दैनंदिन जीवनात मोबाईल वापरण्याची शिस्त सोडण्यासाठी काही टिप्स |How to Break a Phone Addiction in marathi

आपल्या दैनंदिन जीवनात स्मार्टफोन आता आपल्या गरजेपेक्षा जास्त सवयीचा झाला आहे. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर मोबाईल पाहणे आणि त्यानंतर झोपेपर्यंत व्हिडिओ स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे वेळ तर वाया जातोच. पण खऱ्या जगण्यापासूनही आपण दूर जातो.

मोबाईलचा अतिवापर अर्थात व्यसन सोडण्यासाठी काही टिप्स |How to Break a Phone Addiction in marathi

तुमच्या मोबाईल शिवाय जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. टीव्ही पाहताना, संध्याकाळी घराबाहेर फिरताना किंवा कुटुंबासोबत असताना मोबाईल पाहू नका.

तुमच्या मोबाईल मधील तुम्हाला ज्या ॲप्स खरोखर गरज आहे अश्याच ॲप्ससाठी नोटिफिकेशन ठेवा विशेषतः सोशल मीडिया नोटिफिकेशन बंद ठेवा.

हे सुध्दा वाचा:- वाचलेले लक्षात ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स

तुमचा मोबाईल सहसा चार्जिंग स्विच बेडजवळ असतो. बेडजवळ असलेला स्विचजवळ मोबाईल चार्ज करणार नाही असे मनाला सांगा आणि असे करणे कठीण जात असल्यास बेडची व्यवस्था अश्या ठिकाणी करा जिथे स्विच नसेल.

आपले दैनंदिन कामकाज चालू असताना मोबाईल वापरण्याचं, सोशल मीडिया चेक करण्याचे एक निश्चित वेळापत्रक बनवून ठेवा. केवळ कंटाळा आला म्हणून मोबाईलमध्ये डोके खुपसून बसण्याची अनेकांना सवय असते. अश्यावेळी हातात घेतलेल्या मोबाईलमुळे खूप टाईमपास होतो. मोबाईल विशिष्ट वेळेतच वापरण्याची स्वतःला सवय लावून घ्या. जेणेकरून मोबाईल वापरण्याची शिस्त तुम्हाला स्वतःला लागेल.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Leave a Comment

error: ओ शेठ