प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय? आणि त्यांचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? | What is provident fund in marathi

संपत्ती निर्माण करण्यासाठी बचत करणे हा एक मार्ग आहे पण त्यापेक्षा फायदेशीर मार्ग आहे, तो म्हणजे गुंतवणूक करणे. मात्र ही गुंतवणूक योग्य ठिकाणी झाली पाहिजे, म्हणूनच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा गुंतवणुकीसाठीचा असाच एक योग्य मार्ग आहे. कसा काय ? काय आहेत याचे फायदे? ते आपण या पोस्ट मधुन जाणून घेणार आहोत.

प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय? आणि त्यांचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय ? | What is provident fund

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच प्रॉव्हिडंट फंडची सुविधा 1952 सालापासून भारत सरकार कडून कर्मचारी वर्गाचं भविष्य सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने दिली जात आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या रकमेमधूनच एक छोटा भाग वेगळा करून या प्रॉव्हिडंट फंडाच्या खात्यात जमा केला जातो. म्हणजेच मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या 12% रक्कम दरमहा EPF खात्यात जमा करणे आवश्यक आहे. ज्याचा थेट फायदा निवृत्तीनंतर होतो. निवृत्तीनंतरच्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी भविष्यातील हा पैसा उपयुक्त आहे.

यात कोण गुंतवणूक करू शकतं?

ही योजना प्रत्येकासाठी खुली आहे. नोकरी करणारे, स्वयंरोजगार, बेरोजगार किंवा सेवानिवृत्त कोणीही यात पैसे गुंतवू शकतात. कोणीही PPF मध्ये कमीतकमी 500 रुपये ते 1.5 लाख रुपये दरवर्षी पैसे गुंतवू शकतात. त्यात निश्चित परतावा असतो जो सरकार दर तिमाहीत ठरवते. आपण पोस्ट ऑफिस किंवा मोठ्या बँकांमध्ये पीपीएफ खाते उघडू शकतो.

प्रॉव्हिडंट फंडाचे फायदे | Provident Fund benefits

प्रॉव्हिडंट फंडात गुंतवणूक केली असता अन्य सरकारी योजनांहून चांगला व्याजदर मिळतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून सध्या पीपीएफवर 7.1 टक्के इतका व्याजदर दिला जातो आहे. केंद्र सरकार पीपीएफसाठीच्या व्याजदरात दर तिमाहीला बदल करते. पीएफ खातेधारकांना यातून अनेक फायदे मिळतात. परंतु तरीही त्या अंतर्गत मिळणारे व्याजदर हे एफडी (फिक्स्ड डिपॉझिट) सारख्या इतर सरकारी योजनांपेक्षा जास्त आहेत, ज्यांचा व्याजदर 5.5 ते 6% च्या वर मिळत नाही.

सुरक्षित गुंतवणूक

ही योजना सरकारमार्फत चालवली जाणारी अल्पबचत योजना असून गुंतवणूकदारांचे पैसे या योजनेत सुरक्षित राहतात. जोखमीविना चांगला परतावा पाहिजे असणाऱ्या लोकांना हा चांगला पर्याय आहे. यामध्ये करण्यात आलेल्या गुंतवणूकीवर व्याजाची हमी दिली जाते. बँकेतील पैसे गुंतवल्यावर फक्त 5 लाख रुपयांच्या रकमेवरच विमा संरक्षण मिळते.

हे सुध्दा वाचा:- Sovereign gold bond मध्ये गुंतवणूक का करावी, जाणून घ्या फायदे काय आहेत

विमा मिळतो मोफत

पीएफ खाते उघडल्यानंतर विमा देखील आपोआप उपलब्ध होतो. एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) स्कीम अंतर्गत, पीएफ खात्यावर 6 लाख रुपयांपर्यंतचा विमा उपलब्ध आहे. EDLI ही नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या वारसाला एकरकमी पैसे देणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत, विमाधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्याला आर्थिक मदत मिळते. ही मदत कंपनी आणि केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना दिली जाते.

कर भरण्यापासून सुटका

लाभार्थ्याला आयकर कायद्याच्या कलम 80 क नुसार या बचतीवर कर सूट मिळते. सरकारने ही सुविधा कर्मचाऱ्यांना दिली आहे कारण जर आपण कोणत्याही कंपनीत काम करत असताना 5 वर्षे पूर्ण केली, तर पीएफ काढल्यावर आयकर भरावा लागणार नाही. त्याच वेळी, जर तुम्ही 5 वर्षांचा कालावधी पूर्ण केला नाही, तर 10% टीडीएस आणि कर कापला जातो.

कधीही रक्कम काढता येते

पीएफ फंड योजनेची चांगली सुविधा म्हणजे, हे पैसे अडीअडचणीला आवश्यकतेनुसार काढता येऊ शकतात. यामुळे कर्ज घेण्याची गरज नाही. कोरोना महामारीमध्ये टाळेबंदीच्या अवघड परिस्थितीमध्ये देशातील बहुसंख्य लोकांनी या सुविधेचा लाभ घेताना आपल्या आर्थिक आवश्यकतांसाठी पीएफ खात्यामधील रक्कम काढली आहे.

हे सुध्दा वाचा:- उपचार, लग्न किंवा घर बांधण्यासाठी पीएफमधून पैसे काढायचे आहेत, मग जाणून घ्या लिमिट किती आहे?

पीपीएफवर कर्जही मिळते

पीपीएफ खातेधारकांसाठी कर्जाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी जी अट आहे ती अशी की पीपीएफ खाते सुरू झाल्यापासून तीन ते सहा वर्षांपर्यत कर्ज घेतले जाऊ शकते. विनातारण तसेच कमी कालावधीसाठी कर्ज घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. कर्जाची रक्कम ज्या वर्षी कर्जासाठी अर्ज केला आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या आर्थिक वर्षाच्या शेवटी असलेल्या बॅलन्सच्या 25 टक्क्यांपर्यत असू शकते.

निष्क्रिय खात्यांवरील व्याज

पीएफ खातेधारकाला त्याच्या निष्क्रिय खात्यावरील व्याजाचा लाभ मिळतो. तीन वर्षे निष्क्रिय राहिल्यास पीएफ खात्यावर व्याजाचा लाभ देखील उपलब्ध आहे. 2016 च्या सुधारणेनुसार ही तरतूद करण्यात आली आहे.

Telegram Grouplink
WhatsApp Channellink
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Investment_Dnyanया पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button