EPS म्हणजे काय? | What is eps in marathi

EPS म्हणजे अर्निंग पर शेअर (Earnings per share). कोणत्याही कंपनी कडे लाखो शेअर्स असतात. त्यापैकी प्रत्येक सिंगल शेअर वर कंपनी किती नफा कमावते याला EPS असे म्हटले जाते. EPS मार्फत आपण कोणत्याही कंपनी चा बिझनेस कसा चालला आहे ते आपल्याला कळू शकते. ज्या वेळी कंपनी ला नफा होतो त्या वेळी कंपनी च्या एका शेअर वर सरासरी किती नफा झाला आहे ते EPS मुळे कळते.

EPS म्हणजे काय? | What is eps in marathi

EPS कसा कॅलक्युलेट केला जातो? कोणत्या हि कंपनी चा EPS जाणून घेण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते.

  1. कंपनी चा निव्वळ नफा
  2. कंपनीच्या शेअर्स ची संख्या

या दोन गोष्टी आपल्या जवळ असतील तर खालील सूत्रानुसार कंपनी चा EPS काढला जातो. या मध्ये कंपनी चा निव्वळ नफा हा त्रैमासिक किंवा वार्षिक असू शकतो.

आता EPS चे एक सोपे उदाहरण पाहूया. असे मानूया कि ABC नावाच्या कंपनी चे मार्केट मध्ये 1 लाख शेअर्स आहेत आणि एका वर्षात कंपनी ने 50 लाख रुपये कमावले तर कंपनी चा EPS असेल 50 रुपये. ( EPS = 5000000 / 100000) याचाच अर्थ कंपनीने एका शेअर वर 50 रुपये कमावलेले आहेत.

हे सुध्दा वाचा:- फंडामेंटल अनालिसिस चे प्रकार कोणते?

EPS चा वापर प्रामुख्याने कंपनी च्या कामगिरी ची तुलना प्रतिस्पर्धी कंपनी च्या कामगिरी बरोबर करण्यासाठी केला जातो. जर कंपनी चा EPS प्रतिस्पर्धी कंपनी च्या EPS पेक्षा जास्त असेल तर तर कंपनी ची कामगिरी चांगली आहे आणि जर EPS कमी असेल तर कंपनी ची कामगिरी प्रतिस्पर्थ्यांच्या तुलनेत खराब आहे असा त्याचा अर्थ होतो.

तर थोडक्यात काय, जर आपलयाला एखाद्या सेक्टर मधील आघाडीच्या कंपनी मध्ये गुंतवणूक करायची असेल तर EPS द्वारे आपण त्या सेक्टर मधील सर्व कंपन्यांची कामगिरी तपासू शकता आणि ज्या कंपनी चा EPS जास्त, त्या कंपनी मध्ये गुंतवणूक करू शकता.

Note- मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करतात. या विषयावर आणखी पोस्ट येणार आहेत त्या नक्की वाचा. आणि हो आपल्या Dnyan_shala आणि Shares_dnyan या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *