हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे | Drinking hot water benefits in marathi

हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने शरीरात निर्जलीकरण होऊ लागते. अशा स्थितीत गरम पाण्याने शरीरातील आद्र्रता टिकून राहते.

हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे | Drinking hot water benefits in marathi

शरीरासाठी गरम पाणी पिण्याने पुढील महत्त्वपूर्ण फायदे होतात

नाक आणि घशाचा त्रास

हिवाळ्यात कोमट पाणी प्यायल्याने सर्दी खोकला नाक चोदणे यापासून आराम मिळतो. गरम पाण्यात बॅक्टेरियाशी लढण्याची क्षमता असते. ती बॅक्टेरियाच्या संसर्गात प्रतिबंध करते.

पचनक्रिया सुधारते

एका अभ्यासानुसार गरम पाणी प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिक रेट सुधारते. त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या दूर होतात.

वजन घटवणे

वजन कमी करायचे असेल तर दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा. हिवाळ्यात चयापचय मंदावते. त्यामुळे वजन वाढते. अशा स्थितीत गरम पाणी चयापचय वाढवते आणि शरीरात वाढलेली चरबी कमी होते.

वेदनांपासून आराम

अनेकांना थंड हवामानात स्नायूंवर ताण आणि वेदना होतात. जसेजसे तापमान कमी होते तसतसे सांधे आणि हाडे दुखण्याची समस्या वाढते. अशा परिस्थितीत गरम पाण्याने केवळ स्नायूंचा ताण आणि डोकेदुखी मध्ये आराम मिळत नाही, तर मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखणेही कमी होते.

रक्ताभिसरण सुधारते

उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात रक्तदाब जास्त असतो. थंड हवामानात आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि गरम पाणी त्यांना पसरविण्याचे काम करते ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Leave a Comment

error: ओ शेठ