मित्रांनो आज आपण क्रिकेटचा रन मशीन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली (Virat Kohli ) बद्दल काही रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत.
विराट कोहली बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहे का?| Facts about Virat Kohli in marathi
- भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याने 12 जून 2010 या दिवशी झिम्बाब्वे विरुद्ध T20 सामन्यात पदार्पण केले.
- T20 सामना सामन्यातील पदार्पणानंतर या धडाकेबाज फलंदाजाची कामगिरी दिवसागणिक वाढत गेली.
- T20 सामन्यांतील आपल्या अतुलनीय कामगिरीच्या बळावर विराट कोहलीने भारतात अनेक आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामन्यांत विजय मिळवून दिला.
- 2012 च्या T20 विश्वचषकात विराट कोहली भारताकडून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर होता.
हे सुध्दा वाचा:- रोहित शर्माबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का?
- 2014 व 2016 चे T-20 विश्वचषक विराट कोहलीला सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
- भारताकडून आंतरराष्ट्रीय T-20 सामन्यांत विराट कोहलीला सर्वाधिक 12 वेळेस सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
- न्यूझीलंडच्या रॉस टेलर नंतर विराट कोहली हा केवळ दुसरा खेळाडू आहे. ज्याने क्रिकेटचे तिन्ही प्रकारात 100 सामने खेळले आहेत.
- विराट कोहली हा टी-20 सामन्यांत सर्वाधिक अर्धशतक झळकवणाऱ्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे.
Note – मित्रांनो असेच रोचक आणि एज्युकेशनल माहितीसाठी तूम्ही आपल्या Facebook, Instagram आणि YouTube चॅनलला नक्की भेट द्या.