जागतिक एड्स दिनाबद्दल माहिती | World Aids Day information in marathi

एड्स म्हणजेच HIV हा रोग साधारणतः 70 च्या दशकामध्ये सर्वत्र पसरायला सुरुवात झाली. मुळातच HIV बाधित व्यक्तीकडे दूषित नजरेने पाहिलं जातं त्यात जर का ती स्त्री असेल तर तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत विकृत असतो. स्वतःचा काहीही दोष नसतानाही HIV ग्रस्त झालेल्या अनेक महिला अत्यंत हलाखीचे आणि दुर्दैवी आयुष्य जगताना दिसत आहेत. एचआयव्ही बाधित व्यक्तींचे जीवन कधीच साधे सोपे नसते. या आजारामुळे त्यांचं शरीर आणि मन दोन्हीही होरपळून निघत असतं. अत्यंत पराकोटीच्या शारीरिक आणि मानसिक यातना सहन करत ही नाईलाजाने आपलं आयुष्य कंठतात किंवा निराश होऊन मृत्यूला जवळ करतात.

जागतिक एड्स दिनाबद्दल माहिती | World Aids Day information in marathi

एचआयव्ही/एड्सशी लढा देताना स्त्रीला ‘तिहेरी पातळीवर’ लढा द्यावा लागतो – वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक, वैयक्तिक पातळीवर त्या विनाकारण स्वतःला दोष देत राहतातच याशिवाय कुटुंबाकडून होणारी अवहेलना आणि समाजाकडून नाकारलं गेल्यामुळे या महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

अगदी सुरुवातीपासून एचआयव्ही/एड्सचा संबंध ‘लैंगिक गैरवर्तन’ आणि ‘प्रॉमिस्क्युटी’ म्हणजेच ‘स्वैरसंबंध’ यांच्याशी जोडला गेला आहे. एचआयव्ही होण्याचे प्रमुख कारण जरी असुरक्षित लैंगिक संबंध असले तरी केवळ या एकमेव कारणामुळे एचआयव्ही होत नाही. एचआयव्ही तीन कारणांनी होऊ शकतो. असुरक्षित लैंगिक संबंध, एचआयव्ही बाधित महिलेकडून तिच्या मुलाला आणि एचआयव्ही बाधित व्यक्तीला दिले गेलेल्या इंजेक्शनची सुई आणि सिरीज वापरल्यामुळे या तिसऱ्या प्रकारात काहीही दोष नसताना व्यक्ती एचआयव्ही बाधित होते. स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं तर, लैगिक अत्याचार, बलात्कार यासारख्या कारणांमुळेही स्त्री एचआयव्ही बाधित होऊ शकते. परंतु, कारण जाणून न घेता एचआयव्ही बाधित स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. तिला थेट धंदेवाले, वेश्या अशी उपाधी देऊन लोक मोकळे होतात.

केवळ समाजच नाही तर कुटुंबाकडूनही तिला पाठिंबा मिळत नाही. जवळच्या व्यक्तीच तिच्याकडे संशयाने बघतात. काही वेळा त्यांना घरातून हाकलून देतात, तर काही वेळा घरातच वाळीत टाकण्यात येतं आणि तिच्यावर अनेक निर्बंध लादण्यात येतात. तिला कौटुंबिक समारंभांमध्ये आमंत्रण दिले जात नाही. एका खोलीतच तिला वेगळं ठेवण्यात येतं. त्यामुळे एचआयव्ही सोबतच नैराश्याचा त्रासही तिला सहन करावा लागतो.

एचआयव्ही बद्दल कितीही जनजागृती करायचा सरकारने प्रयत्न केला तरी लोकांच्या मनातले या रुग्णांबद्दलचे गैरसमज दूर होत नाहीत. यामध्ये सर्वात मोठा गैरसमज म्हणजे एचआयव्ही बाधित व्यक्तीसोबत बसल्याने अथवा त्याला स्पर्श केल्याने, त्याचे सामान वापरल्यामुळे एचआयव्ही पसरतो. जर एचआयव्ही असुरक्षित लैंगिक संबंधातून पसरणारा आजार आहे, तर तो एचआयव्ही बाधित व्यक्तीच्या आसपास वावरल्यामुळे कसा पसरेल? हा साधा विचार लोकंही करत नाहीत. याच कारणामुळे एचआयव्ही बाधित व्यक्तींना मुलभूत आरोग्य सुविधांपासून वंचित ठेवण्यात येतं या व्यतिरिक्त अनेक एचआयव्ही बाधितांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत.

