तांदूळजा खाल्ल्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Amaranthus spinosus health benefits in marathi

मित्रांनो तांदूळजाची भाजी (Amaranthus spinosus) सर्व प्रकारच्या पालेभाज्यांमध्ये उत्तम प्रतीची औषधी भाजी मानली जाते. ‘सी’ जीवनसत्त्वाची गरज भागवणारी तांदुळजा उत्तम औषधी द्रव्य म्हणून आहार व आरोग्य या दोघांमध्ये उपयोगी ठरते.

तांदूळजा खाल्ल्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Amaranthus spinosus health benefits in marathi

  • लाल व हिरव्या रंगांची तांदुळजाच्या भाजीची पाने लंबगोल, मध्यम आकाराची •व फारशी मोठी नसलेली असतात. तांदुळजाची एक जात ‘काटेरी’ असते. औषधासाठी ह्या तांदुळजाचा वापर करतात…
  • काटेरी तांदुळजाचे पंचांग (पंचांग = (पंच + अंग) मूळ, खोड, पान, फूल, फळ) औषधासाठी वापरतात. तांदुळजा थंड, पचण्यास हलका, रक्तशुद्धीकारक, मलसारक असते तसेच ती रुचकर, अग्नीप्रदीपक, कफ, पित्त, रक्तविकारहारक, विषनाशक असते.
  • रक्तपित्तामध्ये किंवा नाक, गुदद्वारामधून रक्त येत असल्यास तांदुळजाचा रस किंवा काढा तयार करून मधातून सकाळ-संध्याकाळ दिल्याने रक्त येणे बंद होते. रक्तपित्त झाल्यास तांदुळजाची भाजी नियमित खावी.
  • तांदुळजामधील काही अंगभूत गुणधर्म म्हणजे त्यातील रेषा व क्षारद्रव्य. तांदुळजाच्या सेवनाने नरम व मलूल पडलेली आतडी सुदृढ व कार्यक्षम बनतात. आतड्यात चिकटून राहिलेला दुर्गंधीत मळ सुटा होतो व पुढे ढकलला जातो. मलावरोध दूर होतो. मलावरोधत्रस्त असलेल्यांनी तांदुळजाचे सेवन केल्याने त्यांना शौचास साफ होते..
  • तांदुळजाच्या रसात साखर घालून प्यायल्याने त्वचारोग, शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता, कंड सुटणे, डोळे व कानातून गरम वाफा येणे बंद होते.
  • उदररोगामध्ये तांदुळजाचा रस किंवा भाजीचे नित्य सेवन फायदेशीर ठरते.
  • तांदुळजाच्या रसात काळे मिरे वाटून पाजल्याने व तांदुळजाची भाजी खायला घातल्याने शरीरातील विष दूर होते.
  • तांदुळजाचा रस साखर घालून घेतल्याने विंचवाचे विष उतरते तर तांदुळजाच्या मुळाचे चूर्ण दिवसातून दोनदा मधातून चाटवल्याने उंदराचे विष उतरते. तांदुळजाच्या रसात गाईचे दूध घालून प्यायल्याने बचनागाचे विष उतरते तर त्यात साखर घालून घेतल्याने चणोठी नामक विषारी वेलाचे विष उतरते.
  • तांदुळजाच्या मुळांचे पोटीस बनवून नारूवर बांधल्याने नारू जळून जातो.
  • शरीरावर भाजल्याचे व्रण पडले असतील तर लागलीच त्यावर तांदुळजाचा रस चोळल्यास आराम वाटतो.
  • शरीरावरील एखाद्या भागावर सूज आली असेल तेथे तांदुळजाच्या पानांना वाटून त्याचा लेप केल्यास तेथील गोठलेले रक्त सुटे होऊन सूज कमी होते.
  • तांदुळजाचे मूळ गाईच्या दुधात उगाळून डोळ्यात घातल्याने डोळ्यांची आग होणे, नेत्रव्रण, डोळे लाल होणे हे विकार बरे होतात.
  • तांदुळजाच्या रसात साखर घालून प्यायल्याने हातापायांच्या तळव्यांची आग होणे, लघवीच्या जागेची जळजळ होणे, उन्हाळे लागणे हे प्रकार दूर होतात.

हे सुध्दा वाचा:मुळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?

  • तांदुळजाची मुळे वाटून तांदुळाच्या धुवणातून दिल्याने बाळंतीण व गरोदर स्त्रियांना होणारा रक्तस्रावाचा त्रास बंद होतो. तांदुळजाची मुळे वाटून त्यात तांदुळजाचे धुवण व मध घालून प्यायल्याने स्त्रियांचा प्रदररोग बरा होतो.
  • तांदुळजाची भाजी खाल्ल्याने कोड, रक्तपित्त, त्वचाविकार, वातरक्त बरे होतात व शरीरातील अतिरिक्त उष्णता दूर होते.
  • काटेरी तांदुळजाची भाजी खाल्ल्याने मूत्राघातामध्ये होणारा दाह मूत्रवृद्धी होऊन बरा होतो. रक्तविकार व पित्तविकारामध्येही या भाजीचा फायदा होतो.
  • काटेरी तांदुळजाचे क्षार तांदुळजाच्या रसातून तासा-दीड तासाने तीन-चार वेळा दिल्यास मुतखड्यामुळे होणाऱ्या तीव्र वेदना दूर होऊन मूतखडा विरघळून पडून जातो. तसेच मूत्राघात, मूत्रकृच्छ या विकारातही फायदा होतो.
  • तांदुळजाची भाजी खाल्ल्याने तसेच रस प्यायल्याने केस गळण्याचे प्रमाण कमी होते.
  • दिवसातून एक-दोनदा तांदुळजा कच्चा चावून खाल्ल्याने तोंडामधील व्रण (माऊथ अल्सर) व दातांची चिकटा कमी होतो.
  • खोकल्याचा त्रास कमी होण्यासाठी तसेच कोठ्यातील उष्णता कमी व्हावी म्हणून तांदुळजाची भाजी नित्य आहारात ठेवावी.
  • तांदुळजाची भाजी पाण्यात उकळवून व नंतर तुपाची फोडणी देऊनच बनवावी. शक्यतो तेलाचा वापर करू नये.
  • पारायुक्त औषधे, भस्मे, रसायने यांचे औषधामधून सेवन चालू असता तांदुळजाचा आहारात वापर करू नये कारण तांदुळजा या औषधां प्रवाही करून त्यांचे गुणधर्म कमी करतो.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button