पोस्ट ऑफिसमध्येही मिळतो जीवन विमा योजनेचा लाभ, जाणून घ्या काय आहेत फायदे |Whole life assurance (suraksha) in marathi

मित्रांनो देशातील अनेक पोस्ट ऑफिस हे लोकांना जीवन विमा योजनेचा लाभ देत आहेत. पोस्ट ऑफिसद्वारे उपलब्ध जीवन विमा पोस्टल लाइफ इन्शुरन्स किंवा PLI योजना म्हणून ओळखला जातो. या योजनेत 6 प्रकारच्या विम्याचा समावेश आहे. अनेकांना या विम्याची माहिती नाहीये. म्हणून आज आपण या पोस्टमध्ये संपूर्ण जीवन विमा-सुरक्षा (Whole Life Assurance-Suraksha) बद्दल जाणून घेणार आहोत.

पोस्ट ऑफिसमध्येही मिळतो जीवन विमा योजनेचा लाभ, जाणून घ्या काय आहेत फायदे |Whole life assurance (suraksha) in marathi

संपूर्ण जीवन विमा-सुरक्षा | Whole Life Assurance-Suraksha

संपूर्ण जीवन विमा-सुरक्षा हा जीवन विमा आहे. LIC ला देशात जीवन विमा म्हणून ओळखले जाते. पण, देशात विम्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. संपूर्ण जीवन विमा-संरक्षण योजना 19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील व्यक्ती खरेदी करू शकते. यामध्ये, पॉलिसीधारकाला किमान 20,000 रुपये आणि कमाल 50 लाख रुपयांची विमा रक्कम मिळते आणि ही रक्कम बोनससह उपलब्ध असते. आता एक प्रश्न पडतो तो म्हणजे, पॉलिसी चालू असताना धारकाचा मृत्यू झाल्यास? ही रक्कम कोणाला मिळते? तर याचं उत्तर, नॉमिनीला जाते. या पॉलिसीमध्ये कर्जाची सुविधाही देण्यात आली आहे.

हे सुध्दा वाचा:- पोस्ट ऑफिसमध्ये RD खाते उघडल्यास कमी व्याजावर मिळेल कर्ज, जाणून घ्या सर्व काही

संपूर्ण जीवन विमा संरक्षणाचे फायदेबकाय आहेत?

  • या योजनेत इतर पॉलिसींप्रमाणेच कर लाभही मिळतात. तुम्ही आयकर कायदा 80C अंतर्गत कर कपातीचा लाभ घेऊ शकता.
  • या योजनेच्या पॉलिसीधारकाला प्रीमियम भरण्याचा पर्याय देखील आहे. मासिक, तीनमहिने, सहामाही आणि वार्षिक यांपैकी कोणताही एक पर्याय निवडून तो पॉलिसीचा प्रीमियम भरू शकतो.
  • पॉलिसीधारक त्यांची पॉलिसी 59 वर्षांनंतर एंडोमेंट ॲश्युरन्स पॉलिसीमध्ये बदलू शकतात. यासाठी स्वतंत्र अटी व शर्ती आहेत.
  • संपूर्ण जीवन विमा – संरक्षण पॉलिसी देशाच्या कोणत्याही भागात सहजपणे ट्रान्सफर केली जाऊ शकते.
Telegram Grouplink
WhatsApp Channellink
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button