भारतीय वायुसेनेत फ्लाईंग ऑफिसर म्हणून जॉब करायचं आहे? मग ही माहिती तुमच्यासाठी |Indian air force recruitment

आयुष्य खाजगी नोकरीत घालण्यापेक्षा आयुष्यात सरकारी नोकरी मिळेल यासाठी हजारो तरुण-तरुणी अभ्यास करत असतात. सरकारी नोकरी केंद्र सरकारमध्ये जॉब मिळाला तर ती एक पर्वणीच. काही भारतीय तरुणांना भारतीय सेनेतही दाखल होण्याची इच्छा असते. त्यासाठी विशेष म्हणजे एनडीए (NDA) सारख्या मोठ्या परीक्षांची तयारी आपल्यातील अनेक जण करत असतात. त्यामुळे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही परीक्षा देणे महत्त्वाचे असते आणि ह्या परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी प्रचंड अभ्यास करावा लागतो.

जर तुम्हालाही भारतीय वायुसेनेत क्लास वन ऑफिसर (class 1 officer) म्हणून नोकरी हवी असेल तर आज आम्ही तुम्हाला अशी एक परीक्षा सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करू शकता. चला तर जाणून घेऊया त्या सरकारी नोकरी बद्दल.

भारतीय वायुसेनेत फ्लाईंग ऑफिसर म्हणून जॉब करायचं आहे? मग ही माहिती तुमच्यासाठी |Indian air force recruitment in marathi

जर तुम्हाला भारतीय वायुसेनेत क्लास वन ऑफिसर व्हायचं असेल तर तुम्ही AFCAT या नावाची परीक्षा देऊ शकता. या परीक्षेसाठी पात्रता काय? ही परीक्षा नेमकी कशी असते कोणते उमेदवार ही परीक्षा देऊ शकतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

AFCAT या परीक्षेबद्दल जाणून घेऊया?

AFCAT ही भारतीय वायुसेने द्वारे घेण्यात येणारी परीक्षा आहे. हवाई दलातील वर्ग-1 अधिकारी (फ्लाईंग आणि ग्राउंड ड्युटी) उमेदवारांच्या निवडीसाठी घेतली जाते. या परीक्षेच्या कालावधी साधारणपणे दरवर्षी फेब्रुवारी आणि ऑगस्टमध्ये असतो. या परीक्षेतील उमेदवारांना तांत्रिक शाखा, उड्डाण शाखा आणि ग्राउंड ड्युटी शाखेसाठी नियुक्ती केली जाते. विशेष म्हणजे या परीक्षेत तांत्रिक आणि गैर-तांत्रिक अशा दोन्ही पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते. ज्यामुळे शॉर्ट कमिशन आणि कायम कमिशनचा समावेश आहे जो पुरुष आणि महिला दोघांसाठी असतो.

या परीक्षेची पात्रता काय आहे?

या विषयाचा अभ्यासक्रम सुरू करताना परीक्षा उमेदवाराची वय 18 ते 23 वर्षाच्या दरम्यान असावे. उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही विषयावरील पदवीधर तसेच सर्व पेपर्समध्ये किमान 60% गुणासह आणि 10+2 स्तरावर गणित आणि भौतिक शास्त्र उत्तीर्ण किंवा BE/B.Tech असणे आवश्यक आहे.

टेक्निकल ब्रांच ( Technical Branch)

या शाखेचा अभ्यासक्रम सुरू करताना उमेदवाराचे वय हे 18 ते 26 वर्षाच्या दरम्यान असावे. उमेदवार कोणत्याही मान्यता मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही विषयातील पदवीधर (किमान तीन वर्षाचा पदवीधर अभ्यासक्रम) सर्व पेपर्समध्ये एकूण किंमत 60% गुणांसह आणि 10+2 स्तरावर गणित आणि भौतिकशास्त्र उत्तीर्ण किंवा BE/ B.Tech केलेले असणे आवश्यक आहे.

हे सुध्दा वाचा:- करियर निवडण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

कोणती पात्रता आवश्यक?

10+2 मध्ये गणित आणि भौतिकशास्त्रत प्रत्येक किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. किमान 60% गुणांसह मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंमत 60 % गुणांची विभाग A आणि B परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा असोसिएट मेंबरशिप ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग (इंडिया) किंवा एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया.

कसा असतो AFCAT परीक्षेचा पॅटर्न?

AFCAT या परीक्षेत एकूण 100 प्रश्न असतात. हे प्रश्न सोडवण्यासाठी परीक्षा उमेदवारांना 2 तासाचा अवधी देण्यात येतो. हा पेपर 300 गुणांचा असतो. जर तुम्ही 1 प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले तर तुम्हाला 3 गुण मिळतील. या परीक्षेत 1/3 नेगेटिव्ह मार्किंग देखील असते. त्यामुळे ही परीक्षा देतांना ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहित आहे अशाच प्रश्नांची उत्तरे देण्याची विशेष काळजी घ्या. आणि एलिमिनेशन पद्धत वापरा ज्यामुळे तुम्ही अचूक उत्तर शोधू शकाल.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button