मित्रांनो या पहिले आपण फंडामेंटल एनालिसिस म्हणजे काय हे पहिलं, आता आपण फंडामेंटल अनालिसिस चे प्रकार पाहणार आहोत. फंडामेंटल अनालिसिस चे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.
फंडामेंटल अनालिसिस चे प्रकार कोणते? | Types of fundamental analysis in marathi
- क्वालिटेटिव्ह अनालिसिस
- क्वांटिटेटिव्ह अनालिसिस
क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये तुलनात्मक गुणवत्तेवर भर दिला जातो म्हणजे प्रॉडक्ट ची गुणवत्ता, ब्रँड परफॉर्मन्स, मॅनॅजमेण्ट बोर्ड इत्यादी. उदाहरणार्थ, मारुती आणि महिंद्रा या दोन कंपन्यांची जर तुलना केली तर आपण म्हणतो मारुतीच्या गाड्या चांगल्या आहेत म्हणजेच आपण दोन्ही कंपन्यांच्या प्रॉडक्ट ची तुलना करून एक प्रकारे क्वालिटेटिव्ह अनालिसिस करतो.
म्युच्युअल फंड च्या ‘अ’ आणि ‘ब’ या दोन कंपन्यांची जर तुलना केली तर आपण म्हणतो ‘अ’ कंपनी चा फंड मॅनेजर हा ‘ब’ कंपनीच्या फंड मॅनेजर पेक्षा चांगला आहे म्हणजेच आपण गुणवत्तेविषयक तुलना करतो यालाच क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हटले जाते. फंडामेंटल अनालिसिस चा हा एका महत्वाचा पण काहीसा दुर्लक्षित प्रकार आहे कारण बरेच जण हे फक्त कंपनीच्या रिपोर्ट मधील आकड्यांना महत्व देतात पण एक चांगले अनालिसिस करण्यासाठी आपल्याला क्वालिटेटिव्ह अनालिसिस ची गरज भासते.
क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये आकड्यांचे विश्लेषण केले जाते म्हणजेच, कंपनी चे मार्केट कॅप, प्रॉफिट रेशो, कर्जाची रक्कम, PE, EPS. या मध्ये कंपनी चा वार्षिक रिपोर्ट पाहून कंपनी पुढे कशी काम करेल याचा अंदाज बांधला जातो.
क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये आकड्यांचे विश्लेषण केले जाते म्हणजेच, कंपनी चे मार्केट कॅप, प्रॉफिट रेशो, कर्जाची रक्कम, PE, EPS. या मध्ये कंपनी चा वार्षिक रिपोर्ट पाहून कंपनी पुढे कशी काम करेल याचा अंदाज बांधला जातो.
फंडामेंटल अनालिसिस करण्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत.
- टॉप डाउन अनालिसिस
- बॉटम टॉप अनालिसिस
पहिल्या प्रकारात कोणताही स्टॉक निवडण्यापूर्वी त्याच्या सेक्टर चे आणि कॅटेगरी चे विश्लेषण केले जाते तर दुसऱ्या प्रकारात आधी स्टॉक निवडला जातो आणि नंतर त्याच स्टॉक चे बारकाईने विश्लेषण करून तो पोर्टफोलिओ मध्ये समाविष्ट केला जातो.
Note- मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करतात. या विषयावर आणखी पोस्ट येणार आहेत त्या नक्की वाचा. आणि हो आपल्या Dnyan_shala आणि Shares_dnyan या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.