्यासाठी जाऊ लागले. जेव्हा ते नोकरी शोधायला जायचे. तेव्हा त्यांना लोक अपंग समजून नोकरी देण्यास नकार देऊ लागले.शेवटी त्यांना त्यांच्या कठोर मेहनतीने दिल्ली येथील नॅशनल हाऊसिंग बँक मध्ये असिस्टंट मॅनेजरची नोकरी मिळाली. आणि हीच ती वेळ होती वडिलांना मुलावर गर्व वाटण्याची.

सध्या महेंद्र हे अहमदाबाद मधील ओएनजीसी (ONGC)ऑफिस मध्ये Finance and Account officer आहेत. महेंद्र यांना आता सन्मान पण मिळतोय ऑफिस मधील प्रत्येक जण दुसऱ्यांना महिंद्र यांचे उदाहरण देतात. त्यांची मेहनत बघून कंपनीने त्यांना राहायला घर पण दिला आहे.

महेंद्र हे बस,ट्रेन आणि विमानाचा प्रवास कोणाच्या मदतीविना सहजपणे करतात. आता ते एवढे सक्षम आहेत की, ते स्वतः आता अपंग विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देतात. आज त्यांच्या प्रती समाजाचा दृष्टीकोन बदलला आहे. महेंद्र हे आता एक सुखी जीवन जगत आहे.

Note: जर तुमच्याकडे About Raja Mahendra Pratap Singh यांच्या बद्दल अजून माहिती असेल आणि दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Raja Mahendra Pratap Singh success story in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि twitter वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

error: ओ शेठ