जागतिक टपाल दिनाबद्दल माहिती | World Post Day information in marathi

दरवर्षी 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन हा जगभरातून साजरा केला जात आहे. इंटरनेटच्या काळात आजही लोकं टपालसेवेचा वापर करतात आणि त्यावर विश्वास ठेवतात. एका शहरातून दूसरा शहरात किंवा राज्यात टपाल पाठविण्याचं सर्वात सोपं आणि स्वस्त साधन म्हणजे पोस्त सेवा. फक्त देशातच नाही तर जगातील कोणत्याही देशात टपाल पाठविण्यासाठी डाक सेवेचा उपयोग केला जातो.आज आपण जाणून घेणार आहोत या दिनाचा इतिहास आणि हा दिवस का बर साजरा केला जातो.

जागतिक टपाल दिनाबद्दल माहिती | World Post Day information in marathi

जगात दरवर्षी म्हणजेच आजच्या दिवशी म्हणजेच 9 ऑक्टोबरला टपाल दिवस साजरा करण्याचा हेतू एवढाच कि, टपाल सेवा आणि त्यातील विभागांविषयी लोकांना जागरुक करणे.

जागतिक टपाल दिनाचा इतिहास | History of world post day in marathi

युनिवर्सल पोस्टल युनियन ची सुरुवात करण्यासाठी 1874 मध्ये स्विर्झलंडची राजधानी ‘बर्न’ येथे 22 देशांनी मिळून या करारावर सही केली होती. टोकियोत 1969 मध्ये आयोजित केल्या गेलेल्या संमेलनात जागतिक टपाल दिनाची घोषणा करण्यात आली होती. 1 जुलै 1876 ला भारत ‘युनिवर्सल पोस्टल युनियन’ चा सदस्य होणारा पहिला आशियाई देश ठरला.

तंत्रज्ञानासोबत टपाल सेवेत पण होतोय बदल

बदलत्या काळासोबत जगातील सर्व टपाल सेवांनी त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये आवश्यकतेनुसार बदल केले आहेत. नवीन तंत्रज्ञानासह टपाल सेवांनी स्वत: ला अधिक जलद (फास्ट) केलं आहे. एखाद पार्सल किंवा पत्र हे एक्सप्रेसने जाण्याची सेवा सुरु झाली. जवळपास 20 वर्षांपूर्वी या सर्व बदलावांना सुरुवात झाली आणि सर्वच स्थरावर तांत्रिक बदल करण्यात आले. आता ऑनलाईन पोस्टल देवाण- घेवाणीवरही लोकांचा विश्वास वाढला आहे.

‘युपीयु ने केलेल्या एका सर्वेमध्ये अशी माहिती समोर आली की जगभरातून आजच्या घडीला 56 पेक्षा जास्त प्रकारच्या ई- पोस्टल सेवा उपलब्ध आहेत. आज कितीही मोठं तंत्रज्ञानाचं जाळ जरी झालं तरी पोस्ट ऑफिसची गरज आपल्याला असतेच.

Note – जर तुम्हाला World Post Day information in marathi हि माहिती आवडली असेल तर तुम्ही Facebook, instagram आणि sharechat वर शेअर करा.

Leave a Comment

error: ओ शेठ