हृदयविकार व हिस्टेरियावर गुणकारी सीताफळ | Health benefits Custard Apple in marathi

आजारपणानंतर शरीराला अशक्तपणा जाणवतो, शरीर क्षीण बनते, काम करीत असताना विलक्षण थकवा जाणवतो. मग आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर महागडी टॉनिके लिहून देतात. या महागड्या औषधांऐवजी सीताफळे खा. मासंपेशी क्षीण झाल्यामुळे शरीर कृश आणि अशक्त होते. सीताफळ मांसपेशींची वृद्धी करते. विशेषत: टायफॉईड, मलेरिया अशा तापांमध्ये शरीर विलक्षण अशक्त होते. अशा वेळेस तापविकारातून बरे झाल्यानंतर सीताफळाचे सेवन करावे. माणूस सशक्त आणि पूर्वत होतो.

हृदयविकार व हिस्टेरियावर गुणकारी सीताफळ |Health Benefits Custard Apple in Marathi

सीताफळ म्हणजे ‘शीतफळ’ सीताफळाची प्रकृती थंड आहे. हे शीतफळ अपभ्रंश होत सीताफळ झाले. स्वादाने मधुर आणि पौष्टिक असलेले हे फळ मांसवर्धक, रक्तवर्धक, बलवर्धक आणि मनाला तृप्ती देणारे आहे. पिकलेल्या सीताफळाच्या सालीमध्ये जीवजंतू नष्ट करण्याचा आणि जखम सुकडिण्याचा विलक्षण गुणधर्म आहे. डोक्याचे केस अचानक जातात आणि चाई पडते. अशा ‘चाई’ रोगावर सीताफळाची पाने हा हमखास गुणकारी इलाज आहे.

शक्ती आणि चैतन्यासाठी

आजारपणानंतर शरीराला अशक्तपणा जाणवतो, शरीर क्षीण बनते, काम करीत असताना विलक्षण थकवा जाणवतो; मग आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर महागडी टॉनिके लिहून देतात. या महागड्या औषधाऐवजी सीताफळे खा. मासंपेशी क्षीण झाल्यामुळे शरीर कृश आणि अशक्त होते. सीताफळ मांसपेशींची वृद्धी करते. विशेषत: टायफॉईड, मलेरिया अशा तापांमध्ये शरीर विलक्षण अशक्त होते. अशा वेळेस तापविकारातून बरे झाल्यानंतर सीताफळाचे सेवन करावे. माणूस सशक्त आणि पूर्वत होतो.

हृदयविकार आणि सीताफळ

हृदयविकार असणाऱ्यांसाठीही सीताफळ अतिशय उपयुक्त आहे. हृदयाच्या मांसपेशी दुर्बल झाल्या की, अर्थात हृदयाच्या स्पंदनांवर त्याचा परिणाम होतो. घाबरल्यासारखे वाटते. छातीत कळ येते, छाती भरून आल्यासारखे वाटते. हृदयाच्या मांसपेशी अशक्त झाल्याचा तो परिणाम असतो. सीताफळ हृदयाच्या मांसपेशींना बळकट करते आणि हृदयाची क्रिया नियमित करण्यास मदत करते.

सीताफळात कॅल्शियम, लोह, थायमिन, रीबोफ्लेविन, नियासिन, त्याचप्रमाणे जीवनसत्व बी 1, बी 2 आणि जीवनसत्त्व ‘सी’ असते. साखरेचे प्रमाणही सीताफळात भरपूर असते.लहान मुलांना खाऊ म्हणून सीताफळ द्यावे. सीताफळाच्या गरामध्ये मध एकत्र करून द्यावे. याने लहान मुलांच्या शरीराचे उत्तम पोषण होते आणि मूल गुटगुटीत, सुद्दढ होते. ज्या स्त्रिया मुलाला स्तनपान करतात त्यांनी सीताफळ खावे. त्यामुळे दूध भरपूर सुटते आणि स्तनपान झाल्यामुळे थकवा येतो तो येत नाही.

हिस्टेरिया आणि फेफरे

सीताफळाच्या पानांचा रस हिस्टेरियाने बेशुद्ध झालेल्या रुग्णाच्या नाकात टाकल्यास तो शुद्धीवर येतो. सीताफळाच्या बियांच्या धुराचा उपयोग हिस्टेरिया आणि फेफरे यामुळे आलेल्या मूर्च्छवर होतो. सीताफळाच्या बीचा आतील पांढरा भाग घेऊन तो वाटून कापडात घालून त्याची वात करावी आणि ती पेटवावी. त्याचा जो धूर येईल तो हिस्टरिया अथवा फेफरे येऊन मुच्छित झालेल्या रुग्णाच्या नाकात जाताच तो तत्काळ शुद्धीवर येतो.सीताफळाच्या बीच्या आतील पांढरा भाग वाटून त्याची वात योनीत ठेवल्याने बंद झालेली मासिकपाळी पुन्हा सुरू होते.

थोडक्यात पण खूप महत्वाचे

ज्यांना वारंवार सर्दी आणि खोकला होण्याची सवय जडली आहे, त्यांनी सीताफळ खाऊ नये. रिकाम्या पोटी सकाळी सीताफळ खाऊ नये. विशेषत: फलाहार करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे. सीताफळाच्या पानांचा रस डोळ्यात जाणार नाही, याची काळजी घ्यावी. सूज येणाऱ्या कोणत्याही रोगविकारात सीताफळ खाऊ नये.थोडक्यात चाई, हृदयविकार, उष्णतेचा त्रास, चिघळलेली जखम, हिस्टेरिया व फेफरे यांमुळे आलेली मुर्च्छा यावर सीताफळ गुणकारी आहे.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button