पोस्टाचा डबा लाल का असतो? |Why post box is red in colour in India

एका पत्राच्या आशेने कित्येक लोक ज्या पोस्टमास्तराची वाट बघायचे, पोस्टाच्या डब्या बाजूला बसायचे त्या पोस्टाची सुरुवात कधी झाली ? कोणी केली आणि पोस्टाच्या पत्रपेटीचा रंग लालच का असतो असे अनेक प्रश्न मनाला पडले आणि मी उत्तरं शोधायला लागलो.

पोस्टाचा डबा लाल का असतो? | Why post box is red in colour in India

आजकाल आपण प्रत्येक वस्तु आपल्या आवडी-निवडीनुसार वेगवेगळ्या कलर्समध्ये बनवून घेतो. त्याप्रमाणे एखाद्याला आवडत असावा म्हणून पोस्ट बॉक्सच्या डब्याचा रंग लाल केला असावा असं अजिबात नाही. यामागेही सायन्स आहे. सायन्सच्या लाइट या धड्यात विविध रंगाचे महत्त्व सांगितले असून त्यात लाल रंगाचा लक्ष वेधुन घेणारा रंग असा उल्लेख केला आहे. त्यामुळे पोस्टाच्या डब्याला लाल रंग देण्याचे हेच खरे कारण आहे. याने तो कुठे ही असला, तरी पटकन दिसतो किंवा लाल रंगाचा डबा शोधणाऱ्यांचे लक्ष वेधुन घेतो.

या पोस्टाच्या डब्याचा रंग वेगवेगळ्या देशात बदललेला दिसतो. व्हिक्टोरिया युगात ब्रिटनमध्ये पोस्ट बॉक्स हिरव्या रंगाचे होते. त्यानंतर 19 व्या शतकाच्या मध्यात त्याचा रंग बदलून लाल करण्यात आला. इंग्रज भारतात येऊन राहु लागले तेव्हा त्यांच्या सोबत कित्येक गोष्टी त्यांनी भारतात आणल्या त्यापैकीच एक म्हणजे पोस्ट. भारतात टपाल यंत्रणेची सुरुवात 1 ऑक्टोबर 1854 मध्ये झाली. तेव्हा पासूनच पोस्टाचा डबा भारतात लाल रंगाचा आहे. भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया आणि इतर काही देशात ही पोस्टाचे डबे लाल रंगाचे आहेत तर अमेरिकेतील पोस्ट डबे निळ्या रंगाचे पाहायला मिळतात. आपल्या देशात म्हैसुरला पहिले पोस्ट ऑफिस सुरू झाले होते.

स्वातंत्र्यानंतर देशातील सर्व सामान्य जनतेला केंद्रस्थानी मानून डाक प्रणालीत काही आमुलाग्र बदल करण्यात आले. यात प्रामुख्याने सर्व सामान्य भारतीयांच्या गरजा लक्षात घेण्यात आल्या. बदलेल्या प्रणालीमुळेच पोस्टाचा वापर सर्व सामान्यांना करणे शक्य झाले. अतिशय अभिमानाची बाब म्हणजे भारतीय डाक जगातील सर्वात मोठी संस्था आहे. देशाच्या प्रगतीत ही पोस्टाचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण राहिले आहे. पोस्टाचा तो लाल डबा किंवा पत्र घेऊन येणारा पोस्टमन म्हणजे देवदूतच असा एकेकाळी समज होता. मुंबईच्या जनरल पोस्ट ऑफिसची स्थापना सन 1794 मध्ये झाली. मुंबई प्रांतासाठी इस्ट इंडिया कंपनीने हे कार्यालय स्थापन केले होते. फ्लोरा फाऊंटन येथील कार्यालयातून हे काम चालायचे.

नवीन जीपीओ इमारत सन 1904 ते सन 1913 या काळात उभारण्यात आली. ही वास्तु आजही दररोज हजारो नागरिकांचे स्वागत करत दिमाखाने उभी आहे. देश स्तरावर टपाल खात्याच्या व्यापकतेचा आढावा घेतला, तर 1 लाख 50 हजाराहून अधिक पोस्ट ऑफिस देशभरात कार्यरत आहेत. यापैकी सुमारे 1 लाख 39 हजार पोस्ट ऑफिस ग्रामीण भागात आहेत. देश स्वतंत्र होतांना 23 हजार 344 पोस्ट ऑफिस प्रामुख्याने शहरी भागांमध्ये होती. स्वातंत्र्यानंतर यामध्ये सुमारे सात पटीने वाढ झाली आहे. साधारणपणे एक पोस्ट ऑफिस 21.56 चौरस किलोमीटर लोकसंख्येला सेवा दिली जाते असे सर्वसाधारण समीकरण असते.म्हणजे अंदाजे एका तालुक्यासाठी एक पोस्ट ऑफिस कार्यरत असते असं म्हणायला हरकत नाही.

आता आपल्या हे लक्षात आले की सर्व सामान्यपणे पटकन डबा पटकन लक्षात येण्यासाठी त्याचा रंग लाल असतो. पण अंतर्गत माहितीसाठी या लाल डब्याचा अर्थ असा असतो, की यातील पत्र हे स्थानिक ठिकाणी वितरित करायचे नाहीत असा होतो. तर मोठ्या शहरात अर्थात मेट्रो सिटीजमध्ये पोहोचवल्या जाणाऱ्या पत्रांसाठी निळ्या रंगाचे बॉक्स, राजधानीच्या शहरांना पाठवायच्या पत्रांसाठी पिवळे बॉक्स, तर जे पत्र स्थानिक पातळीवर वितरित करायचे आहेत त्यासाठी हिरवा बॉक्स असा त्याचा अर्थ असतो.

आज टपाल खाते टपाल सेवेव्यतिरिक्त बँकिंग, विमा, आर्थिक व्यवहारासाठीचे माध्यम झाले आहे. पोस्टाच्या अनेक योजना गुंतवणुकीसाठी फायदेशीर आणि विश्वासार्ह आहेत. ठराविक व्यवहार आजच्या ई-मेलच्या काळातही टपालसेवेच्या मदतीनेच होतात. काळ बदलला त्याप्रमाणे पत्रलेखनाची गरज कमी होऊ लागली तरी पत्रांमधील जिव्हाळा, ती आतुरता, आपल्या माणसांचे हस्ताक्षर याची जी मजा आहे ती सोशल मीडियाच्या, ई-मेलच्या जमान्यात नाही तेच खरं.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

error: ओ शेठ