महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ‘यशवंतराव चव्हाण’ यांचा जीवन प्रवास | Yashwantrao Chavan Biography in Marathi

महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे श्री. यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांचा जन्म 12 मार्च 1913 ला महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात देवराष्ट्रे गावात झाला.यशवंतराव बलवंतराव चव्हाण यांच्या घरची परिस्थिती तशी हालाखीची, त्यांच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले होते. यशवंतराव यांना तीन भावंडे होती. त्यांचे संगोपन त्यांच्या काकांनी व आईने केले.यशवंतराव चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण हेकराड येथील टिळक महाविद्यालयातून पूर्ण केल्यानंतर ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात दाखल झाले.

1938 च्या सुमारास त्यांनी बी.ए इतिहास आणि राज्यशास्त्रातील पदवी संपादित केली. पुढे त्यांनी कायद्याची पदवी मिळाल्यानंतर कराड येथे गुन्हेगारी वकील म्हणून सराव सुरू केला.

‘यशवंतराव चव्हाण’ यांची माहिती | Yashwantrao Chavan Biography in Marathi

यशवंतराव चव्हाण यांना बालपणापासूनच स्वातंत्र्यसंग्रामाचे आकर्षण होते व ते बाळकडू त्यांना त्यांच्या आईकडून मिळाले होते. आपल्या शाळकरी जीवनात महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत सहभाग नोंदवल्यायामुळे त्यांना दंड आकारण्यात आला होता.

यशवंतराव चव्हाण हे आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक उपक्रमांमध्ये जोडले गेलेले होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर महात्मा गांधी, सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू यांचा प्रभाव होता व पर्यायाने ते काँग्रेसच्या जवळ गेले.

1940 आली ते सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1942 च्या एआयसीसीच्या ( A.I.C.C) मुंबई अधिवेशनात त्यांनी भाग घेतला होता व भारत सोडाचा नारा देण्यात आला. पर्यायाने त्यांना अटक झाली व दोन वर्ष तुरुंगवास घालवल्यानंतर 1944 मध्ये त्यांची सुटका झाली.

तेव्हापासून यशवंतराव यांचे राजकीय जीवन सुरू झाले 1946 आले ते दक्षिण सातारा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले व त्यानंतर त्यांची मुंबई राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या संसदीय सचिवपदी निवड झाली.1957 मध्ये कराड मतदारसंघातून निवडून गेल्यानंतर ते काँग्रेस विधान पक्षाचे नेते म्हणून निवडून गेले आणि द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले.

पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात संयुक्त महाराष्ट्राची मागणी जोर धरू लागली व त्या चळवळीला पाठिंबा देणारे यशवंतराव चव्हाण हे आघाडीवर होते. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. व यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.

यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री झाल्यानंतर कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य भरारी घेत होतं. त्यानंतर त्यांनी भटक्या जमाती म्हणजेच (मागासवर्गीय समाजाला) जो कायम मुख्य प्रवाहापासून दूर होता त्यांना सम प्रवाहात आणण्याचं काम केलं. शाहू,फुले आणि आंबेडकर यांच्या विचारसरणीची प्रेरणा यशवंतराव यांनी महाराष्ट्राला दिली. व महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला त्यांनी विशेष चालना दिली.

महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणून प्रभावी काम केल्यानंतर त्यांना केंद्रात अनेक वेळा विविध कॅबिनेट खात्यावर काम करण्याचा योग आला. त्यामध्ये मुख्यतः गृह, संरक्षण, वित्त आणि परराष्ट्र विभागाच्या सामावेश राहिला.यशवंतराव चव्हाण हे 1962 च्या भारत-चीन सीमा वादाच्या दरम्यान संरक्षणमंत्री म्हणून नियुक्त होते.

पुढे सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत यशवंतराव चव्हाण हे नाशिक मधून बिनविरोध निवडून आले. व 14 नोव्हेंबर 1966 रोजी देशाचे गृहमंत्री म्हणून नियुक्त झाले.त्यानंतर त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवत अनेक पद भूषवली.

जून 1975 साली भारतात आणीबाणी जाहीर करण्यात आली व त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सफाया झाला. त्यानंतर लोकसभेत यशवंतराव विरोधी पक्षनेते झाले व त्यानंतर ते कॉंग्रेसमधून बाहेर पडले. आणीबाणीनंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत दुफळी माजली व काँग्रेसचे विभाजन झाले त्यामध्ये काँग्रेस (इंदिरा) आणि काँग्रेस (उर्स)काँग्रेस (इंदिरा) मधील प्रमुख नेते होते शंकर दयाल शर्मा, उमाशंकर दीक्षित, गुलाबराव पाटील, बॅरिस्टर ए. आर अंतुले आणि बाणीनंतर नव्याने निर्माण झालेल्या काँग्रेस (उर्स ) मध्ये महत्त्वाचे नेते होते देवराज उर्स, कासू ब्रह्मानंद रेड्डी, ए. ॲटनी, शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण.

पुढे चालून काँग्रेस (उर्स ) विघटित झाली व त्यांचे प्रमुख देवराज स्वतः जनता पक्षात सामील झाले व त्यानंतर काँग्रेस (उर्स ) चे नाव बदलून भारतीय काँग्रेस (समाजवादी) करण्यात आले.1980 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने म्हणजेच (इंदिरा काँग्रेस) प्रचंड बहुमत मिळवले. व परत इंदिरा सत्तेत आल्या. त्या निवडणुकीत महाराष्ट्रातून एकमेव खासदार म्हणून यशवंतरावांचा विजय झाला होता.1981 साली यशवंतराव चव्हाण परत काँग्रेसमध्ये परतले व त्यानंतर 1982 मध्ये त्यांना भारताच्या आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले.

यशवंतराव चव्हाण यांचे 25 नोव्हेंबर 1984 ला दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले ते 71 वर्षाचे होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव कराड येथे नेण्यात आले व 27 नोव्हेंबर 1984 ला शासकीय सन्मानाने त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Note: जर तुमच्याकडे Biography of Yashwantrao Chavan in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Yashwantrao Chavan information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

Leave a Comment


close button