गाजर खाण्याचे आरोग्यदायी फायदे | Carrot Benefits in Marathi

साथीचे रोग उद्भवल्यास गाजर हे रोगप्रतिबंधकारक लसीसारखे काम करील ! याचे कारण गाजरामध्ये शरीराचे रक्षण करण्याचा अद्भुत गुणधर्म आहे. या गुणधर्मामुळे गाजर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम करते. त्यामुळे रोग शरीरात गेला तरी रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.

डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी गाजराइतके चांगले औषध नाही ! जीवनसत्व ‘अ’ च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा, चष्म्याचा नंबर वाढणे आदि विकार उद्भवतात. गाजरात नेमके जीवनसत्व ‘अ’ भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे गाजराचा रस डोळ्यांसाठी औषधासारखा काम करतो व चष्म्याचा नंबर कमी करतो.डोळ्यांसाठी गाजराचा मोसम असेल तेव्हा लहानांपासून वृद्धांपर्यंत घरातील सर्वांनीच आहारात गाजराचा विपुल उपयोग करावा.

गाजर खाण्याचे आरोग्यदायी फायदे |Carrot Benefits in Marathi

मेंदूसाठी गाजराचा रस

गाजराचा रस मेंदूसाठी फार उत्तम समजला जातो. स्मरणशक्तीचा न्हास, मनाचा चंचलपणा, एकाग्रतेचा अभाव, नैराश्य अशा व्यथांमध्ये मनाचे आणि शरीराचे संतुलन आणण्याचे काम गाजराच्या रसाने उत्तम होईल ! गाजराच्या रसात गोडीसाठी काहीही टाकण्याची आवश्यकता नाही. गोडीसाठी साखर नको आणि खट्टामिट्टा चविष्ट लागावा म्हणून मसाला नको. जसा रस आहे तसा प्या. नैसर्गिक गाजर रस अधिक छान लागतो. रस थोडासा थंडगार करून प्याल्यास शरीराला एक प्रकारचा थंडावाही जाणवतो. रात्री झोपण्यापूर्वी काहीसा थंड रस घेतल्यास आल्हाददायक वाटते आणि झोपही छान येते.

कॅन्सर आणि गाजर रस

पाश्चात्य निसर्गोपचार तज्ज्ञांनी कॅन्सरसारख्या रोगांवर गाजराच्या रसाचे शास्त्रोक्त यशस्वी प्रयोग केले आहेत. भारतीय निसर्गोपचार तज्ज्ञांचे राजराच्या रसाकडे आता लक्ष गेले आहे.गाजर रस, द्राक्ष रस आणि गव्हाच्या रोपांचा रस या तीन रसांच्या सेवनातून अनेकांना कॅन्सरवर मात करता आली आहे, अशी अनेक उदाहरणे आहेत.

पाश्चात्यांनी यावर उत्तम संशोधन केले आहे. त्यांनी सिद्ध केले की, शरीराच्या बाह्य व आंतरत्वचेमध्ये एक आस्तरण धातू असतो. तो शरीराचे रक्षण करीत असतो. शरीररक्षणाप्रमाणेच शरीरातील अतिरिक्त स्राव शोषण करणे आणि मळाचा निचरा करणे आदी कामेही हा आस्तरण धातू करतो. इतका महत्वाचा हा धातू आहे. या धातूला ‘अ’ जीवनसत्त्वाची नितांत आवश्यकता असते. या ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी आस्तरण धातुकोष शुष्क व कठीण होतात. थोडक्यात म्हणजे गंजतात. त्यामुळे शरीरांतर्गत जे स्वाभाविक कार्य घडायला पाहिजे ते होत नाही आणि शरीर व्याधिग्रस्त बनते.

विविध रोगांची शिकार बनते. त्यातून अनेक प्रकारचे रोग उद्भवतात. त्वचेचे रोग उद्भवतात, रांताधळेपणा येतो. मूतखडा होतो. क्षयाची बाधा होते. हाडांचा कणखरपणा जाऊन हाडे नरम होतात. दातांचे विकार जडतात.पोट आणि आतड्याच्या विकारात गाजररस अधिक गुणकारी आहे. ज्यांना मूळव्याध, फिशर यांच्यामुळे गुदद्वाराचा दाह होतो, अशांनी गाजर रख अवश्य घ्यावा.

रक्ती मूळव्याधीवर उपाय

ज्यांना रक्ती मूळव्याधीचा विकार आहे त्यांनी गाजराची आजी तेल किंवा तुपात करावी. त्यात दही किंवा डाळिंबाचा रस टाकावा. रक्ती मूळव्याधीत निश्चितच फायदा होतो. ज्यांच्या अंगावर सूज येते त्यांनी आपल्या आहारात गाजराचा जास्तीत जास्त उपयोग करावा.

जखमेवर गाजर चे पोटीस

जखमेवर गाजराचे पोटीस करून बांधल्याने जखमा भरून येतात. अगदी जुन्या व सडणाऱ्या जखमाही भरून येतात. हा बाह्योपचार प्रभावी आहे.

महत्वाच्या सूचना

गाजराची आतापर्यंत महती सांगितली. आता गाजराचा औषधासारखा उपयोग करताना कोणती काळजी घ्यायला हवी ते सांगतो.

1) गाजर खा. पण त्यावर पाणी पिऊ नका. त्याने खोकला होईल.

2) गाजर जास्त खाल्ल्याने पोटात दुखू लागल्यास मूळ खावा.

3) ज्यांना गॅस ट्रबल आहे, त्यांनी गाजर जास्त खाऊ नये. त्यामुळे गॅस ट्रबल जास्त वाढेल अशांनी कच्चे गाजर खाण्याऐवजी गाजराचा रस घ्यावा.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button