कुटुंबाने दूर लोटलं, समाजामध्ये मानहानी आणि अशा परिस्थितीमध्ये उपजीविकेचे साधनच उरलं नाही तर माणूस कसा जगू शकेल, औषधोपचार तर दूरची गोष्ट झाली. इथे रोजच्या अन्नाचीच भ्रांती असताना त्याचा विचारच माणूस करू शकत नाही? स्त्रीसाठी तर यात भर पडते ती पालकत्वाची अनेकदा तिच्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. प्रत्यक्ष बाप व त्याचे कुटुंबीय ‘ही नक्की आपलीच मुलं आहेत ना?’ अशी शंका मनात आणतो आणि विनाकारण लहान जीवांची ससेहोलपट होते. काही प्रकरणांमध्ये तर पत्नी एचआयव्ही पॉझिटिव्ह आणि पती निगेटिव्ह असेल तर त्याने मुलांसकट पत्नीची जबाबदारी झिडकारली आहे. अशा परिस्थितीमध्ये हताश झालेली स्त्री मुलांसह जगणार कशी?

सध्या काही एनजीओ एचआयव्ही बाधितांसाठी आश्रयदाते ठरत आहेत. या एनजीओ कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार “लोक संस्थेला डोनेशन द्यायला तयार असतात पण एचआयव्ही बाधित माणसापासून मात्र चार हात दूरच राहतात.”समाजामध्ये एड्स बद्दल जनजागृती होणं अत्यंत आवश्यक आहे. पूर्वग्रहदूषित नजरेने अशा व्यक्तींकडे पाहण्यापेक्षा ती ही माणसं आहेत आणि त्यांनाही जगण्याच अधिकार आहे एवढी साधी भावना जरी ठेवली तरी एड्सग्रस्त रुग्णाच्या परिस्थितीमध्ये बरेच बदल घडून येतील.

जागतिक एड्स दिनाचा इतिहास…

ऑगस्ट 1987 मध्ये जेम्स डब्लु. बन् आणि थॉमस नेटर यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या (WHO), जिनेवा येथिल जागतिक कार्यक्रमात या रोगाबद्दल माहिती सांगितली आणि डॉ. मन् यांचा सहमती नंतर 1 डिसेंबर 1988 पासुन हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला. जागतिक एड्स दिन प्रथम जेम्स डब्लू बून व थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लड मध्ये 1988 मध्ये साजरा केला.

एड्स होण्याची कारणे कोणती?

  1. एड्स रुग्णाचे रक्त दुसऱ्या रूग्णाला दिल्याने एड्स होऊ शकतो.
  2. दुषित रक्त असलेल्या सुई, इन्जेक्शन मधून सुध्दा एड्स होऊ शकतो.
  3. HIV बाधित आईकडून स्तनपान करताना सुध्दा मुलाला एड्स होऊ शकतो.
  4. असुरक्षित लैंगिक संबंधामुळे सुध्दा एड्स होऊ शकतो.

एड्सची लक्षणे कोण कोणती आहेत…

  1. खूप आठवड्यापासून ताप येणे.
  2. खूप आठवडे खोकला असणे
  3. विनाकारण वजन कमी होणे
  4. तोंड येणे
  5. भूक न लागणे
  6. अन्नावरची वासना नाहीसी होणे
  7. सतत जुलाब होणे
  8. झोपताना घाम येणे

एड्स आजाराविषयी कोण कोणते गैरसमज आहेत ?

  1. एडस् या असाध्य, अपरिचित असा रोग असल्याने चुकीचे गैरसमज बाळगणे हे सुद्धा समाजाच्या दुष्टीने घातक आहे.
  2. एडस् हा रोग संसर्गजन्य रोग नाही आहे, म्हणून रोगाच्या बाधित रूग्णाच्या सोबत राहणे, जेवणे, खेळणे, स्पर्श करणे, कपडे वापरणे, बाजूला झोपणे, शौचालयाचा वापर करणे या सगळ्या कारणामुळे या महाभयंकर रोगाची लागण होत नाही.
  3. हा रोग संसर्गजन्य रोग असल्याचा गैरसमज सर्व साधारण नागरिकांच्या मनात आहे. पण हा संसर्गजन्य रोग नाही आहे.

Note – जर तुम्हाला World Aids Day information in marathi हि माहिती आवडली असेल तर तुम्ही Facebook, instagram आणि sharechat वर शेअर करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button