No smoking day चा इतिहास तुम्हाला माहित आहे का? | No smoking day history in marathi

जगभरातील लोकांना धूम्रपान सोडण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी स्मोकिंग डे साजरा (No smoking day) केला जातो. यावर्षी, आज म्हणजेच 8 मार्च रोजी धूम्रपान निषेध दिवस साजरा केला जात आहे. या वर्षीच्या धूम्रपान दिनाचा इतिहास, महत्त्व आणि थीम काय आहे ते आपण या पोस्ट मध्ये जाणून घेऊया. यासोबतच तुम्हाला धूम्रपान सोडण्याच्या महत्त्वाच्या टिप्सची सुद्धा सांगणार आहोत.

धूम्रपान रहित दिवसाचा इतिहास | No smoking day history in marathi

धूम्रपान निषेध दिवस ( No smoking day) हा पहिल्यांदा 1984 मध्ये आयर्लंड मध्ये साजरा करण्यात आला. धुम्रपानाचे दुष्परिणाम लोकांना सांगता यावे आणि धूम्रपान सोडण्यास प्रवृत्त व्हावे, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावर्षीची थीम काय आहे? | No smoking day 2023 theme

नो स्मोकिंग डे 2023 ची थीम ‘क्विट अँड विन’ आहे. नो स्मोकिंग डे 2023 ‘क्विट अँड विन’ या थीमसह स्मोकिंग डेचा मुख्य संदेश प्रसारित करतो आणि लोकांना त्यांच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी धूम्रपान सोडण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करतो.

तंबाखू सेवनामुळे होणारा कर्करोग

तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या कर्करोगामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो, त्यामुळे धूम्रपानामुळे होणाऱ्या हानीबाबत जागरुक राहणे अत्यंत आवश्यक आहे. हृदयाशी संबंधित आजारांमध्ये वाढ हे प्रामुख्याने धूम्रपानामुळे होते.

हे सुद्धा वाचा:- राष्ट्रीय विज्ञान दिनाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का?

धूम्रपान सोडण्याचे मार्ग कोणते आहेत?

  • •धुम्रपानाचे व्यसन सोडण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या वागण्यात बदल करावा लागेल. तुम्हाला धूम्रपान सोडायचे आहे हे ठरवा.
  • हळूहळू सिगारेट ओढणे कमी करा आणि नंतर या व्यसनापासून पूर्णपणे मुक्त व्हा.
  • तुम्हाला सिगारेट ओढल्यासारखं वाटत असेल, त्यामुळे शरीराला निकोटीनची गरज भासू नये म्हणून इतर कामात स्वतःला व्यस्त ठेवा.
  • जर तुम्हाला सिगारेट किंवा तंबाखूचे व्यसन वाटत असेल तर तुम्ही टॉफी किंवा च्युइंगम चघळू शकता.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Leave a Comment

error: ओ शेठ