फंडांमेंटल ॲनालिसिस म्हणजे काय? | Fundamental analysis in marathi

एखादी कंपनी कशी काम करते, त्या कंपनी ची आर्थिक स्थिती कशी आहे, ती कंपनी आपल्या प्रतिस्पर्थ्यांच्या तुलनेत किती प्रगती करते, कंपनी वर काही कर्ज आहे का, कंपनी चे वार्षिक उत्पन्न कसे आहे, ते कमी होत आहे कि वाढत आहे, हे जाणून घेणे म्हणजेच फंडामेंटल ॲनालिसिस (Fundamental analysis) होय. थोडक्यात सांगायचे झाले तर कंपनी चे मागचे रेकॉर्ड पाहून कंपनीच्या भविष्यातील प्रगतीचा आढावा घेणे.

फंडांमेंटल ॲनालिसिस म्हणजे काय? | Fundamental analysis in marathi

यासाठी आपण एक सोपे उदाहरण पाहूया. जर आपल्याला पाचवीमध्ये 60 टक्के मार्क पडले, सहावी मध्ये 70 टक्के मार्क पडले, सातवी मध्ये 80 टक्के मार्क पडले तर आठवीमध्ये आपल्याला 90 टक्के मार्क पडण्याची शक्यता जास्त असते. कारण मागच्या रेकॉर्ड प्रमाणे आपण प्रत्येक इयत्तेमध्ये दहा टक्क्यांची वाढ करत आलेला आहात. फंडांमेंटल ऍनालिसिस मध्ये सुद्धा याच प्रकारे मागच्या रेकॉर्डवरून भविष्यातील किमतींच्या हालचालींचा अंदाज बांधला जातो आणि बऱ्याच वेळा हा अंदाज अचूक ठरतो.

बरेच जण स्टॉक खरेदी करताना त्याची वास्तविक किंमत पाहत नाहीत आणि मार्केट मध्ये सध्या जो भाव चालू आहे त्या भावामधे तो खरेदी करतात. सामान्यपणे जर एखादा स्टॉक चर्चेत असेल तर लोक मिळेल त्या भावाला तो खरेदी करतात आणि त्या स्टॉक चा वास्तविक भाव आणि सध्याचा भाव या मध्ये तफावत वाढत जाते. फंडामेंटल ॲनालिसिस आपल्याला त्या स्टॉक ची खरी किंमत काढण्यास मदत करते आणि तो स्टॉक स्वस्त आहे कि महाग हे आपल्याला समजते.

उदाहरणार्थ, जर एखाद्या वस्तूची किंमत १० रुपये आहे पण दुकानदार ती वस्तू 15 रुपयाना विकत आहे आणि तरीही लोक ती वस्तू घेत आहेत म्हणजेच लोकांना त्या वस्तूच्या मूळ किमतीचे ज्ञान नाही किंवा ते त्या कडे दुर्लक्ष करतात कारण जर साठा संपला तर ती वस्तू परत मिळणार नाही अशी भीती त्यांना असते. स्टॉक चे सुद्धा असेच आहे. बऱ्याच जणांना स्टॉक च्या मूळ किमतीचे ज्ञान नसते. फंडांमेंटल ॲनालिसिस द्वारे आपण स्टॉक ची मूळ किंमत काढू शकता आणि एखादा स्टॉक किती किमतीला खरेदी करायचा हे ठरवू शकता.

स्टॉक च्या वास्तविक किमतीला फेअर वॅल्यू असे म्हटले जाते तर सध्या भाव चालू आहे त्याला मार्केट प्राईस असे म्हटले जाते. जर कोणताही स्टॉक त्याच्या फेअर वॅल्यू च्या आसपास मिळाला तर तो अवश्य खरेदी करावा कारण सामान्यपणे स्टॉक ची मार्केट प्राईस हि स्टॉक च्या फेअर वॅल्यू पेक्षा जास्त असते.

प्रत्येक स्टॉक विषयी रोज काही ना काही बातम्या येत असतात आणि त्या नुसार तो स्टॉक कमी जास्त होत राहतो. बरेच जण मार्केट मध्ये फक्त ट्रेडिंग साठी येत नाहीत तर ते लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट सुद्धा करतात कारण त्यांना तो स्टॉक काही वर्षांसाठी होल्ड करायचा असतो. अशावेळी त्या स्टॉक ची भविष्यातील प्रगती समजण्यासाठी फंडांमेंटल ऍनालिसिस मदत करते.

कंपनी ला जर मागच्या काही वर्षांपासून सातत्याने नफा होत असेल तर कंपनी च्या स्टॉक ची किंमत वाढण्याची शक्यता सुद्धा वाढते आणि असे स्टॉक आपण खरेदी करून होल्ड करू शकता. कंपनी च्या फंडामेंटल विषयी जाणून घ्याचे असेल तर आपण कंपनी चा वार्षिक फंडामेंटल रिपोर्ट वाचला पाहिजे. हा रिपोर्ट कंपनी च्या वेब साईट वर किंवा आपल्या ब्रोकर कडे आपल्याला मिळू शकतो. बऱ्याच तिहाईत स्क्रीनर वेब साईट वर सुद्धा हा फंडामेंटल रिपोर्ट आपण पाहू शकता.

हा रिपोर्ट साधारणतः 4 ते 5 पानांचा असतो पण आपण त्यातील फक्त काही महत्वाच्या गोष्टी पाहू शकता जसे कि,

  1. पुढील काही वर्षांचा वित्तीय आराखडा
  2. मॅनेजमेंट डिस्कशन आणि डिसिजन
  3. डायरेक्टर चा रिपोर्ट
  4. प्रॉफिट ऍनालिसिस
  5. कर्जाचा आराखडा
  6. फ्युचर प्लांनिंग


सुरुवातीला हा रिपोर्ट समजण्यास कठीण जाऊ शकतो पण थोड्या सरावाने एकाच रिपोर्ट मध्ये कंपनी बद्दल बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेऊ शकता आणि त्याचा उपयोग चांगले स्टॉक निवडण्यासाठी करू शकता.

Note- मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करतात. या विषयावर आणखी पोस्ट येणार आहेत त्या नक्की वाचा. आणि हो आपल्या Dnyan_shala आणि Shares_dnyan या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button