चुंबकाचा शोध कसा लागला? | History of Magnets in marathi

चुंबकाचा एखादा छोटासा तुकडा जरी मिळाला तरी पटकन तो कोणत्यातरी लोखंडी वस्तूला चिकटवण्याची कृती आपल्याकडून अगदी अनपेक्षितपणे होते. आणि चुंबक लावून ती वस्तू किती वर उचलली जातेय, हे पाहतानाही किती मजा येते! अगदी लहान असो किंवा मोठा, कुठलाही माणूस कुठल्याही वयात चुंबक हाती आला की अशी गमंत-जमंत करताना थकत नाही. चुंबक लोखंडाला चिकटण्याचं हे अप्रूप आपण कितीही विज्ञान वाचलं तरीही कायम तसंच राहतं. पण या चुंबकाचा शोध लागला तरी कसा आणि कोणी लावला हा प्रश्न आपल्या मनात एकदातरी डोकावला असेलच. तर चला जाणून घेऊया.

चुंबकाचा शोध कसा लागला? | History of Magnets in marathi

चुंबकाचा शोध कधी आणि कोणी लावला या विषयी काही ठोस पुरावे सापडत नाहीत. मात्र त्याच्या शोधाविषयी एक गोष्ट खूपच प्रचलित आहे. ते म्हणजे जवळजवळ २५०० वर्षांपूर्वी ग्रीस मध्ये क्रिट नावाच्या एका बेटावर एक मॅग्नेस नावाचा मेंढपाळ आपल्या शेळ्या-मेंढ्याना रानात चरायला घेऊन गेला होता. तेव्हा एके ठिकाणी उभं राहून तो आपल्या हाताच्या काठीने त्याच्या पायापाशी असलेले बारीक आकाराचे दगड आजू-बाजूला करत होता. तेवढ्यात त्याच्या काठीला जिथे लोखंडाचं टोक होतं, तिथे एक दगड चिकटला. त्याने तो चिकटलेला दगड खेचून खाली टाकला आणि पुन्हा काठीचं टोक त्या दगडापाशी नेलं, तेव्हा पुन्हा तो दगड त्याच्या काठीच्या टोकाला चिकटला. हा दगड म्हणजे काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे, असं समजून त्याने गावातील अनेक लोकांना सांगितलं.

पण त्यांच्या जेव्हा हे निदर्शनास आलं की, या दगडाला केवळ लोखंड चिटकत आहे, तेव्हा त्यांनी हा आगळा-वेगळा चमत्कार मानला आणि मॅग्नेस नावाच्या मेंढपाळावरूनच मॅग्नेट असं नाव त्या वस्तूला दिलं. काही शोधांमधून हेदेखील माहीत पडतं की, लोहचुंबक हे खनिज मॅग्नेशिया या प्रांतात मोठ्या प्रमाणावर आढळत असल्यामुळे त्याला मॅग्नस हे नाव पडलं. पण पुढे चुंबकाला इंग्रजी भाषेत मॅग्नेट हे नाव पडून तेच जगभरात विकसित झालं.

पण त्यांच्या जेव्हा हे निदर्शनास आलं की, या दगडाला केवळ लोखंड चिटकत आहे, तेव्हा त्यांनी हा आगळा-वेगळा चमत्कार मानला आणि मॅग्नेस नावाच्या मेंढपाळावरूनच मॅग्नेट असं नाव त्या वस्तूला दिलं. काही शोधांमधून हेदेखील माहीत पडतं की, लोहचुंबक हे खनिज मॅग्नेशिया या प्रांतात मोठ्या प्रमाणावर आढळत असल्यामुळे त्याला मॅग्नस हे नाव पडलं. पण पुढे चुंबकाला इंग्रजी भाषेत मॅग्नेट हे नाव पडून तेच जगभरात विकसित झालं.

चुंबकाचा वैज्ञानिक अभ्यास सोळाव्या शतकाच्या शेवटच्या टोकाला विल्यम गिल्बर्ट यांनी मांडला. त्यात त्यांनी आपल्या पृथ्वीला कसं चुंबकीय क्षेत्र असतं, हे सांगितलं. पण त्यांच्या चुंबकाविषयीच्या मांडणीनंतर काही काळ चुंबकाच्या शास्त्राविषयी काहीच प्रगती घडून आली नाही. मात्र सतराव्या शतकाच्या मध्यात कुलंब याने चुंबकाच्या चुंबकीय ध्रुवातील आकर्षण, प्रतिसारक या संकल्पनेविषयी नियमावली मांडली. कुलंबच्या चुंबकाविषयीच्या मांडणी नंतर गौस, केल्व्हिन या शास्त्रज्ञांनी आपापले चुंबकाविषयीचे गुणधर्म मांडले. या शास्त्रज्ञांनंतर जवळजवळ अठराव्या शतकात ओर्टेड या शास्त्रज्ञाने मांडले की, जर तारेतून विद्युतप्रवाह चुंबकाच्या दिशेने सोडला तर तिथे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं आणि चुंबकाच्या अभ्यासाविषयीचा हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो.

त्यानंतर १८२० मध्ये अॅपिअर याने दाखवून दिले की विद्युत प्रवाहाचा वापर करून कृत्रिमरित्या चुंबक बनवला जाऊ शकतो. ॲपिअरच्या या वक्तव्यामुळे अॅरागो या शास्त्रज्ञाने त्याच वर्षी विद्युत चुंबक तयार केलं. विद्युत् प्रवाहामुळे अतिशय सामर्थ्यवान चुंबक तयार करता येतात हे आता सिद्ध ही झालं आहे. चुंबकाच्या अभ्यासात अनेक शास्त्रज्ञांनी चुंबकाविषयी महत्त्वपुर्ण गोष्टी मांडल्या. त्यामुळे चुंबकाच्या अभ्यासात प्रगती होत गेली. आज अनेक यांत्रिक कामांमध्ये जसं की एखादी मशीन, उपकरणं, दूरध्वनी, इत्यादीसाठी चुंबकाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि त्याचा आधुनिकतेसाठी चांगला वापरही होत असल्याचं आपल्या निदर्शनास येतं.

चुंबकाचा शोध कोणी लावला हे जरी निश्चित माहीत नसलं तरीही तो कसा लावला गेला, चुंबकाच्या शास्त्रात कशी प्रगती होत गेली ही माहिती नक्कीच मिळते. चुंबकाकडे एक विस्तृत अभ्यास म्हणून पाहत त्याचा सैद्धांतिक अभ्यास हाताळल्यास आपल्याला तो किचकट वाटू लागतो मात्र चुंबकाच्या प्रगतीची आणि उपयोगाची प्रक्रिया जर आपण पाहिली तर ती नक्कीच उल्लेखनीय आहे.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button