भारतातील ‘या’ शहरात आहे जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म|world longest railway platform in india information in marathi

आपल्या भारत देशातील सर्वात लांब रेल्वेस्थानक कोणती असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल आज आम्ही तुम्हाला याबद्दल या पोस्ट मध्ये माहिती सांगणार आहोत.

आपल्या भारतातील या शहरात आहे जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म | world longest railway platform in india information in marathi

गोरखपुर जंक्शन हे भारतातील सर्वात लांब रेल्वे स्थानक आहे. सध्याच्या घडीला जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्ममध्ये गोरखपूर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मचे नाव सर्वात पहिले येते. हे प्लॅटफॉर्म भारतातील उत्तर प्रदेश येथे आहे गोरखपूर शहर राप्ती नदीच्या काठावर वसलेले आहे. हे शहर नेपाळ सीमेच्या अगदी जवळ आहे.

या प्लॅटफॉर्मची नोंदणी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे

गोरखपूर हे उत्तर प्रदेश राज्यातील एक मुख्य शहर आहे. उत्तर प्रदेश मधील गोरखपूर शहर हे उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय आहे. जे क्लास A-1 स्थानकाची सुविधा पुरवते. 6 ऑक्टोबर 2013 पासून हे जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म बनले आहे. या प्लॅटफॉर्मची लांबी 1366.33 मीटर एवढी आहे.

या प्लॅटफॉर्मने पश्चिम बंगालमधील खरगपूर रेल्वे स्टेशनचा विक्रम मोडला आहे. खरगपूर रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी 1072 मीटर होती. या खरगपूर प्लॅटफॉर्मचा रेकॉर्ड मोडून या स्टेशनने नवीन विक्रम रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले.

एवढ्या लांबपल्ल्याचा प्लॅटफॉर्म का बनवला गेला?

कोणतीही रेल्वे इतकी लांब नसताना हा प्लॅटफॉर्म इतका लांब का आहे? एवढा लांबलचक प्लॅटफॉर्म का बनवला गेला? असे प्रश्न मनात येतात.

जेव्हा एखादा प्लॅटफॉर्म बनवला जातो तेव्हा तो तिथे असलेल्या जागेवर उपलब्ध असतो. जर आपण गुगलमध्ये पाहिले तर तुम्हाला कळेल की या स्टेशनच्या बाजूला एक मुख्य प्रवेशद्वार आहे. तिथे एक मुख्य रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या पलीकडे एक प्रचंड रेल्वे वर्कशॉप आहे. या परिस्थितीत येथे आलेख रुंदीचा प्लॅटफॉर्म करणे शक्य नाही.

हे सुद्धा वाचा:पोस्टाचा डबा लाल का असतो?

गोरखपूरला मुख्यालय असल्याने येथे गाड्यांची वारंवारता जास्त होती. याच कारणाने याला इतका लांब बनवला गेला की, या प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी 2 ते 3 गाड्या एकत्र थांबता येईल. गोरखपूरला एकच लाईनवर 3 प्लॅटफॉर्म आहेत. 1 नंबर प्लॅटफॉर्म जिथे संपतो तिथून 2 नंबर प्लॅटफॉर्म सुरू होतो आणि 2 नंबर प्लॅटफॉर्मच्या काही अंतरावरच 3 नंबर प्लॅटफॉर्म सुरू होतो.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button